Friday, December 20, 2024
Friday, December 20, 2024

HomeFact SheetsExplainerExplainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक...

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

“१९९२ च्या दंगलीतील सहभाग ही चूकच, माफ करा – उद्धव ठाकरे” अशा शीर्षकाच्या सोशल मीडियावरील पोस्टने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय वर्तुळात खळबळ माजविली. “बाळासाहेबांनी ज्या गोष्टीचा अभिमान बाळगला त्याच गोष्टीसाठी आज उ.बा.ठा. दिलगिरी व्यक्त करत आहे. मत मिळवण्यासाठी अजून किती खालची पातळी गाठणार?” तसेच “महाराष्ट्रातील हिंदूंच्या आयुष्यातील हाच काळा दिवस आहे.” अशा कॅप्शनखाली प्रचंड व्हायरल झालेल्या पोस्टने तितकाच प्रचंड धुमाकूळ घातला. याच १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट आपण या एक्सप्लेनेरच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

सध्याच्या निवडणुकांमधील संघर्ष हा रस्त्यावर कमी आणि खऱ्या अर्थाने सोशल मीडियावर सुरु आहे. एकमेकांच्या विरोधातील पोस्ट, बदनामी आणि खोटे नरेटिव्ह सर्वात जास्त पसरते ते सोशल माध्यमांवरूनच. महाराष्ट्राची बुधवार दि. २० रोजी होणारी निवडणूकही गाजतेय याच साऱ्या पोस्टमुळेच. अशीच शिवसेना (UBT) चे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप करणारी आणि निवडणुकीच्या तोंडावर हिंदूंनी सावध व्हा, असे आवाहन करणारी पोस्ट बराच गोंधळ निर्माण करणारी ठरली.

काय सांगते ती पोस्ट?

एक्सप्लेनेरच्या सुरुवातीला आपण X आणि Facebook या प्लॅटफॉर्मवरून व्हायरल झालेली ती पोस्ट पाहू.

सुरुवातीला मराठी भाषेतील न्यूजपेपर कटिंगच्या माध्यमातून आणि नंतर हिंदी भाषांतरित न्यूजपेपर कटिंगच्या मार्फत ही पोस्ट पसरत गेली.

अशा पोस्टचे संग्रहण येथे, येथे, येथे, येथे आणि येथे पाहता येईल.

“१९९२च्या दंगलीतील सहभाग ही चूकच, माफ करा- उद्धव ठाकरे मुस्लिम नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंचा माफीनामा (राहुल पांढरे, मुंबई वार्तापत्र मुंबई) – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये खळबळ उडवून देणारी बातमी. उद्धव ठाकरेंनी मुस्लिम नेत्यांसोबत झालेल्या बैठकीमध्ये १९९२ च्या दंगलीच्या सहभागाबद्दल माफी मागितली आहे. या बैठकीला मुंबईतील मुस्लिम नेते मुफ़्ती मोहम्मद इस्माइल, आसिफ शेख, फारूक शाह यांच्यासह मुस्लिम. धर्मगुरू उपस्थित होते. आगामी विधानसभा निवडणुकीची दिशा बदलणारा ही घटना आहे. बैठकीसाठी उपस्थित नेत्यांनी उद्धव ठाकरेंच्या माफीच्या बातमीला दुजोरा दिला आहे. (उद्धव ठाकरे गट) उमेदवार उभे आहेत. मुस्लिम धर्मगुरु आणि नेत्यांनी याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंची आढावा घेण्यात आला. आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने ही बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी संजय राऊत, अनिल परब उपस्थित होते. मुस्लिम नेत्यांसमोर उद्धव ठाकरेंनी घातलेल्या लोटांगणामुळे शिवसैनिक अस्वस्थ आहेत. उद्धव ठाकरेंच्या हिंदुत्वाच्या मुद्दयाला सोडून मुस्लिम तुष्टीकरणाचे राजकारण सुरु केले आहे. २०१९ पासून उद्धव ठाकरेंनी मतांच्या राजकारणासाठी हिंदूत्वाचा मुद्दा सोडला. मात्र त्यांची मजल आता बाळासाहेब ठाकरेंना चुकीचं ठरवण्यात पर्यंत गेली असल्याचे दिसत आहे. मतांसाठी जन्मदात्या पित्याला खोटं का पाडले असा मुंबईमध्ये मुस्लिमबहूल भागांमध्ये शिवसेनेचे भेट घेतली. यावेळी मुंबईतील मतदार संघाचा प्रश्न सर्वसामान्य शिवसैनिकांना पडला आ.” असा मजकूर मराठी न्यूजपेपर कटिंगमध्ये आढळला.

हिंदी भाषेतील न्यूजपेपर कटिंगमध्ये सुद्धा “1992 के दंगों में शामिल होना गलती थी, माफ़ करो ।” – उद्धव ठाकरे मुस्लिम नेताओं के साथ हुई बैठक में उद्धव ठाकरे की माफी (प्रणव डोगरा) राष्ट्रीय उजाला मुंबई- उद्धव ठाकरे को लेके एक सनसनीखेज खबर सामने आई है । मुस्लिम नेताओं के साथ हुई बैठक में उद्धव ठाकरे ने 1992 के दंगों में शामिल होने के लिए माफी मांगी है। इस बैठक में मुस्लिम बोर्ड के सज्जाद नोमानी के साथ मुफ्ती मोहम्मद इस्माइल, आसिफ शेख, फारूक शाह और अन्य मुस्लिम नेता मौजूद थे। बैठक में मौजूद नेताओं ने उद्धव ठाकरे के माफी मांगने की खबर की पुष्टि की है। मुंबई के मुस्लिम बहुल इलाकों में शिवसेना (उद्धव ठाकरे गुट) के उम्मीदवार चुनाव लड़ रहे हैं। इस चुनाव के मद्देनजर मुस्लिम धर्मगुरुओं और नेताओं ने उद्धव ठाकरे से मुलाकात की। इस मौके पर मुंबई संसदीय क्षेत्र की समीक्षा की गई। यह बैठक को आदित्य ठाकरे के साथ साथ संजय राऊत और अनिल परब भी उपस्थित थे। उद्धव ठाकरे के हाथ से हिंदू वोट फिसल रहे हैं। लोकसभा के परिणाम इसका प्रमाण है। लोकसभा में उद्धव का गुट हिंदू आबादी वाले इलाकों से पिछड़ रहा था। लेकिन कई उम्मीदवार इसलिए चुने गए क्योंकि उन्होंने मुस्लिम बहुल इलाकों से अच्छी बढ़त ले ली थी। विधानसभा में भी उद्धव ठाकरे का मुस्लिम वोटों पर भरोसा रहने वाला है। इस बात का पूरा एहसास उद्धव ठाकरे को है. संभव है कि उपरोक्त चौंकाने वाला बयान इसी वजह से आया हो । मुस्लिम नेताओं के सामने उद्धव ठाकरे के सजदा करने से शिवसैनिक नाराज हैं। उद्धव ठाकरे का हिंदुत्व का मुद्दा पीछे छूट गया है और मुस्लिम तुष्टिकरण की राजनीति शुरू हो गई है। 2019 के बाद से वोट की राजनीति के लिए उद्धव ठाकरे ने हिंदुत्व का मुद्दा छोड़ दिया। लेकिन अब ऐसा लगता है कि वे बालासाहेब ठाकरे को गलत साबित करने की हद तक चले गए हैं। आम शिवसैनिकों को आश्चर्य है कि वोट के लिए जन्मदाता पिता को झूठ साबित किया जा रहा है। इस चीज को लेके शिवसैनिक बेहद नाराज है। कार्यकर्ता पार्टी से अलग होते जा रहे है। उद्धव ठाकरे इस बात को जितना जल्दी समझे उतना अच्छा है।” असा मजकूर आढळला.

शोधात काय सापडले?

या पोस्ट पसरू लागल्यानंतर न्यूजचेकरने सर्वप्रथम मराठी आणि हिंदी भाषेतील न्यूजपेपर कटिंगवर रिव्हर्स इमेज सर्च केला. संबंधित मराठी आणि हिंदी शीर्षकांवर आणि बातम्यांत मजकुरावर आधारित कीवर्ड सर्च करून पाहिला मात्र काहीच आढळले नाही.

मराठी पेपर कटिंगमध्ये ‘राहुल पांढरे, मुंबई वार्तापत्र मुंबई’ इतकाच उल्लेख आढळला. दरम्यान संबंधित वर्तमानपत्राचे नाव आढळले नाही. यामुळे या नावाचे पत्रकार आहेत का? ते कोणत्या दैनिकात काम करतात हे शोधून पाहताना हाती काहीच लागले नाही. मुंबई येथील मराठी पत्रकारांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, या नावाचा कोणी पत्रकार अस्तित्वात नसल्याची आणि कोणत्याच अधिकृत माध्यमाने ही बातमी प्रसिद्ध केलेली नसल्याचे समजले.

व्हायरल होत असलेल्या हिंदी न्यूजपेपर कटिंगमध्ये आम्हाला प्रणव डोगरा, राष्ट्रीय उजाला मुंबई असा उल्लेख आढळला. दरम्यान आम्ही राष्ट्रीय उजाला नावाच्या दैनिकाच्या अधिकृत वेबसाईटवर आणि इपेपर या सदरात शोध घेतला असता अशी कोणतीच बातमी आढळली नाही.

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट

पोस्ट केली आणि डिलीट झाली

या दरम्यान आम्ही सोशल मीडियावर या पोस्टवरून काय संभाषण सुरु आहे हे पाहण्याचा प्रयत्न केला. शालिनी ठाकरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस, कार्याध्यक्षा – महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेना, निर्माता, सिनेमंत्रा संस्थापक आणि संस्थापिका, कलकी फॉऊंडेशन) यांच्या मराठी पोस्टवर सर्वाधिक कॉमेंट्स असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्हाला @ivaibhavk या युजरने केलेली कॉमेंट आढळली. यामध्ये “हा कोणता पेपर आहे? कोणत्या तारखेचा आहे? ते सांगतो का सोमेश? तू संघाचा कार्यकर्ता आहेस म्हणून तुला एबीपी मधे ब्युरो चीफ केले आहे का? भाजपने बनवलेली फेक कात्रण टाकतोस.पत्रकार म्हणून क्रॉसचेक करणे कर्तव्य नाही का? हे कात्रण सोडले तर कुठेच काही नाही या बैठकीबद्दल? डिलीट करून माफी माग https://x.com/someshkolge/st/someshkolge/status/1858470557068431560” असा मजकूर आम्हाला आढळला.

या कॉमेंटला उत्तर देताना @someshkolge या युजरने “वैभव कोटक तू कोणाचा कार्यकर्ता आहेस ? बऱ्याच वर्षांपासून तू law student दिसतोयस…त्या बातमीत नावं लिहिली आहेत त्यांना फोन करुन विचारून घे . बाकी तुझं Law पूर्ण झालं की तू कोर्टातही येऊ शकतोस माझ्या विरोधात. तिथे मी तुला माझा उर्वरित परिचय सांगेन” असे उत्तर दिल्याचे आम्हाला वाचायला मिळाले.

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट

अशाचपद्धतीच्या कॉमेंटस संबंधित @someshkolge ला उद्देशून होत असल्याचे आणि संबंधित युजर त्याला उत्तर देत असल्याचे आम्हाला दिसून आले.

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट

याचवेळी कॉमेंट सेक्शनमध्ये @Santo_123456 या युजरने “सुपारी घेऊन खोटे बोलणारे ..” अशा कॅप्शनखाली @someshkolge या युजरने केलेल्या पोस्टचा स्क्रिनशॉट आम्हाला आढळला. त्यामध्ये व्हायरल न्यूजपेपर कटिंग Source – SM या कॅप्शनखाली शेयर करण्यात आल्याचे आम्हाला दिसले.

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट

यावरून दि. १८ नोव्हेंबर २०२४ रोजी @someshkolge या युजरने व्हायरल स्क्रिनशॉट सोशल मीडियाचा हवाला देऊन शेयर केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

दरम्यान शिवसेना (UBT) च्या खासदार प्रियांका चतुर्वेदी यांनी केलेले एक ट्विट आणि तेच ट्विट शिवसेना युवानेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी स्वतंत्र कॅप्शनसह रिट्विट केले असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

प्रियांका चतुर्वेदी यांनी आपल्या ट्विट मध्ये “या सर्व फसवणुक प्रधान पत्रकारांना लाज नाही, याहून लाजिरवाणी गोष्ट म्हणजे वृत्तवाहिन्या त्यांना खोट्या बातम्या पसरवण्यासाठी लांबलचक रस्सी देत आहेत. @abpmajhatv त्यांच्या ब्युरो चीफवर कारवाई करणार की दुसरीकडे बघणार?” (मराठी भाषांतर) असे म्हटले. तर आदित्य ठाकरे यांनी “@ABPNews ची खरी लिटमस टेस्ट, खोटेपणा आणि द्वेष पसरवण्यासाठी ते मौन काळात प्रचारप्रमुखासारखे धर्मांध वागतील की ते कारवाई करतील? किती खेदजनक स्थिती आहे.” (मराठी भाषांतर) असे म्हटल्याचे दिसून आले.

यावरून पोस्ट करण्यावरून ज्या व्यक्तीला टोकले जात आहे त्या व्यक्तीबद्दल ते बोलत असल्याचा आम्हाला संशय आला. यावरून @someshkolge या युजरच्या X अकाउंटवर जाऊन आम्ही पाहिले असता, संबंधित पोस्ट डिलिट केलेली असल्याचे आणि बायो तपासाला असता संबंधित व्यक्तीने “Journalist, Anchor, Columnist, Law & Economics enthusiast, views expressed on my social profile are personal.” अशी आपली माहिती लिहिली असल्याचे समजले.

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट
Courtesy: X@someshkolge

दरम्यान आम्ही संबंधित पत्रकार सोमेश कोलगे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. संबंधित पोस्ट खरी आहे का? उद्धव ठाकरेंनी दंगलीच्या मुद्द्यावरून माफी कुठे आणि कधी मागितली याचे तपशील आहेत का? तसेच आपण केलेली पोस्ट डिलीट का केली? हे जाणून घेण्याचा प्रयत्न आम्ही केला. मात्र आपण सध्या व्यग्र असून बोलू शकत नाही. अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान त्यांनी प्रतिक्रिया दिल्यास हा लेख अपडेट केला जाईल.

शिवसेना (UBT) ची अशी भूमिका

एकंदर प्रकाराविषयी जाणून घेण्यासाठी आम्ही शिवसेना (UBT) च्या नेतेमंडळींशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र निवडणूक अखेरच्या टप्प्यात असल्याने कोणी उपलब्ध होऊ शकले नाही. दरम्यान पक्षाने आपल्या अधिकृत X खात्यावरून केलेले १९ नोव्हेंबर २०२४ चे ट्विट आम्हाला मिळाले.

Explainer: १९९२ च्या दंगलीवरून २०२४ च्या निवडणुकीच्या तोंडावर राजकीय दंगल माजविणाऱ्या खळबळजनक पोस्टची गोष्ट

“फेक बातम्यापासून सावध रहा, फेक बातम्या पसरवणाऱ्या पासून महाराष्ट्राला वाचवा!” असे संबंधित व्हायरल पोस्टच्या फोटोसह संबंधित ट्विटमध्ये म्हटले आहे.

अशाप्रकारे आम्हाला १९९२ च्या दंगलीच्या मुद्द्यावरून झालेल्या पोस्टमुळे ढवळून निघालेल्या राजकीय वातावरणातून निवडणुकीच्या काळात निर्माण झालेल्या परिस्थितिची कल्पना आली. पोस्ट करणाऱ्यांनी शिवसेना नेते उद्धव ठाकरेंवर केलेला माफी मागितल्याचा दाव्याला पुष्टी मिळणारी माहिती उपलब्ध नाही.

Our Sources
Viral Claims
Comments on viral claims
Tweet made by Adity Thaackrey on November 18, 2024
Tweet made by MP Priyanka Chaturvedi on November 18, 2024
Tweet made by Shivsena(UBT) on November 19, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular