Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी...

Fact Check: पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी केला हल्ला? खोटा आहे हा दावा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी हल्ला केला.

Fact
हा दावा खोटा आहे. संबंधित व्हिडीओ अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ मंदिरात घडलेल्या नोव्हेंबर २०२३ मधील घटनेचा आहे.

पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी हल्ला केला असा दावा सध्या एका व्हिडिओच्या माध्यमातून केला जात आहे. सुरुवातीला व्हाट्सअपच्या माध्यमातून हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

अनेक युजर्सनी समान दावा X वरही मोठ्याप्रमाणात शेयर केला असल्याचे आम्हाला दिसले.

फेसबुकवरही समान दावा अनेक युजर्सनी केल्याचे आम्हाला आढळून आले.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टिपलाइनवर (+91-9999499044) हा दावा प्राप्त झाला असून तथ्य तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी केला हल्ला? खोटा आहे हा दावा

“आज दि. ४ जुलै, दुपारी २ वाजेची घटना, पंढरपूर च्या वारीला निघालेले वारकरी, नागपूरच्या रस्त्याच्या बाजूला जेवण करून, विठ्छालाचे अभंग बोलत असताना, तेथील स्थानिक मुस्लिम लोकांनी, अभंग गायचे नाहीत, शांत रहा, असे बोलून निष्पाप वारकर्यावर हल्ला केला. वाकडतोंड्या कुठे फेडणार हे पाप…!!! तुझ्या जीवावर, हे आता वारकऱ्यांचे जीव घ्यायला लागलेत, इलेक्शन मध्ये थोडा विजय काय मिळाला…हे आता ह्यांचा कानुन लागू करायला निघाले आहेत, हिंदूच हिंदूला खतम करणार कारण सूर्याची पिसाळाची अवलाद अजून जिवंत आहे…” असे या दाव्यामध्ये म्हटलेले आहे.

महाराष्ट्रात दरवर्षी होणारी वारी हा अनेकांच्या दृष्टीने आस्थेचा विषय आहे. आळंदी आणि देहू येथून अनुक्रमे संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्यांचे प्रस्थान पंढरपूरकडे होते. यामध्ये वारकऱ्यांच्या हजारो दिंड्या सहभागी होतात. फक्त महाराष्ट्रच नव्हे तर कर्नाटक, गोवा आणि उत्तर आणि दक्षिणेकडील अनेक राज्यातील वारकरी या वारीत सहभागी होऊन चालत पंढरपूरकडे जातात. आषाढी एकादशी पर्यंत हा सोहळा सुरु असतो. यामध्ये लक्षावधी वारकरी सहभागी होतात. कोणतेही नियोजन नसताना अतिशय शांतपणे होणार सोहळा म्हणून वारी परिचित आहे. विशेषतः पंढरपूरकडे रवाना होणाऱ्या वारकऱ्यांना सेवा देण्यासाठी सर्व जातीय आणि धर्मीय नागरिक धडपडत असतात. विदेशी नागरिकही या सोहळ्यात सहभागी होतात. या दरम्यान वारकऱ्यांवर मुस्लिमांनी हल्ला केला असे सांगणारा दावा व्हायरल झाल्याने आम्ही त्याची तथ्य तपासणी करण्याचा निर्णय घेतला.

Fact Check/ Verification

निष्पाप वारकऱ्यांवर हल्ला झाल्याचे सांगणारा व्हिडीओ आणि या अनुषंगाने केला जाणारा दावा यामध्ये ४ जुलै रोजी दुपारी दोन वाजताची घटना असा उल्लेख आम्हाला सुरुवातीलाच आढळला. आम्ही यासंदर्भात शोध घेतला. नागपूर जवळून जाणारे वारकरी जेवणाला थांबले आणि त्यानंतर भजन करताना त्यांना मज्जाव करण्यात आला आणि हल्ला झाला असे व्हायरल दाव्यात म्हटले आहे. दरम्यान Google वर संबंधित किवर्ड शोधूनही आम्हाला याबद्दल कोणत्याच अधिकृत माध्यमाने बातमी प्रसिद्ध केल्याचे दिसून आले नाही. इतकी मोठी घटना घडली असती तर त्याबद्दल महाराष्ट्रातील वृत्तपत्र, टीव्ही चॅनेल्स किंवा सोशल मीडियावर बातम्या प्रसारित करणाऱ्यांनी लिहिले किंवा दाखविले असते. मात्र तसे दिसले नाही.

यामुळे पुढील तपासासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला @prabhakarugale13 नावाच्या युजरने Youtube वरील शॉर्ट्स मध्ये १५ नोव्हेंबर २०२३ रोजी हाच व्हिडीओ अपलोड केलेला असल्याचे दिसून आले.

Fact Check: पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी केला हल्ला? खोटा आहे हा दावा
Courtesy: Youtube@prabhakarugale13

व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये “हिंदु नो जागे व्हा! नाहीतर परिणामाला तयार रहा! हा व्हिडिओ बघा! हा वायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील राहुरी तालुक्यातील गुहा या गावचा आहे.” असे लिहिल्याचे आमच्या निदर्शनास आले. यावरून संबंधित व्हिडीओ नोव्हेंबर २०२३ पासून इंटरनेटवर उपलब्ध असल्याचे स्पष्ट झाले. डिस्क्रिप्शन मधील राहुरी तालुक्यातील गुहा या ठिकाणाचा संदर्भ घेऊन आम्ही पुढील तपास केला.

आम्हाला Zee 24 Taas न्यूज चॅनेलने १३ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रसिद्ध केलेला व्हिडीओ रिपोर्ट सापडला. “नगरच्या कानिफनाथ मंदिरातील वाद पेटला, गुहा गावात तणावाचे वातावरण” या शीर्षकाखाली प्रसिद्ध केलेल्या या रिपोर्टमध्ये संबंधित घटनेची माहिती पाहायला मिळते. “अहमदनगरच्या गुहा गावात दोन समाजात तुफान हाणामारी झाली. पुजारी आणि भक्तांना दुस-या समाजाकडून मारहाण करण्यात आली.” असे डिस्क्रिप्शन आम्हाला आढळले.

Fact Check: पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी केला हल्ला? खोटा आहे हा दावा
Courtesy: Youtube@Zee24Taas

आणखी तपासात @LegalLro या X खात्याने १३ नोव्हेंबर २०१३ रोजी पोस्ट केलेला व्हिडीओ आढळला. यामध्ये व्हायरल व्हिडिओचा काही भाग आढळला. यावरून संबंधित घटना अहमदनगर जिल्ह्यातील गुहा येथेच झाली असल्याचे स्पष्ट झाले. संबंधित युजरने कॅप्शनमध्ये “कानिफनाथ मंदिराची मालकी बेकायदेशीरपणे सांगणाऱ्या जिहादींनी गुहा, ता.राहुरी या गावात साधू आणि भाविकांवर हल्ला केला. शेकडो वर्षे जुन्या परंपरेत अडथळा आणणाऱ्या कट्टरपंथी #इझलामवाद्यांवर कारवाई अपेक्षित” असे म्हटले आहे.

अहमदनगर पोलीस स्टेशनच्या @NagarPolice या X खात्यानेही संबंधित घटने संदर्भातील माहिती देणारी पोस्ट १३ नोव्हेंबर २०२३ रोजी शेयर केली आहे.

यावरून गुहा येथे घडलेल्या घटनेचा व्हिडीओ खोट्या दाव्याने शेयर केला जात असल्याचे स्पष्ट झाले.

आम्ही स्थानिक पत्रकार नितीन ओझा यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही सध्या वारकऱ्यांना मारहाण असे सांगत व्हायरल होत असलेला व्हिडीओ मुळात गुहा येथे घडलेल्या घटनेतील आहे. खोटा दावा करून हा व्हिडीओ व्हायरल केला जात आहे. अशी माहिती दिली.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात पंढरपूरच्या वारीला निघालेल्या वारकऱ्यांवर भजन केले म्हणून नागपूर जवळ मुस्लिमांनी हल्ला केला हा दावा खोटा आहे, हे स्पष्ट झाले. प्रत्यक्षात संबंधित व्हिडीओ अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील गुहा येथील कानिफनाथ मंदिरात घडलेल्या नोव्हेंबर २०२३ मधील घटनेचा आहे.

Result: False

Our Sources
Youtube shorts publiished on November 15, 2023
Video published by Zee 24 Taas on November 13, 2023
X post by @LegalLro on November 13, 2023
X post by @NagarPolice on November 13, 2023
Conversation with local Journalist Nitin Oza


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular