Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.
या सप्ताहात Newschecker.in ने सोशल मीडियात व्हायरल झालेला अनेक फेक न्यूजचा पर्दाफाश केला. अमेरिकेने शंभर डाॅलर च्या नोटेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापला असल्याचा दावा तसेच महेंद्रसिंग धोनीने दिल्लीतील ट्रॅक्टर परेडला समर्थन दिल्याचा दावा व्हायरल झाला. याशिवाय नेताजी सुभाषचंद्रबोस आणि संत गजानन महाराज यांची अकोल्यात भेट झाली होती असा दावा करणारा फोटो देखील सोशल मीडियात शेअर होत आहे. हे आणि इतर काही दावे WhatsApp आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफाॅर्मवर व्हायरल होत आहेत. कदाचित आपणास देखील हे दावे पहायला मिळाले असतील. आपण इथे या सप्ताहातील टाॅप फेक न्यूज वाचू शकता.
अमेरिकेने डाॅलरवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो छापल्याचा दावा
अमेरिकन डाॅलरवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो असलेली शंभरची नोट शेअर केली आहे. हिंदीमधील या पोस्टमध्ये म्हटले आहे की, जे काम भारत करु शकला नाही ते काम अमेरिकने करुन दाखवलं. पण हे सत्य नाही. अमेरिकेच्या 100 डाॅलरच्या नोटेवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो छापण्यात आलेला नाही. सोशल मीडियात फोटोशाॅप्ड इमेज व्हायरल झाली आहे. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथेे वाचा.
महेंद्रसिंग धोनीने शेतक-यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर परेडला समर्थन दिल्याचा दावा
महेंद्रसिंग धोनीने शेतक-यांच्या दिल्लीतील ट्रॅक्टर परेडला समर्थन दिले असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. पोस्टमध्ये धोनीचा ट्रॅक्टरवर उभा राहिल्याचा फोटो शेअर केला असून यात म्हटले आहे की, भारतीय क्रिकेट टीमचे माजी कप्तान महेंद्रसिंग धोनीने दिल्लीत 26 जानेवारीला होणा-या शेतक-यांच्या ट्रॅक्टर परेडचे समर्थन केले आहे. पण हे सत्य नाही. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज असल्याचा दावा
श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो. हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तेंव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांचे घरी काढला आहे असा दावा व्हायरल झाला आहे पण हे सत्य नाही. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत संत गजाजन महाराज नसून पुरी येथील शंकराचार्य आहेत. याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
दिल्लीतील ट्रॅक्टर परेडच्या वेळी लाठीचार्जमुळे जखमी झालेला नाही व्हायरल फोटोतील व्यक्ती
दिल्लीतील ट्रॅक्टर परेडच्या वेळी लाठीचार्जमुळे एक शेतकरी गंभीररित्या जखमी झाल्याचा फोटो सोशल मीडियात शेअर होत आहे. यात म्हटले आहे की, दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीदरम्यान पोलिसांनी लाठीचार्ज केल्यामुळे एक आंदोलक शेतकरी गंभीररित्या जखमी झाला आहे. फोटोतील व्यक्तीच्या पाठीवर जखमा झाल्याचे दिसत आहेत. पण हा फोटो दिड वर्षापुर्वीचा आहे. याचे संपुर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
पोलिस सीसीटिव्ही कॅमेरा तोडत असल्याचा व्हिडिओ शेतकरी आंदोलनादरम्यानचा असल्याचा दावा
पोलिस उंचावर लावण्यात आलेला सीसीटिव्ही कॅमेरा काठीने फोडत असल्याचे दिसत आहे. तर व्हिडिओ कॅमेरा का तोडत आहात, चोर आहात का असा प्रश्न देखील विचारत आहे. दावा करण्यात येत आहे की 26 जानेवारी रोजी दिल्लीत ट्रॅक्टर परेड दरम्यान शेतकरी आणि दिल्ली पोलिसांमध्ये झालेल्या संघर्षावेळचा हा व्हिडिओ आहे.याचे संपूर्ण फॅक्ट चेकिंग इथे वाचा.
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.
Authors
After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.