Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkस्मृति इराणींनी शिवजयंती निमित्त छत्रपति शिवाजी महाराजांएेवजी शेअर केला संभाजी महाराजांचा फोटो 

स्मृति इराणींनी शिवजयंती निमित्त छत्रपति शिवाजी महाराजांएेवजी शेअर केला संभाजी महाराजांचा फोटो 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim:

मंत्री स्मृती इराणींनी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मराठीत ट्विट करुन केले अभिवादन फोटोही शेअर केला. 

 
 
Verification
 
केंद्रीय मंत्री स्मृति इराणी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जंयती निमित्त मराठीत ट्विट करुन त्यांना अभिवादन केले आहे. यात त्यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा फोटो शेअर केला असून म्हटले आहे की- महाराष्ट्र आणि भारताचे आराध्य दैवत व स्फूर्तीस्थान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त त्रिवार अभिवादन. आमच्या एका वाचकाने या ट्विटचा स्क्रिनशाॅट आम्हाला पाठवला असून शिवाजी महाराजांच्या फोटोची सत्यता पडताळण्यास सांगितले आहे. 
 
आम्ही छत्रपति शिवाजी महाराजांच्या फोटोचा शोध घेतला असता  Shutterstock वर आम्हाला घोड्यावर स्वार झालले छत्रपति शिवाजी महाराजांच्या पुतळयाचा फोटो आढळून आला. 
 
 
याशिवाय सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा फोटो देखील आढळून आला. यात देखील शिवाजी महाराज घोड्यावर स्वार आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांचे असे पुतळे महाराष्ट्रात जागोजागी आढळून येतात. 
 
पुतळ्याचा हा फोटो स्मृती इराणी यांनी शेयर केलेल्या फोटोशी मिळता जुळता आहे. पण शिवाजी महाराजांचा हा फोटो घोड्यावरील आहेत इराणींच्या ट्विटमधील फोटो हा सिंहाच्या मानेवर पाय देऊन उभा राहिल्याचा आहे. त्यामुळे आम्हाला या फोटोबद्दल शंका आली आणि आम्ही हा पुतळा नेमका कुणाचा आणि कुठला आहे याचा शोध घेण्याचे ठरविले. गूगल रिव्हर्स इमेजच्या साहाय्याने याचा शोध घेतला असता scoopwhoop.com या वेबसाइट वर छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर प्रकाशित झालेल्या लेखात हा पुतळ्याचा व्हायरल फोटो आढळून आला. 
 
 
 
विकिपीडिया मध्ये देखील संभाजी महाराजांचा हा पुतळा प्रकाशित करण्यात आला आहे। याशिवाजी छत्रपती संभाजी महाराज यांच्या नावाने प्रसिद्ध असलेली संघटना संभाजी ब्रिगेड च्या लोगोमध्ये देखील याच पुतळ्याचा फोटो आहे. 
 
 
 
परंतू हा पुतळा नेमका कुठे आहे याबाबत माहिती उपलब्ध नसल्याने आम्ही शोध सुरु ठेवला असता यूट्यूब वर एक व्हिडिओ आढळून आला यात हा पुतळ्याचा फोटो पाहायला मिळाला. व्हिडिओत म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यातील वढू बुद्रूक या गावात हा पुतळा असून तेथे छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांची समाधी आहे. 
 
 
यानंतर आम्ही वढू गावातील लोकांशी संपर्क केला असता स्थानिक नागरिक पांडुरंग अरगडे यांनी सांगितले की हा पुतळा वढु गावातच आहे. याच गावात औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे करुन फेकून दिले होते नंतर ते तुकडे गोळा करुन त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 
 
 
छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज बीजेपीचे राज्यसभा सदस्य छत्रपती संभाजीराजे भोसले हे देखील अनेकवेळा वढू गावात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले त्यांचा फोटोही शेअर केला. 
 
यावरुन हेच सिद्ध होते की  स्मृति इराणी यांनी शिवजयंती दिवशी छत्रपति शिवाजी महाराज यांच्या फोटो एेवजी त्यांचे पुत्र छत्रपति संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचा फोटो शेअर केला आहे.
 
Sources
 
Google Search 
Direct Contact
 
Result- Misleading
 
 
 (कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Most Popular