Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeCoronavirusपुण्यात सार्वजनिक रस्त्यावर कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही, भ्रामक दावा व्हायरल 

पुण्यात सार्वजनिक रस्त्यावर कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही, भ्रामक दावा व्हायरल 

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

दावा

  पुण्यात कोरोनाचे रुग्ण सार्वजनिक रस्त्यावर सापडण्यास सुरुवात झाली आहे. 

सोशल मीडियामध्ये एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात भररस्त्यात पडलेल्या एका व्यक्तीला उचलून एम्बुलेंसमध्ये घेऊन चालले असल्याचे दिसत आहे. दावा करण्यात येत आहे की, हा व्हिडिओ पुण्यातील असून शहरात आता सार्वजनिक रस्त्यावर देखील कोरोनाचे रुग्ण सापडू लागले आहेत. 

पडताळणी

आम्ही या संदर्भात पडताळणी सुरु केली असता आम्हाला फेसबुकवर याच दाव्याच्या पोस्ट आढळून आल्या. 

फेसबुक/संग्रहित

हा व्हिडिओ व्हाटसएप्पवर देखील मोठ्या प्रमाणात याच दाव्याने शेअर करण्यात येत आहे.

आम्ही पुण्यात खरंच कोरोनाचे रुग्ण रस्त्यावर सापडू लागले आहेत का? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. यासंदर्भात अधिक शोध सुऱु केला. मात्र मुख्य प्रवाहातील माध्यमांत कोरोनाचे रुग्ण सार्वजनिक ठिकाणी सापडत असल्याची बातमी आढळून आली नाही. याबाबत शोध सुरुच ठेवला असता एका फेसबुक पोस्टमध्ये पोलिसांनी हा व्हिडिओ माॅकड्रिलचा असल्याची माहिती दिल्याचे म्हटले  आहे. 

https://www.facebook.com/watch/?v=272797077300021

याशिवाय स्थानिक बातम्यांची वेबसाईट MPC NEWS ने देखील हा व्हिडिओ माॅकड्रिलचा असल्याची बातमी दिली आहे. बातमीत महापौरानी ह्या व्हिडिओबाबत अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले असल्याचे म्हटले आहे. 

याशिवाय महापौर मुरलीधर मोहोळ यांनी याबद्दल ट्विटरवर देखील याबाबत माहिती दिल्याचे आढळून आले. ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, पुण्यात आज डेक्कन परिसरात कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मॉक ड्रिल करण्यात आले होते. सर्व यंत्रणांची सतर्कता तपासण्यासाठी हे मॉक ड्रिल करण्यात येत असते. मात्र या व्हिडीओचा वापर करुन वेगळ्या अर्थाने समाजमाध्यमांमध्ये पसरवला जात आहे. कृपया आपण सर्वांनी याची नोंद घ्यावी !

यावरुन हेच स्पष्ट होते की, पुण्यात सार्वजनिक ठिकाणी कोरोनाचा रुग्ण सापडलेला नाही तर सर्व यंत्रणांनी सतर्क राहण्यासाठी माॅक ड्रिल करण्यात आले होते. याच माॅक ड्रिलचा व्हिडिओ चुकीच्या दाव्याने सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. 

Source 

Facebook, Whatsapp,Twitter

Result– Misleading  

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular