Friday, November 22, 2024
Friday, November 22, 2024

HomeFact CheckReligionशिवलिंगाचा तो व्हिडिओ खरंच तामिळनाडूतील आहे? त्याचे सत्य जाणून घ्या

शिवलिंगाचा तो व्हिडिओ खरंच तामिळनाडूतील आहे? त्याचे सत्य जाणून घ्या

सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असा दावा केलाय की, शिवलिंगाचा व्हिडिओ तामिळनाडूतील आहे. तामिळनाडूमध्ये तारा राजमार्गावर ओशिवलिंगम हे एक स्थान आहे. ३६५ दिवस त्या पिंडीवर फक्त पाऊस पडतो. कोठून पडतो ते कळत नाही. आश्चर्यच आहे. असं त्या पोस्टमध्ये लिहिले आहे. फेसबुकवर ही पोस्ट शेअर केली जात आहे.

फोटो साभार : Facebook Post

ट्विटरवर देखील हा व्हिडिओ शेअर केला जात आहे. 

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता. 

या ट्विटची संग्रहित केलेली दुवा तुम्ही इथे पाहू शकता. 

नुकतेच वाराणसीतील ज्ञानवापी मशिदीत शिवलिंग सापडल्याचा दावा हिंदू पक्षाने केला होता. त्यातच आता शिवलिंगाचा हा व्हिडिओ तामिळनाडूतील आहे, असा दावा केला जात आहे. 

Fact Check / Verification

शिवलिंगाचा व्हिडिओ तामिळनाडूतील आहे, या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही त्या व्हिडिओतील एक फ्रेम गुगल रिव्हर्स करून शोधली. 

फोटो साभार : Google Reverse Image Search

त्यावेळी आम्हांला हा व्हिडिओ मलेशियातील आहे, असे समजले. मग आम्ही यु ट्यूबवर ‘shivan temple selnagor malaysia’ असं टाकून शोधलं. त्यावेळी आम्हाला तिथे अनेक व्हिडिओ दिसल्या. 

फोटो साभार : YouTube Search

मग आम्ही सर्वात पहिली व्हिडिओ पाहिली. ५ ऑक्टोबर २०२० रोजी आपलोड केलेला ‘ओजस चॅनेल’ या यु ट्यूब वाहिनीवरील व्हिडिओ ब्लॉग पाहिला. व्हायरल झालेल्या व्हिडिओतील आजूबाजूचा सर्व परिसर आणि या व्हिडिओतील परिसर एकच आहे.

या व्यतिरिक्त आम्हाला गुगल मॅप्सवर त्या ठिकाणावरील काही फोटो मिळाले. तो मिळालेला फोटो आणि व्हायरल झालेल्या व्हिडिओतील एका फोटोची तुलना केली. व्हायरल व्हिडिओ लॉर्ड शिवा मेडिटेशन संच्युरी, बेंटोंग कराक रोड सेलानगोर मलेशिया येथील आहे.

दोन फोटोंची केलेली तुलना

Conclusion

अशा पद्धतीने आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले की, शिवलिंगाचा ती व्हिडिओ तामिळनाडूतील नसून मलेशियातील आहे. 

Result : False Context/False

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular