Authors
Claim
रितेश देशमुखने आपल्या X पोस्टमध्ये आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांच्यावर टीका केली आहे.
फेसबुक पोस्टचे संग्रहण येथे पहा.
Fact
अभिनेता रितेश देशमुख याने कथितरित्या केलेल्या एक्स पोस्टचा स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये RSS (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) प्रमुख मोहन भागवत यांच्या १५ वर्षांत अखंड भारत निर्माण करण्याच्या वक्तव्यावर टीका करण्यात आली आहे. उल्लेखनीय आहे की रितेश देशमुखचा भाऊ धीरज देशमुख हे २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत लातूर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार होते. त्यानंतर रितेश देशमुखने त्यांचा प्रचार केला होता.
दाव्याची पडताळणी करण्यासाठी, आम्ही Google वर संबंधित कीवर्ड शोधले. या वेळी आम्हाला दाव्याची पुष्टी करणारा कोणताही अहवाल आढळला नाही.
पुढील तपासावर, व्हायरल स्क्रीनशॉट जवळून पाहिल्यानंतर, आम्हाला आढळले की त्यात व्याकरणाच्या दृष्टीने अनेक चुका आहेत. रितेश देशमुखने कथितपणे शेअर केलेल्या एक्स-पोस्टमध्ये अशा चुका पाहिल्यावर आम्हाला या पोस्टच्या विश्वासार्हतेबद्दल शंका आली.
आता आम्ही X वरील स्क्रीनशॉटवर लिहिलेले @Deshmukh_0 हे X खाते (संग्रहण) शोधले. यावेळी आम्हाला आढळले की हे खाते रितेश देशमुखच्या नावाने तयार केलेले विडंबन खाते आहे. रितेश देशमुख (PARODY) हे त्याच्या बायोमध्येही लिहिलेले आहे. सुमारे साडेसहा हजार फॉलोअर्स असलेले हे खाते जानेवारी 2024 पासून X वर उपस्थित आहे.
या खात्यावर शोधल्यावर, आम्हाला आढळले की व्हायरल होणारी पोस्ट (संग्रहण) या विडंबन खात्यावरून 14 डिसेंबर 2024 रोजी करण्यात आली होती.
तपासादरम्यान, आम्हाला आढळले की अभिनेता रितेश देशमुखचे अधिकृत खाते @Riteishd आहे तर व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिसणारे खाते @Deshmukh_0 आहे. जेव्हा आम्ही रितेश देशमुखचे अधिकृत एक्स हँडल शोधले तेव्हा आम्हाला आरएसएस प्रमुख मोहन भवत यांच्यावर टीका करणारी कोणतीही पोस्ट आढळली नाही.
तपासाअंती आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की व्हायरल झालेला स्क्रीनशॉट रितेश देशमुखचा नसून त्याच्या विडंबन खात्यावरून केलेल्या पोस्टचा आहे. रितेश देशमुखने अशी कोणतीही पोस्ट केलेली नाही.
Result: False
Sources
Parody account of Ritesh Deshmukh.
Official X account of Ritesh Deshmukh
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी कोमल सिंग यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा