Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
AI/Deepfake
Claim
सुप्रिया सुळे महाराष्ट्राच्या निवडणुकीत बिटकॉईन वापरण्याबाबत बोलताना.
Fact
नाही, व्हायरल ऑडिओ AI जनरेटेड आहे.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदानाच्या एक दिवस आधी पुण्याचे माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील यांनी बिटकॉइन घोटाळ्यातील पैसा महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत वापरला जात असून त्यात बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचा सहभाग असल्याचा आरोप केला.
या आरोपानंतर भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनीही पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या नेत्या सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांनी निवडणुकीत बिटकॉईनचा वापर केल्याचा आरोप केला आहे. या काळात भाजपकडून अनेक ऑडिओ जारी करण्यात आले. यातील पहिला ऑडिओ सारथी असोसिएट्स ऑडिट फर्मचा कर्मचारी गौरव मेहता आणि पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांच्यातील आहे. दुसरा ऑडिओ महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले आणि अमिताभ गुप्ता यांचा आहे. याशिवाय तिसरा ऑडिओ सुप्रिया सुळे आणि गौरव मेहता यांच्यातील आहे. चौथा ऑडिओ अमिताभ गुप्ता आणि गौरव मेहता यांच्यातील आहे.
सुप्रिया सुळे आणि गौरव मेहता यांच्या कथित ऑडिओमध्ये सुप्रिया सुळे म्हणतात, “गौरव, तू आम्हाला उत्तर का देत नाहीस? आम्हाला पहिला रक्कम हवी आहे. तुमचा कोणीही माणूस प्रतिसाद देत नाही. आमच्याशी खेळ खेळू नका. गुप्ता म्हणाले होते- तुमच्याकडे सर्व बिटकॉइन्स आणि पैसे आहेत. लगेच फोन करा. आम्हाला पैशाची गरज आहे आणि निवडणुका होणार आहेत. यानंतर सुप्रिया म्हणतात- बॉस, तुम्ही सर्व बिटकॉइन्स रोखीत का बदलत नाही? त्यांची किंमत देखील अनुकूल आहे. निवडणुकीत निधी हवा. चौकशीची काळजी करू नका. सत्तेत आल्यावर आम्ही ते हाताळू. तुम्ही फक्त करा, बस्स.”
दुसऱ्या ऑडिओमध्ये नाना पटोले कथितपणे असे म्हणताना ऐकू येत आहेत की, “अमिताभ, पैशाचे काय झाले. मी तुला कालच सांगितलं होतं ना? अशी मजा करू नका.”
हे दोन्ही ऑडिओ भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक व्हेरिफाईड एक्स अकाउंट्सनी शेअर केले आहेत.

सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या व्हायरल ऑडिओची चौकशी करताना, न्यूजचेकरने प्रथम त्यासंबंधीच्या बातम्यांचा शोध घेतला. यादरम्यान, आम्हाला सुप्रिया सुळे यांच्या X खात्यातून केलेले एक ट्विट प्राप्त झाले.

या ट्विटमध्ये निवडणूक आयोगाला लिहिलेल्या पत्राचा समावेश आहे. त्यात त्यांनी हा ऑडिओ खोटा ठरवून माजी आयपीएस अधिकारी रवींद्रनाथ पाटील आणि गौरव मेहता नावाच्या अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार नोंदवण्याची मागणी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मतदारांची दिशाभूल करण्यासाठी मतदानाच्या आदल्या रात्री खोट्या बातम्या पसरवल्या जात आहेत. बिटकॉइनच्या गैरव्यवहाराच्या खोट्या आरोपांविरोधात आम्ही निवडणूक आयोग आणि सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार दाखल केली आहे. यामागील हेतू निंदनीय आहे. संविधानाने चालवलेल्या लोकशाहीत हे सर्व घडत आहे, हे निषेधार्ह आहे.”
याशिवाय एका ट्विटमध्ये त्यांनी भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही निशाणा साधला आणि ते बिनबुडाचे आरोप करत असून माझे वकील त्यांना मानहानीची नोटीस पाठवणार आहेत, असे म्हटले आहे.

त्याचवेळी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी भंडारा येथील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले की, “भाजपने आणलेले आयपीएस अधिकारी रवींद्र पाटील हेदेखील आयपीएस अधिकारी नाहीत. भाजप हा लबाडांचा पक्ष झाला आहे. निवडणुकीपूर्वीच ते हे सर्व करत आहेत. माझा आवाज ऑडिओमध्ये नाही. मी एक शेतकरी आहे, मला बिटकॉइन देखील समजत नाही. आम्ही कायदेशीर नोटीस दिली असून एफआयआर दाखल केल्याचेही त्यांनी सांगितले. सुधांशू त्रिवेदी यांच्यावरही आम्ही मानहानीचा खटला दाखल करू. असेही ते म्हणाले.

यानंतर आम्ही सुप्रिया सुळे आणि नाना पटोले यांच्या व्हायरल ऑडिओची चौकशी करण्यासाठी ‘मिसइन्फॉर्मेशन कॉम्बॅट अलायन्स’ (MCA) च्या डीपफेक ॲनालिसिस युनिट (DAU) शी संपर्क साधला. न्यूजचेकर देखील याचाच एक भाग आहे. डीपफेक ॲनालिसिस युनिट (डीएयू) ने हिया (Hiya), ट्रूमीडिया (TrueMedia), हाइव (Hive) आणि डीपफेक-ओ-मीटर (Deepfake-o-meter) या वेगवेगळ्या टूलसह सुप्रिया सुळे यांच्या ऑडिओचे परीक्षण केले.
हियाने मोठ्या प्रमाणात एआय जनरेटेड असण्याची शक्यता व्यक्त केली. तर, ट्रू मीडियाने 100 टक्के शक्यता व्यक्त केली. आपण खाली दोन्ही साधनांचे परिणाम पाहू शकता.


याशिवाय 90 टक्क्यांहून अधिक एआय जनरेट होण्याची शक्यताही हायव्हने व्यक्त केली आहे. डीपफेक-ओ-मीटरने देखील सूचित केले की ते मोठ्या प्रमाणात एआय जनरेट झाले आहे.


हे आर्टिकल लिहिताना डीपफेक ॲनालिसिस युनिट (डीएयू) नाना पटोले यांच्या व्हायरल ऑडिओची चौकशी करत आहे. त्यांचा रिपोर्ट आल्यावर हे आर्टिकल अपडेट केले जाईल.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की सुप्रिया सुळे यांचा म्हणून शेअर केलेला ऑडिओ AI जनरेटेड आहे.
Our Sources
Post by Surpiya sule X account on 19th Nov 2024
Article Published by Times of India on 20th Nov 2024
Analysis by DAU
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
December 13, 2025
Vasudha Beri
December 12, 2025
Vasudha Beri
December 10, 2025