Authors
लोकसभा निवडणुकीला जोडून मे महिन्यात अनेक फेक दावे करण्यात आले. कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली आहे, असा दावा करण्यात आला. राष्ट्रपती मुर्मू या उमेदवारी दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत आल्या होत्या, असा दावा झाला. भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नग्न राजा असे संबोधले असून ते न्यूयॉर्क टाइम्सने छापले आहे, असा दावा करण्यात आला. दुबईच्या मुस्लिम संघटनेने भारतात मतदानासाठी आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर केली, असा दावा झाला. राहुल गांधी भारतीय राजकारणाचे नायक असे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले, असा दावा करण्यात आला. या आणि इतर प्रमुख दाव्यांचे फॅक्टचेक या रिपोर्टमध्ये वाचता येतील.
कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली?
कर्नाटक वक्फ बोर्डाने बेंगळुरूमधील ITC विंडसर हॉटेल रिकामे करण्याची नोटीस दिली आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा आढळला.
राष्ट्रपती मुर्मू पंतप्रधान मोदींच्या निवडणुकीच्या नामांकनासाठी गेल्या होत्या?
राष्ट्रपती मुर्मू या उमेदवारी दाखल करण्यासाठी पंतप्रधान मोदींसोबत आल्या होत्या, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले.
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नग्न राजा असे संबोधले?
भारतीय सर्वोच्च न्यायालयाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नग्न राजा असे संबोधले असून ते न्यूयॉर्क टाइम्सने छापले आहे, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा व्यंगात्मक असल्याचे स्पष्ट झाले.
परदेशातून आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत देण्यात आली?
दुबईच्या मुस्लिम संघटनेने भारतात मतदानासाठी आलेल्या मुस्लिमांना आर्थिक मदत जाहीर केली, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे उघडकीस आले.
राहुल गांधी भारतीय राजकारणाचे नायक असे लालकृष्ण अडवाणी म्हणाले नाहीत
राहुल गांधी भारतीय राजकारणाचे नायक असे भाजप नेते लालकृष्ण अडवाणी म्हणाले, असा दावा करण्यात आला. आमच्या तपासात हा दावा खोटा असल्याचे निदर्शनास आले.
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in