Authors
सोशल मीडियावर एक दावा केला जात आहे की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने शाळेत हिजाब घालण्याची परवानगी दिली.
कर्नाटकातील शाळेत हिजाब घालण्यावरून सुरू झालेला वाद थांबण्याचे नावच घेत नाही. कर्नाटक उच्च न्यायालयाने १५ मार्च २०२२ रोजी हिजाबला इस्लाम धर्माची प्रथा न मानता शाळेत हिजाब घालण्यावर बंदी घातली होती.
यावर काही मुस्लिम संघटनांनी कर्नाटक उच्च न्यायालयाच्या या निर्णयाविरुद्ध बंदचे आवाहन पुकारले होते. काही सामाजिक आणि धार्मिक संस्थांनी उच्च न्यायालयाच्या या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देऊ, असं सांगितले होते.
याच दरम्यान सोशल मीडियावर युजर्सने दावा केला की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने शाळेत हिजाब घालण्याची परवानगी दिली.
Fact Check/Verification
या दाव्याचा आम्ही शोध घेण्याचा प्रयत्न केला. ‘Bombay High Court Hijab’ असा कीवर्ड टाकून गुगलवर शोधला. त्यावेळी आम्हांला सध्याच्या कोणत्याही बातम्या मिळाल्या नाही, ज्यामुळे व्हायरल दाव्याची पुष्टी केली जाऊ शकेल.
या प्रक्रियेत आम्हांला न्यूज १८ इंडिया ने १५ मार्च २०१८ रोजी प्रसिद्ध केलेला एक बातमी सापडली. ज्यात पूर्वी दिलेल्या एका निर्णयाचा उल्लेख केला होता.
न्यूज १८ इंडियाच्या त्या बातमीनुसार, २०१८ मध्ये ‘साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज’च्या एका विद्यार्थ्याने दाखल केलेल्या एका याचिकेवर सुनावणी करतांना मुंबई उच्च न्यायालयाने त्या विद्यार्थ्याला शाळेत हिजाब घालण्याची परवानगी दिली.
काही अन्य कीवर्ड गुगलवर टाकल्यावर आम्हांला नई दुनिया, इंडियन एक्सप्रेस, इंडिया टुडे, मुंबई मिरर आणि इंडिया डॉट कॉम या विविध संकेतस्थळांवर या संबंधित बातम्या सापडल्या. ज्यामध्ये त्या घटनेबाबत अधिक माहिती दिलेली होती.
या व्यतिरिक्त आम्ही मुंबई उच्च न्यायालयाच्या संकेतस्थळावर देखील शोधले. पण आम्हांला त्या संबंधित कुठलाही आदेश सापडला नाही.
Conclusion
अशा पद्धतीने आमच्या तपासात हे स्पष्ट झाले की, कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयाने शाळेत हिजाब घालण्याची परवानगी दिल्याचा दावा भ्रामक आहे. मुळात मुंबई उच्च न्यायालयाने हिजाब घालून कॉलेजला जाण्याच्या संबंधितचा आदेश २०१८ मध्ये ‘साई होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज’च्या एका विद्यार्थ्याला दिला होता.
Result : False Context/Missing Context
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.