Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
मुकेश अंबानींनी नातू जन्मल्याच्या आंनदात दिलेल्या पार्टीत मुख्यमत्र्यांसह सेलिब्रिटींकडून उल्लघंन झाल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. मुकेश अंबांनी यांना नातू झाला. या आनंदात आयोजित पार्टीत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सेलिब्रिटी मंडळी सुद्धा सामील झाले होते. या सर्वांनीच कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी घातलेल्या निर्बंधांचे उल्लघंन केलाे असल्याचा दावा करणारा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे.
व्हायरल व्हिडिओची सत्यता शोधण्यासाठी आम्ही तपास सुरू केला. प्रथम, आम्ही या व्हिडिओतील काही फ्रेम्सचा गूगल रिव्हर्सच्या माध्यमातून प्रतिमेचा शोध घेतला असता या संदर्भात बरीच माहिती मिळाली. व्हायरल व्हिडिओ होत असलेला व्हिडिओ आधीपासूनचा यु्ट्यूब वर उपलब्ध आहे असेल आढळून आले. तर एक वर्ष जुना आहे, 3 सप्टेंबर 2019 चा आहे. अंबानी कुटुंबातील नातूचा जन्म यावर्षी डिसेंबरमध्ये झाला होता. वर्षभरापूर्वी मुकेश अंबानी यांनी गणेश चतुर्थीची पूजा घरात ठेवली. त्यावेळी त्यांनी देशातील सर्व नामवंत लोकांना आमंत्रित केले होते. हा व्हिडिओ त्याच वेळचा आहे.
याशिवाय इंडियन एक्सप्रेसच्या युट्यूब चॅनलवर देखील आम्हाला 3 सप्टेंबर 2019 रोजी अपलोड करण्यात आलेला व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओत बिग बी अमिताभ बच्चन सह सचिन तेंडुलकर रेखा सह दिग्गज लोक समारंभासाठी उपस्थित असल्याचे दिसत आहे.
आम्हाला या व्हिडिओशी संबंधित लेख देखील इकॉनॉमिक टाइम्सc आढळला. ज्यामध्ये मुकेश आणि नीता अंबानी यांच्यासह सर्व पाहुण्यांनी समान ड्रेस घातला होता जो व्हिडिओमध्ये दिसत आहे. कोरोनामुळे यावर्षी देशात लॉकडाउन लादण्यात आला आहे. अशा परिस्थितीत मुकेश अंबानी यांच्या कुटुंबीयांनी नियमांचे उल्लंघन केले नाही हे एका वर्षाच्या जुन्या व्हिडिओने सिद्ध केले आहे.
याशिवाय आम्हाला च्या फेसबुक पेजवर हा व्हिडिओ अपलोड केल्याचे देखील आढळून आले.
Conclusion
मुकेश अंबानी यांच्या पार्टीचा सोशल मीडियावर सध्या व्हायरल होण्याचा व्हिडिओ एक वर्ष जुना आहे. 2019 मध्ये मुकेश अंबानी यांच्या घरी गणेश चतुर्थीची पूजा आणि पार्टी आयोजित केली गेली होती. त्याचाच व्हिडिओ सोशल मीडियावर खोट्या दाव्यांसह शेअर केला जात आहे.
Result: Misleading
Our Sources
Indian Express- https://www.youtube.com/watch?v=bjjmb_a7DH8
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.