Monday, December 30, 2024
Monday, December 30, 2024

HomeFact CheckFact Check: महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला? खोटा आहे हा दावा

Fact Check: महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला? खोटा आहे हा दावा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला.
Fact

हा दावा खोटा असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.

महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. असे सांगणारा एक दावा एका स्क्रीनशॉटच्या माध्यमातून सध्या केला जात आहे.

Fact Check: महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला? खोटा आहे हा दावा
Courtesy: X@Nevillekavarana

“महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर. आचार संहिता 20 सप्टेंबर 2024 ला, निवडणूक कार्यक्रम जाहीर, 15 ऑक्टोबर 2024 ला मतदान, 19 ऑक्टोबर 2024 ला निकाल” असे हा दावा सांगतो. फेसबुकवरही हा दावा मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

2019 मध्ये निवडणूक होऊन स्थापन झालेली महाराष्ट्राची विधानसभा 2024 मध्ये विसर्जित होऊन निवडणुकीनंतर नव्याने स्थापन केली जाणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर आता या विधानसभा निवडणुकीचे वेध संपूर्ण राज्याला लागले आहेत. ही प्रक्रिया केंव्हा होणार याबद्दल चर्चाही सुरु झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर हा दावा व्हायरल झाला आहे.

Fact check/ Verification

व्हायरल दाव्याचा तपास करण्यासाठी आम्ही सर्वप्रथम दाव्यासोबत शेयर केला जात असलेला स्क्रीनशॉट काळजीपूर्वक पाहिला. संबंधित स्क्रीनशॉटवर आजतक चा लोगो असल्याचे आम्हाला दिसून आले. शिवाय आजतक चॅनेलवर बातमी दाखविली जात असताना टीव्ही स्क्रीनचा फोटो काढण्यात आला असल्याचे आम्हाला दिसून आले. संबंधित स्क्रीनशॉटमध्ये तारखा दिसतात मात्र त्यासमोर 2024 हे साल दिसत नाही. यावरून हा स्क्रिनशॉट नेमका कधीचा हे स्पष्ट झाले नाही. दरम्यान आजतक या चॅनेलने यासंदर्भात कोणती बातमी दिली आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही आजतकची अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेज आणि X अकाउंट धुंडाळले, मात्र आम्हाला तसे काहीच आढळले नाही.

पुढील तपासासाठी आम्ही Google वर संबंधित कीवर्डसच्या माध्यमातून शोध घेतला, मात्र आम्हाला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला असल्यासंदर्भात कोणतीच माहिती किंवा बातमी आढळली नाही.

Fact Check: महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला? खोटा आहे हा दावा
Google Search

अधिक तपास करताना आम्हाला निवडणूक आयोगाने आपल्या अधिकृत X खात्यावरून 24 जुलै 2024 रोजी केलेले एक ट्विट आढळले.

Fact Check: महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला? खोटा आहे हा दावा
Courtesy: X@ECISVEEP

संबंधित स्क्रिनशॉट आणि त्यामधील मजकुराचा हवाला देत निवडणूक आयोगाने हा प्रकार खोटा असल्याचे म्हटले आहे. “#महाराष्ट्र आणि #हरियाणा राज्य विधानसभा निवडणुकांच्या वेळापत्रकासंदर्भात व्हॉट्स ॲपवर एक संदेश शेअर केला जात आहे. वास्तविकता: संदेश #फेक आहे. #ECI द्वारे आतापर्यंत कोणत्याही तारखांची घोषणा केलेली नाही. निवडणुकीचे वेळापत्रक ECI पत्रकार परिषदेद्वारे जाहीर करते.” असे त्यामध्ये आम्हाला वाचायला मिळाले.

यावरून व्हायरल होत असलेला दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात महाराष्ट्र राज्यातील निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. निवडणूक आयोगानेही हा दावा खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.

Result: False

Our Sources
Social Media accounts of Aaj Tak
Google Search
Tweet made by ECI on July 24, 2024


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular