Saturday, September 28, 2024
Saturday, September 28, 2024

HomeFact CheckFact Check: मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही, जाणून घ्या सत्य

Fact Check: मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही, जाणून घ्या सत्य

Claim
मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील आहे.
Fact

संबंधित व्हिडीओ २०२१ मध्ये हैद्राबाद येथे घडलेल्या घटनेचा आहे. ही घटना महाराष्ट्रात घडलेली नाही.

मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या एका बापाचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल होत आहे. दावा केला जात आहे की ही घटना महाराष्ट्रातील असून याचा शोध घेण्यासाठी व्हिडीओ जास्तीत जास्त शेयर करा.

आम्हाला हा दावा व्हाट्सअपवर मिळाला.

Fact Check: मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही, जाणून घ्या सत्य
WhatsApp Viral message

काही सोशल मीडिया युजर्सनी हा दावा फेसबुकच्या माध्यमातूनही केला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

दाव्यासोबत शेयर केल्या जात असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती एका लहान मुलाला बेदम मारहाण करताना दिसत आहे. “महाराष्ट्रात असल्या नराधम बापाला कठोर शिक्षा झाली पाहिजे, लहान लेकराचा जीव काय म्हणत असेल, मित्रांनो याला फेमस करा जरा आपापल्या मोबाईल मधील ग्रुप वरती फेमस करा कोणीही असुदे कुठलाही असू दे फक्त ग्रुप वरती कळवा कुठला आहे हा ह्याला आपण दाखवू मानव अधिकार” असे दाव्याची कॅप्शन सांगते.

दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.

Fact Check/ Verification

आम्ही व्हायरल दाव्यातील व्हिडीओ काळजीपूर्वक पाहिला. त्यामध्ये बोलली जाणारी भाषा मराठी आढळली. दरम्यान व्हिडिओचा मुख्य स्रोत शोधण्यासाठी आम्ही व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला ३० नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध झालेली news18 हिंदीची एक बातमी वाचायला मिळाली.

Fact Check: मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही, जाणून घ्या सत्य
Courtesy: News18 Hindi

हैदराबादमधील चैत्रीनाका पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ही घटना आहे. पीडित मुलाने नातेवाईकांच्या घरी खोडकरपणा केला म्हणून वडिलांनी त्याला अशी बेदम मारहाण केली होती. अशी माहिती आम्हाला मिळाली.

ANI ने २८ नोव्हेंबर २०२१ रोजी प्रसिद्ध केलेल्या बातमीनुसार, “मारहाण करणाऱ्या बापाचे नाव अशोक घंटे असे आहे. मुलाने नातेवाईकाच्या घरी खोडसाळपणा केल्याचा राग आल्याने त्याने मुलाला मारले. यावेळी त्याने त्याच्या मुलीला हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रित करण्यास लावला. आईला याविषयी कळाल्यानंतर त्यांनी मारहाणीविषयी तक्रार दिली. असे चैत्रिनाका ठाण्याचे पोलिस निरीक्षक अब्दुल कादर जिलानी यांनी सांगितले.” असे बातमीत म्हटलेले आहे.

Fact Check: मुलाला क्रूरपणे मारणाऱ्या बापाचा व्हिडीओ महाराष्ट्रातील नाही, जाणून घ्या सत्य
Courtesy: ANI

२९ नोव्हेंबर २०२१ च्या एका फेसबुक पोस्टमध्येही व्हायरल व्हिडीओ आम्हाला सापडला. यावरून हे सिद्ध होते की व्हिडीओ जुना असून तो पुन्हा महाराष्ट्रातील घटना असे सांगत व्हायरल केला जात आहे.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात स्पष्ट झाले की, मुलाला क्रूरपणे मारण्याची घटना २०२१ मधील असून हैद्राबाद येथे घडलेली आहे. याप्रकरणी हैद्राबाद पोलिसांनी कारवाईही केली असून सध्या चुकीच्या संदर्भाने हा दावा व्हायरल केला जात आहे.

Result: Missing Context

Our Sources
News published by News18 Hindi on November 30, 2021
News published by ANI on November 28, 2021
Facebook post by User Umesh Tambve on November 29, 2021


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular