Thursday, December 19, 2024
Thursday, December 19, 2024

HomeFact Checkन्या. एस मुरलीधर यांचा कांग्रेसशी संबंध होता का? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

न्या. एस मुरलीधर यांचा कांग्रेसशी संबंध होता का? वाचा व्हायरल दाव्याचे सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim

कपिल मिश्रांचे भाषण एेकणारे न्यायाधीश एस मुरलीधर कांग्रेस नेते मनीष तिवारींचे असिस्टंट होते तर सोनिया गांधी यांचा उमदेवारी अर्ज भरताना ते त्यांचे वकील म्हणून हजर होते.

Verification
दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश एस मुरलीधर यांंच्याविषयी सध्या सोशल मीडियात काही पोस्ट व्हायरल होत आहेत यात दावा करण्यात आला आहे की, कपिल मिश्रा यांचे भाषण एेकणारे जज साहेब ते जज होण्याआधी  10 वर्षांपर्यंत कांग्रेसचे नेते मनीष तिवारी यांचे असिस्टंट होते तक कांग्रेसच्या काळात काॅलेजियमनेच त्यांना हायकोर्टाचे जज केले होते. एवढेच नाही तर सोनिया गांधी यांचा उमेदवारी अर्ज भरताना ते त्यांचे वकील होते.
आम्ही सोशल मीडियात व्हायरल होत असलेल्या या दाव्याची पडताळणी करण्याचे ठरविले. दिल्लीत  दिल्ली हायकोर्टाचे न्यायाधीश ए. मुरलीधर यांची बदली करण्यात आल्याने नुकतीच बदली करण्यात आल्याने ने अनेक प्रतिक्रिया सोशल मीडियामध्ये आल्या आहेत. आम्ही न्या. एस मुरलीधर यांच्याविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला. याबाबत आम्हाला आज तक या वृत्तवाहिनीच्या
आर्टिकलमध्ये त्यांच्याविषयी माहिती मिळाली. यात व्हायरल पोस्टमधील करण्यात आलेल्या दाव्याशी एकही मिळता जुळता दावा आढळून आला नाही. त्यांचा कांग्रेस नेते मनीष तिवारी यांच्याशी संंबंध असल्याचा किंवा सोनिया गांधीचें वकील म्हणून काम पाहिल्याचा कोणताही उल्लेख यात नाही.
याशिवाय दिल्ली हायकोर्टाच्या वेबसाईटवर न्या. एस. मुरलीधर यांच्याविषयी माहिती मिळाली त्यातही त्यांनी सोनिया गांधीचे वकील म्हणून काम केल्याचा उल्लेख नाही.
आम्ही सोनिया गांधी यांच्यासोबत अर्ज भरताना वकील म्हणून सोबत असणा-या व्यक्तीबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने शोध घेतला असता samarsaleel.com या वेबसाईटवर बातमी आढळून आली. सोनिया गांधी यांनी एप्रिल 2019 मध्ये लोकसभा निवडणुकीत रायबरेली या मंतदार संघातून पाचव्यांदा अर्ज भरला होता. त्यावेळी त्यांच्या सोबत असणा-या व्यक्तींची नावे या बातमीत दिली आहेत. यात अॅडव्होकेट के. कौशिक हे सोनियांचे वकील म्हणून हजर असल्याचे म्हटले आहे.
आम्ही के. सी कोशिक यांच्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला लिंक्ड इन वर त्यांचे प्रोफाइल आढळून आहे. कोशिक हे सुप्रीम कोर्टात वकीली करतात.
यावरुन हेच स्पष्ट होेते की न्या. एस. मुरलीधर यांच्याबाबत व्हायरल पोस्टमध्ये करण्यात आलेले दावे भ्रामक आहेत. सोनिया गांधी यांचे नामांकन दाखल करताना न्या. मुरलीधर नव्हेत तर अॅडव्होकेट  केसी कौशिक उपस्थित होते.
sources
Twitter Advanced Search
Facebook Search
Google Search
Result- False 
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular