Authors
Claim
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नग्न राजा असे संबोधले असून ते न्यूयॉर्क टाइम्सने छापले आहे.
Fact
व्हायरल न्यूजपेपर क्लिपिंग व्यंगात्मक चित्र आहे. न्यूयॉर्क टाइम्सने असे कोणतेही वृत्त प्रसारित केलेले नाही.
न्यूयॉर्क टाइम्स ची बातमी असे सांगत एक न्यूजपेपर क्लिपिंग व्हायरल झाले आहे. यामध्ये भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नग्न राजा असे संबोधले असून ते न्यूयॉर्क टाइम्सने छापले आहे, असा दावा करण्यात आला आहे.
आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
“पहा सुप्रीम कोर्ट म्हणतो मोदी राजा ज्याला फेकू म्हणतात तो नग्न राजा आहे.” अशा कॅप्शनखाली कथित न्यूजपेपर क्लिपिंग जोडण्यात आले असून, “भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने घोषित केले आहे की, ‘राजा नग्न आहे,’ (“मोईजी, ज्याला फेकू देखील म्हटले जाते) भारताच्या मुख्य न्यायमूर्तींच्या दबावाखाली SBI ला भारतातील सर्वात मोठ्या राजकीय माफिया, ऑरेंज कलर्ड ब्लूचा पर्दाफाश करणाऱ्या निवडणूक रोख्यांचा डेटा जाहीर करावा लागला.” असे हा दावा सांगतो.
Fact Check/ Verification
सर्वप्रथम दाव्यासोबत जोडण्यात आलेले क्लिपिंग आम्ही बारकाईने पाहिले. लिखित कॅप्शनमध्ये मोदी असा स्पष्ट उल्लेख असला तरी दाव्यात उल्लेख करताना ‘Moijji’ असा करण्यात आला आहे. हे आमच्या निदर्शनास आले. तसेच रिपोर्ट करणाऱ्याचे नाव @EducateBilla असे लिहिण्यात आले आहे. न्यूयॉर्क टाइम्स या वृत्तपत्राचे शीर्षक ज्याठिकाणी आहे, तेथे शेजारी Satire Edition असे लिहिण्यात आले आहे. यावरून हा प्रकार व्यंगात्मक असल्याचा सुगावा आम्ही घेतला.
याचबरोबरीने अशाप्रकारची कोणती बातमी कुठे प्रसिद्ध झाली आहे का? तसेच सर्वोच्च न्यायालयाने नग्न राजा असे कुणाला संबोधले आहे का? याचा शोध आम्ही घेतला असता, आम्हाला तशी अधिकृत माहिती कोठेही आढळली नाही.
कथित न्यूजपेपर क्लिपिंग बाबत पाहणी करताना आम्हाला त्यावर १५ मार्च २०२४ अशी तारीख पाहायला मिळाली. यावरून आम्ही न्यूयॉर्क टाइम्सची त्यादिवशीची आवृत्ती शोधून पाहिली.
मात्र आम्हाला त्यादिवशीचा आवृत्तीमध्ये अशाप्रकारची बातमी किंवा व्यंगचित्र आढळले नाही.
दरम्यान आम्ही या निष्कर्षापर्यंत पोहोचू शकलो की हा प्रकार व्यंगात्मकरीत्या बनविण्यात आला असून त्याला कोणताच आधार नाही.
Conclusion
अशाप्रकारे आमच्या तपासात भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नग्न राजा असे संबोधले असून ते न्यूयॉर्क टाइम्सने छापले आहे, असा दावा व्यंगात्मक असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Result: Satire
Our sources
Self Analysis
Google Search
Epaper New York Times of March 15, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in