After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
Claim-
Ajit Pawar gets a Clean Chit from ACB in ₹70,000 Crore Irrigation Scam today. This is the reality of Modi’s India. You are corrupt if you’re against BJP but as soon as you support BJP all corruption charges will be forgiven instantly
मराठी अनुवाद –
अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिली आहे. हेच आहे मोदींच्या भारताचे सत्य. जर तुम्ही भाजपविरोधी असाल तर भ्रष्ट आहात आणि जर भाजपाचे समर्थन केले तर भ्रष्टाचाराचे सर्व आरोप लगेच माफ केले जातात.
Verification-
महाराष्ट्रात सध्या सुरु असलेल्या राजकारणाच्या महानाट्यादरम्यान सोशल मिडियात सगळ्यांना अचंबित करणारा एक नवीन दावा व्हायरल होत आहे. या दाव्यानुसार राज्याचे नवनिर्वाचित उप मुख्यमंत्री अजित पवार यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 70 हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्यात क्लीन चिट दिली आहे. अजित पवार यांनी तीन दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काॅंग्रेस पक्षातून बंडखोरी करुन भाजपा सोबत सरकार स्थापन केले होते. भाजपचे देवेंद्र फडणवीस यांनी तर अजित पवार यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली)
Dhruv Rathee सोबतच अन्य काही ज्येष्ठ पत्रकारांनी देखील सिंचन घोटाळ्या संंबंधीची ही बातमी शेअर केली होती. पण काही वेळानंतर ध्रुव राठीने आपली फेसबुक पोस्ट डिलीट केली मात्र तुम्ही या
लिंक वर ती पाहू शकता.
सोमवारी अनेक टिव्ही चॅनलमध्ये ही बातमी दाखवण्यात आली शिवाय काही पत्रकारांनी देखील ही बातमी ट्विटर वर शेअर केली. याच्या काही लिंक्स आपण खाली पाहू शकता.
राजदीप सरदेसाई यांनी केलेले ट्विट आपण खालील लिंक वर क्लिक करुन पाहू शकता.
The Wire ( द वायर या प्रसिद्ध न्यूज वेबसाईटचे चे ट्विट खालील लिंक वर पाहू शकता.
Times Now ने देखील या संदर्भात ट्विट केले होते.
याशिवाय
लोकमतमध्ये देखील ही बातमी छापून आली होती. यात म्हटले आहे की कथित सिंचन घोटाळाप्रकरणी लाललुचपत प्रतिबंधक विभागाने अजित पवार यांना क्लिनचीट देताच भाजपचे प्रवक्ते अवधूत वाघ यांनी त्यांचे अभिनंदन करणारे ट्विट केले मात्र काही वेळातच ते ट्विट वाघ यांनी डिलीट केले.
सिंचन घोटाळ्याचे नेमके प्रकरण काय आहे हे आपण
लोकसत्ता मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात तसेच
आज तक या वेबसाइटवरील लेख वाचू शकता.
हे दोन्ही लेख वाचल्यानंतर आम्ही खरंच केंद्र सरकाने अजित पवार यांना क्लीन चिट दिली आहे का याबाबत पडताळणी सुरू केली. याबाबत आम्हाला इंडिया टुडे मध्ये प्रसिद्ध झालेला
लेख मिळाला. यात म्हटले आहे की लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला 3000 प्रकरणापैकी 9 प्रकरणात अजित पवार यांचा संबंध आढळून आला नाही.
यानंतर आम्हाला एएनआय या वृत्त संस्थेचे ट्विट्स देखील आढळून आले यात म्हटले आहे कि एसीबीचा रिपोर्ट चुकीच्या दाव्याने सोशल मिडियात व्हायरल होत आहे.
याशिवाय NDTV च्या वेबसाइट वर प्रसिद्ध एक
लेख मिळाला ज्यात म्हटले आहे कि फक्त नऊ प्रकरणामंध्ये अजित पवार यांचा संबंध आढळून आलेला नाही.
याशिवाय आम्हाला लाचलुचपत विभागाचे DG यांचे या संदर्भाततले वक्तव्य आढळून आले.
Newschecker.in च्या पडताळणीत व्हायरल दावा खोटा असल्याचे सिद्ध झाले आहे. हा दावा लोकांमध्ये भ्रम निर्माण करण्याच्या उद्देशाने सोशल मिडियात व्हायरल करण्यात आला.
Tools Used
Result- Misleading
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.