Authors
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदी साठी सर्वप्रथम अर्जुन देवोडीया यांनी केले आहे.)
गुजरात निवडणुकीदरम्यान पंतप्रधान मोदी 4 डिसेंबर 2022 रोजी गांधीनगरमध्ये त्यांच्या आईला भेटायला गेले होते. पीएम मोदींच्या त्यांच्या आईसोबतच्या या भेटीचे सर्व फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. दरम्यान, एक फोटो देखील शेअर केला जात आहे ज्यामध्ये पीएम मोदी त्यांची आई आणि जशोदाबेनसोबत सोफ्यावर बसलेले दिसत आहेत.
या फोटोच्या माध्यमातून लोक दावा करत आहेत की, गुजरात निवडणुकीदरम्यान पीएम मोदी त्यांची पत्नी जशोदाबेन यांना भेटले होते. फेसबुक आणि ट्विटरवरील चित्रासोबत युजर्स कॅप्शनमध्ये लिहित आहेत, “भारत जोडो यात्रा यशस्वी. खूप दिवसांपासून विभक्त झालेल्या सनमची आज गुजरात निवडणुकीत भेट झाली.. “नरेंद्र मोदी सोबत जशोदाबेन”.
Fact Check/ Verification
व्हायरल चित्राचा रिव्हर्स इमेज सर्च घेतल्यावर, आम्हाला इंडिया टुडेच्या बातमीतील व्हायरल फोटोसारखेच दिसणारे चित्र आढळले. मात्र या फोटोत मोदी आणि त्यांच्या आईसोबत जशोदाबेन दिसत नाहीत.
रिव्हर्स सर्चच्या मदतीने आम्हाला एनडीटीव्हीचे एक ट्विट देखील सापडले, ज्यामध्ये पीएम मोदींचा त्यांच्या आईसोबतचा फोटो आहे. इतरही काही चित्रे आहेत. पण त्यातही जशोदाबेन नाहीत.
मोदी 4 डिसेंबरला आईला भेटायला गेले होते, तेव्हा या भेटीचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडिओमध्येही जशोदाबेन सोफ्यावर दिसत नाहीत.
आम्ही गुगलवर जशोदाबेनची छायाचित्रेही शोधली. शोधल्यावर, आम्हाला डेलीहंटच्या एका बातमीत जशोदाबेनचा एक फोटो सापडला, ज्यात त्या काही लोकांसोबत बसलेल्या दिसत आहेत. जसे त्या व्हायरल चित्रात दिसत आहेत.
दोन्ही चित्रे एकत्र केल्यावर, हे स्पष्ट होते की जशोदाबेनचा भाग डेलीहंट चित्रातून उचलला गेला आहे आणि व्हायरल चित्रात जोडला गेला आहे. व्हायरल झालेला फोटो बनावट असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Conclusion
पीएम मोदी आणि त्यांची आई यांच्यासोबत जशोदाबेन बसलेले हे चित्र संपादित करण्यात आले असल्याचे आमच्या तपासातून सिद्ध झाले आहे. व्हायरल चित्रात जशोदाबेनचा भाग वेगळा जोडण्यात आला आहे.
Result: Altered Photo
Our Sources
Report of India Today, published on December 4, 2022
Tweet of NDTV, posted on December 4, 2022
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in