Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkपुणे -सोलापूर ट्रेनमध्ये सापडली नाहीत ही भावंडे, जाणून घ्या नेमके काय आहे...

पुणे -सोलापूर ट्रेनमध्ये सापडली नाहीत ही भावंडे, जाणून घ्या नेमके काय आहे सत्य? 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Claim– पुण्यावरुन सोलापूरला जाणा-या ट्रेनमध्ये ही मुलगी सापडली आहे. तिला सुखरुप घरी पोहचवण्यासाठी हा मॅसेजे पुढे पाठवा.

Verification
व्हाट्सअॅपवर सध्या एक मॅसेज व्हायरल होत असून यात एका लहान मुलीचा आणि मुलाचा फोटो व्हायरल होत आहे. मुलीचे नाव प्रांजली अतिश गायकवाड असे असून ही भावंडे पुण्याहून सोलापूरकडे जाणा-या ट्रेनमध्ये सापडल्याचा दावा मॅसेजमध्ये करण्यात आला आहे. हा मॅसेज पुढे पाठवण्याची विनंती ही करण्यात आली आहे.
आम्ही याबाबत पडताळणी सुरु केली असता आॅगस्ट 2019 मधील एका ट्विटमध्ये हा फोटो आढळून आला. या ट्विटमध्ये देखील हेच म्हटले आहो की, जीवनात काही करुन दाखवायचे असेल तर या मुलीला तिच्या घरच्यांची भेट घडवून आणा.
यावरुन हे लक्षात आले की मागील काही महिन्यांपासून हा फोटो सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहे पण या मुलीविषयी पूर्ण माहिती मिळत नव्हती म्हणून आम्ही शोध सुरुच ठेवला. जुलै 2019 मधील एका ट्विटमध्ये हा फोटो आढळून आला यात म्हटले होते ही ही मुले आग्र्यातील सदर बाजार पोलिस ठाण्यात आहेत. यांच्याविषयी काही माहिती मिळत नाही. हा मॅसेज जास्तीत जास्त शेयर करा.
या ट्विटला आग्रा पोलिसांनी उत्तर दिलेले असून यात म्हटले आहे की, हे प्रकरण प्रयागराज येथील असून पोलिसांनी या भावंडाना त्यांच्या पालकांकडे सुखरुप पोहचविले आहे.
यावरुन हेच सिद्ध होते की पुणे सोलापूर ट्रेनमध्ये ही भावंडे आढळून आलेली नाहीत. मागील वर्षीच्या प्रकरणाचे फोटो आत्ता सोशल मीडियात व्हायरल करुन भ्रामकता निर्माण केल जात आहे. हा फोटो अनेकवेळ वेगवेगळया शहरांच्या नावाने सोशल मीडियात शेअर झालेला आहे.
Sources 
Twitter Advanced Search
Google Search
Result- Misleading
(कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.)

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular