After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim– Angry Public is chasing away police in assam after NRC
मराठी अनुवाद- आसामममध्ये एनआरसी विरोधात आंदोलन करताना जनतेने पोलिसांना पळवून लावले.
Verification-
फेसबुक वर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. वीडियोमध्ये या व्हिडिओत काही लोक पोलिसांच्या मागे धावताना दिसत आहेत. पोस्ट शेअर करणा-या युजरचा दावा आहे की व्हिडिओ मध्ये दिसत असलेली घटना ही आसाममधील आहे, तिथे एनआरसी बिलाविरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे. विरोधासाठीच तेथील जनता पोलिस कर्मचा-यांना पळवून लावत आहे. फेसबुकवर या व्हिडिओला हजारो वेळा शेअर केले
आहे.
आम्ही या व्हिडिओसंदर्भात पडताळणीसाठी आसाममधील सध्ध्या बातम्यांचा शोध गुगलवर घेतला असता या व्हायरल व्हिडिओसंबंधी अशी कोणतीही बातमी आढळून आली नाही.
यानंतर आम्ही फेसबुक पोस्टवरील कमेंट वाचण्यास सुरवात केली. याच दरम्यान आम्हाला एकामध्ये हा व्हिडिओ मराठा आरक्षण आंदोलनाचा आहे हे लिहिलेले आढळून आले.
यानंतर आम्ही या व्हिडिओतून काही स्क्रिनशाॅट्स काढले आणि काही किवर्ड्स मदतीने गुगलमध्ये शोध घेतला। या दरम्यान युट्यूबवर पुणे समाचार नावाच्या चॅनलवर व्हायरल व्हिडिओ आढळून आला.
पुणे समाचारच्या बातमीनुसार हा व्हिडिओ औरंगाबादमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी केलेल्या आंदोलानाचा आहे. आरक्षणासंबंधी मागण्या पूर्ण न झाल्याने मराठा समाजाच्या युवकांनी आपला राग पोलिसांवर अशा प्रकारे व्यक्त केला. या व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही गुगलवर बारकाईने शोध घेतला असता आम्हाला
इकाॅनाॅमिक टाईम्सची एक बातमी आढळून आली.
याशिवाय आम्हाला इंडिया टुडे च्या युट्यूब चॅनलवरही हा व्हिडिओ आढळून आला. यातही हा व्हिडिओ मराठा आंदोलनाचा असल्याचे म्हटले होते. यावरुन हा व्हिडिओ महाराष्ट्रातील औरंगाबाद येथील मराठा आंदोलनाचा असल्याची पुष्टी मिळाली.
आमच्या पडताळणीत स्पष्ट झाले की व्हायरल व्हिडिओचा आसामशी काहीच संबंध नाही. सोशल मिडियात हा व्हिडिओ चुकीच्या दाव्यानिशी व्हायरल होत आहे.
Tools Used
- Google Search
- Youtube Search
- Facebook
Result- Misleading
वाचकांसाठी – जर आपणास आमच्या लेखात कही त्रुटी आढळल्या किंवा एखाद्या पोस्ट संदेश किंवा बातमीविषयी संभ्रम निर्माण झाला तर योग्य माहिती मिळवण्याकरिता आम्हाला checkthis@newschecker.in वर मेल करु शकता.
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.