Claim–
मनुवादी व्यक्तीने ओळख लपवून तुपाच्या डब्यात लपवून हत्यारे आणली. पोलिसांनी रस्त्यातच पकडले.
Verification–
ट्विटर वर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. यात काही लोक तुपाच्या दोन बरण्यातून लपवून आणललेली पिस्तुले बाहेर काढताना दिसत आहेत. ट्विटमध्ये म्हटले आहे की मनुवादी व्यक्ती तुपाच्या डब्यात हत्यारे लपवून आणत होता.त्याला रस्त्यातच पकडले गेले.
आम्ही बाबतीत पडताळणी करण्याचे ठरवले. काही कीवर्डस्च्या आधारे याबाबत शोध घेतला असता आम्हाला या संदर्भात मागील वर्षीच्या अनेक बातम्या आढळून आल्या.
शोध सुरुच ठेवला असता नवभारत टाईम्सचे ट्विट मिळाले ज्यात हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.
नवभारत टाईम्सच्या बातमीनुसार, दिल्ली पोलिसांच्या विशेष टीमने तुपाच्या डब्ब्यात 26 पिस्तुले आणि मॅगझीन लपवून आणणा-या मध्यप्रदेशातील जितेंद्र उर्फ जीतू (25) आणि आग्रा येथील राज बहादुर (30) दोघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सगळा माल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हे दोघे तस्कर दिल्ली- एनसीआरमध्येआॅन डिमांड हत्यारे आणि काडतुसांची डिलीव्हरी करण्यासाठी आले होते. या टोळीने याआधीही दिल्लीमध्ये अनेक वेळा हत्यारे आणून विकली आहेत.
आज तक या वृत्तवाहिनीच्या वेबसाईटवरील बातमीनुसार मध्यप्रदेशातील खरगौन येथून ही हत्यारे आणून दिल्ली-एनसीआरमध्ये विकली जात होती. वरील कोणत्याही बातमीत आरोपी हे मनुवादी असल्याचा किंवा कोणत्या धार्मिक किंवा कट्टर संघटनेशी जोडले गेले आहेत याचा उल्लेख नाही. ते अट्टल तस्कर असल्याचा व त्यांनी मागणीनुसार हत्यारांचा पुरवठा केल्याचे उघड झाले आहे.
यावरुन हेच स्पष्ट होते की, सोशल मीडियामध्ये केलेला दावा हा भ्रामक आहे शिवाय ही घटना या वर्षीची नाही तर मागील वर्षीची आहे.
Sources
Twitter Advanced Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)