महाराष्ट्रातील कोरोनाच्या संकटामुळे सरकारी अधिका-याला पत्रकार परिषदेतच रडू कोसळले असल्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. दावा करण्यात येत आहे की, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी आणि वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख श्री. ओमप्रकाश शेटे पत्रकारांशी बोलतांना रडले. मुंबई आणि इतर शहरांमध्ये कोविडची परिस्थिती नियंत्रणाबाहेर आहे, लोक मरत आहेत. महाराष्ट्रात संपूर्ण गोंधळ आहे.

Fact Check/Verification
ओमप्रकाश शेटे यांनी महाराष्ट्र सरकारने कोरोना व्हायरसची भितीदायक हाताळणी केल्याचा दावा केला. ओमप्रकाश शेटे हे राज्याच्या वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ओएसडी आहेत का याबाबत जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र आमच्या पडताळणीत ते भाजपा सरकारच्या काळात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ओएसडी आणि वैद्यकीय सहाय्यता कक्षाचे प्रमुख असल्याचे आढळून आले. यानंतर त्यांनी कोणेत्याही सरकारी पदावर काम केलेले नाही. व्हायरल व्हिडिओत शेटे यांना माध्यमांशी बोलताना रडू येेते, ते म्हणतात की, “मी तिथे प्रमुख होतो, आणि आम्ही पूर्वीच्या संघटनांबद्दल बोलू नये, परंतु खूप वाईट वाटले … कधीकधी मी झोपू शकत नाही, आम्ही बांधलेल्या मंदिराची रचना ढासळत आहे, सर्वसामान्य माणूस टिकू शकत नाही, वाईट वाटते पण फक्त मुख्यमंत्र्यांकडेच विवेकी अधिकार आहेत … ते कसे वापरायचे याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आहे.पण सध्या लोकांची परिस्थिती अत्यंत वाईट आहे. .. “
मात्र माध्यमांमध्ये शेटे हे एकमेव असे अधिकारी आहेत की जे आपल्या सरकारवर टीका करत असल्याचा चुकीचा संदेश व्हायरल झाला. यात opindia.comदेखील ते सध्या राज्याचे सरकारी अधिकारी असल्याचे म्हटले आहे.

यानंतर आम्हाला टिव्ही 9 मराठीच्या बातमीचा व्हिडिओ एका फेसबुक पेजवर आढळून आला, ज्याता ओमप्रकाश शेटे यांचा उल्लेख मुख्यमंत्री सहाय्यता निधीचे माजी प्रमुख असाच करण्यात आलेला आहे.
याशिवाय दैनिक लोकमतचे ट्विट देखील आढळून आले ज्यात,उपचाराअभावी लोकांचे जीव जात आहेत, सामान्य माणसाला कोणीच वाली नाही, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाचे माजीप्रमुख ओमप्रकाश शेटे पत्रकार परिषदेत रडले असे म्हटले आहे.
Conclusion
यावरुन हेच सिद्ध होते की, ओमप्रकाश शेटे हे भाजपाच्या काळात मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे प्रमुख होते, सध्या ठाकरे सरकारच्या काळात ते कोणत्याही सरकारी पदावर कार्यरत नाहीत, त्यामुळे सोशल मीडियात व्हायरल झालेला दावा चुकीचा आहे.
Result- Misleading
Sources
Lokmat – https://twitter.com/MiLOKMAT/status/1307941106672267265
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा, अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.