Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact Checkसचिन तेंडुलकरने कोंबडा कापताना पाहिल्याने मांसाहार सोडला नाही, चुकीचा दावा व्हायरल

सचिन तेंडुलकरने कोंबडा कापताना पाहिल्याने मांसाहार सोडला नाही, चुकीचा दावा व्हायरल

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

सचिन तेंडुलकरने कोंबडा कापताना पाहिल्याने मांसाहार सोडला असल्याची पोस्ट सध्या व्हायरल होत आहे. यात सचिनच्या फोटोसहित एक स्क्रिनशाॅट शेअर होत या. हिंदीत लिहिलेल्या पोस्टच्या स्क्रिनशाॅटचा आम्ही अनुवाद केला. यात म्हटले आहे की, “मी ज्या दिवशी चिकनशाॅप मध्ये माझ्या डोळ्यांदेखत कोबंडा कापताना पाहिले माझा आत्मा थरथर कापू लागला. मी रात्रभर झोपू शकलो नाही. डोळ्यांसमोर माझ्या मुलांचे चेहरे दिसत होते. तो जीव सुद्धा कुणाचे तरी बाळ होते. माझ्या चवीसाठी त्याला कितीतरी त्रास सहन करावा लागला. मी त्याच दिवशी आजीवन शाकाहारी बनण्याचा संकल्प केला- सचिन रमेश तेंडूलकर”

https://www.facebook.com/photo?fbid=246252763700451

संग्रहित

https://www.facebook.com/photo?fbid=2888641198124307

संग्रहित

Fact Check / Verification

पाॅप स्टार रिहाना आणि पाॅर्न स्टार मिया खलीफाने शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ट्विट केल्यानंतर भारतीय सेलिब्रिटींनी #IndiaAgainstPropaganda या सेलिब्रिटींबरोबर सचिन तेंडुलकरने देखील ट्विट केले. त्यानंतर संचिनवर टिका ही झाली त बरेच लोक त्याच्या समर्थनार्थ देखील आले. सचिन ने मांसाहार सोडल्याची कहाणी सांगणारी पोस्ट सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे ही पोस्ट किती खरी आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला.

संचिन तेंडुलकरने खरंच अशी काही पोस्ट केली आहे का याची माहिती मिळविण्यासाठी आम्ही सुरवातील त्याच्या फेसबुक पेजला भेट दिली मात्र आम्हाला कुठेही त्याची अशी पोस्ट आढळून आली नाही. यानंतर आम्ही त्याच्या ट्विटर हॅंडलला देखील भेट दिली. मात्र तिथे देखील सचिनचे मांसाहार सोडल्याचे ट्विट आढळून आले नाही. मात्र सचिनने इंस्टाग्रामवर 30 आॅक्टोबर 2020 रोजी सेमन माशाची डिश त्याची मुलगी सारा हिने बनवल्याची पोस्ट शेअर केली आहे.

याशिवाय सचिनने एनडीव्ही फूड या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होेते की त्याला वांग्याचे भरीत, झिंगे मसाला, फिश करी आणि खेकड्यापासून बनविलेले पदार्थ खूप आवडतात.

विरेंद्र सेहवाग ने cricketaddictor नावाच्या वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे की, सचिननेच त्याला नाॅनव्हेजची चव चाखण्यास सांगितले होते. सेहवाग ने नाॅनव्हेजमुळे वजन वाढण्याची शंका व्यक्त केली होती त्यावेळी सचिन ने त्याला सांगितले होते की मी देखील नाॅनव्हेज खातो माझे वजन वाढलेले नाही.

Conclusion

यावरुन हे स्पष्ट होते की, सचिन तेंडुलकरने मांसाहार सोडल्याची पोस्ट शेअर केलेली नाही, सोशल मीडियात सचिनच्या नावाने खोटी पोस्ट शेअर केली जात आहे.

Result- False

Our Sources

cricketaddictor- https://cricketaddictor.com/cricket/sachin-tendulkar-reveals-how-he-turned-virender-sehwag-into-a-non-vegetarian/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular