Authors
नाशिकमध्ये मंचावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिला, असा दावा करण्यात आला. महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार आहे, असा दावा झाला. कोलाजमध्ये असलेली छायाचित्रे ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील आहेत, असा दावा झाला. मराठी तरुणाईने ही संधी सोडू नका, भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत. असा दावा करण्यात आला. नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी झाली, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
नाशिकमध्ये मंचावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिला?
नाशिकमध्ये मंचावर विठ्ठलाची मूर्ती स्वीकारण्यास राहुल गांधींनी नकार दिला, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार?
महाराष्ट्रात लोकसभेची निवडणूक चार टप्प्यात होणार आहे, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे दिसून आले.
ही छायाचित्रे ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील नाहीत
कोलाजमध्ये असलेली छायाचित्रे ममता बॅनर्जी यांच्या नुकत्याच झालेल्या अपघातातील आहेत, असा दावा झाला. आमच्या तपासात हा दावा दिशाभूल करणारा आढळला.
भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत?
मराठी तरुणाईने ही संधी सोडू नका, भारतीय सागरी हवामान खात्यात ९९० पदे भरावयाची आहेत. असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
हा व्हिडीओ नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान जमलेल्या गर्दीचा नाही
नाशिकमध्ये राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान प्रचंड गर्दी झाली, असा दावा एका व्हिडिओच्या माध्यमातून करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा