Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
अरुण पुदूर यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट केला आहे. हा फोटो गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या पत्रकार परिषदेचा आहे. यात कॉंग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ एक पुरुष व एक महिला दिसत आहे. हीच महिला हाथरस प्रकरणातील ‘नक्षली भाभी’ आहे व याच महिलेला प्रियंका गांधींनी मिठी मारली असल्याचा दावा करण्यात येत आहे.
इतर काही ट्विटर युजर्सनी देखील हा दावा केला आहे.
Fact Check/Verification
हाथरसच्या ‘नक्षल भाभी’च्या व्हायरल फोटोची सत्यता जाणून घेण्यासाठी आम्ही पडताळणी सुरू केली. व्हायरल फोटो बारकाईने पाहिला असता कोणत्याही व्यक्तीने मास्क घातलेला नाही हे आढळून आले. यावरुन हा फोटो सध्याचा नाही हे लक्षात आले. काही किवर्डसच्या मदतीने आम्ही शोध घेतल्यानंतर आम्हाला Indian National Congress Goa च्या अधिकृत फेसबुक पेजवर फेसबुक लाईव्हचा व्हिडिओ आढळला.
हा व्हिडिओ 28 सप्टेंबर 2019 रोजी कॉंग्रेस पक्षाने पत्रकार परिषद घेतलेली होती त्याचा आहे. यावरून हे सिद्ध होते की व्हायरल चित्रात दिसणारी महिला ‘नक्षली भाभी’ काॅंग्रेस नेत्या प्रतिभा बोरकर आहेत.
आम्ही फेसबुकवर प्रतिभा बोरकर यांचे प्रोफाइल शोधले असता आम्हाला त्यांचे प्रोफाईल आढळून आले. त्यांच्या फेसबुक प्रोफाइलचा कव्हर फोटो आणि व्हायरल फोटो एकच आहे. यावरुन हेच सिद्ध झाले की त्यांचा फोटो चुकीच्या दाव्याने व्हायरल झाला आहे.
अधिक शोध घेतला असता आम्हाला 1 ऑक्टोबर 2020 रोजी इंडियन नॅशनल कॉंग्रेस गोव्याच्या अधिकृत फेसबुक पेजवरून हाथरस प्रकरणासंबंधी पत्रकार परिषदेचा एक व्हिडिओ सापडला
व्हिडीओमध्ये दिसणारी महिला आणि व्हायरल फोटोत दिसणारी महिला एकच आहे हे आपण पाहू शकता.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, गोवा प्रदेश कॉंग्रेस कमिटीच्या सोशल मीडिया प्रभारी प्रतिभा बोरकर यांचा फोटो हाथरथ प्रकरणातील नक्षली म्हणून व्हायरल केला जात आहे.
Result: False
Our Sources
Facebook https://www.facebook.com/pratibha.borkar
Facebook https://www.facebook.com/INCGoa/videos/383968355633482
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.