Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
सावित्रीबाई फुलेंनी पुण्यात सुरु केलेल्या पहिल्या मुलींच्या शाळेचा फोटो असल्याच्या दाव्याने एक मुलीच्यां ग्रुपचा फोटो व्हायरल होत आहे. या ब्लॅक अॅंड फोटोत काही छोट्या मुली भिंतीला खेटून असलेल्या बाकावर ओळीने बसल्याचे दिसत आहेत. पोस्टमध्ये म्हटले आहे की, “भिडेवाडयात पुणे येथे सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेली पहिली मुलींची शाळा…. स्ञी शिक्षणाला खरी सुरूवात दुर्मिळ असा फोटो … सलाम या मातेला.”
Fact Checking/Verification
सोशल मीडियात शेअर होत असलेला फोटो खरंच महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेचा आहे का याचा शोध घेण्यास आम्ही सुरुवात केली. काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला मात्र या फोटो संबंधी माहिती मिळाली नाही. यानंतर हा फोटो रिव्हर्स इमेजच्या मदतीने शोधला असता शेअरचॅट या सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर हाच फोटो फुले दांपत्याने पुण्यात सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेचा असल्याच्या दाव्याने शेअर करण्यात आल्याचे आढळून आले.
अधिक शोध घेतला असता आम्हाला हा फोटो अनेक वेबसाईटवर वेगवेगळ्या दाव्यानिशी शेअर केला गेल्याचे आढळून आले. एका ट्विटमध्ये देखील हा फोटो आढळून आला. मात्र यात म्हटले आहे की हा फोटो सिंध प्रांतातील मुलींच्या शाळेचा 1873 मधील आहे. तसेच यात ब्रिटिश लायब्ररीचा उल्लेख करण्यात आला आहे.
ट्विटमधील दावा कितपत खरा आहे याचा शोध घेण्यासाठी आम्ही ब्रिटिश लायब्ररीच्या वेबसाईटला भेट दिली काही किवर्डसच्या आधारे शोध घेतला असता आम्हाला एका लेखात व्हायरल फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की, ही मुलींची शाळा पाकिस्तानमधील सिंध प्रांतातील असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने हा फोटो मिळविला आहे. हा फोटो मिची आणि कंपनीने 1873 साली काढलेला आहे.
Conclusion
यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल होत असलेला महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी सुरु केलेल्या मुलींच्या पहिल्या शाळेचा नसून पाकिस्तानातील सिंध प्रातातील शाळेचा आहे.
Result: Misleading
Our Sources
ब्रिटिश लायब्ररी- https://www.bl.uk/onlinegallery/onlineex/apac/photocoll/c/019pho001000s46u04660000.html
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.