Claim
मगरीच्या पाठीवर बसलेल्या पुजाऱ्याचा व्हिडिओ.

Fact
व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या जास्त ब्राइटनेसमुळे आम्हाला शंका आली की हा व्हिडिओ एआय जनरेटेड असू शकतो. त्यानंतर आम्ही कैन्टीलक्स (Cantilux) नावाच्या एआय-व्हिडिओ डिटेक्शन टूलचा वापर करून त्याची चाचणी केली. चाचणीत असे आढळून आले की व्हिडिओ एआय जनरेटेड असण्याची ७०% शक्यता आहे.

न्यूजचेकरने व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च केला आणि ९ जून २०२५ रोजी @darkfilesAI नावाच्या YouTube चॅनेलवर व्हायरल व्हिडिओची स्पष्ट प्रत सापडली. त्यांच्या टिकटॉक चॅनेलवर असे अनेक अवास्तव व्हिडिओ शेअर केले गेले आहेत, जे दर्शवितात की ते AI जनरेटेड आहेत.
पुढे, आम्ही हाइव मॉडरेशन एआय-कंटेंट डिटेक्शन टूल वापरून व्हिडिओची चाचणी केली. त्यात असे आढळून आले की व्हिडिओ एआय-जनरेटेड किंवा डीपफेक कंटेंट असण्याची ८८.९% शक्यता आहे. न्यूजचेकरने यूबी मीडिया फॉरेन्सिक लॅबच्या डीपफेक-ओ-मीटर वापरून व्हिडिओची चाचणी देखील केली. बहुतेक डिटेक्टरने (८ पैकी ५) असा निष्कर्ष काढला की व्हिडिओ एआय-जनरेटेड असण्याची उच्च शक्यता आहे.


तपासातून आपण असा निष्कर्ष निघाला की पुजाऱ्याला पाठीवर बसवून मंदिरात घेऊन जाणाऱ्या मगरीचा व्हिडिओ एआय निर्मित आहे.
Sources
Cantilux tool
Hive Moderation tool
Deepfake-O-Meter
Youtube video, DarkfilesAI, June 9, 2025