Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Crime
Claim
बांगलादेशात गणपती बसविला तर मुस्लिमांनी तोडफोड केली.
Fact
ही दृश्ये ऑगस्ट 2021 मधील आहेत, जेव्हा जमावाने पाकिस्तानातील रहीम यार जिल्ह्यातील सिद्धी विनायक मंदिराची तोडफोड केली होती.
बांगलादेशात गणपती बसविला तर तिथल्या मुस्लिम लोकांनी बघा काय हाल केले असे सांगणारा दावा सध्या मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला आहे.
“बांगलादेशमधी हिंदू लोकांनी गणपती बसवला तर तिथल्या मुस्लिम लोकांनी बघा काय हाल केले, अजून वेळ गेली नाही, एकजुट व्हा, ही जात कोणालाच होणार नाही, आपल्या भारतात, आपल्या महाराष्ट्रात, आपल्या जिल्ह्यात, आपल्या गावात जे मुस्लिम आहे हे सर्व सारखेच आहे, हे कधीच आपल्याला होणार नाही.” अशा कॅप्शनखाली व्हिडीओ शेअर करीत हा दावा केला जात आहे.
दाव्याचे संग्रहण येथे पाहता येईल.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
आमच्या तपासात आम्ही सर्वप्रथम व्हायरल व्हिडीओच्या किफ्रेम्सवर रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर टाइम्स ऑफ इंडियाच्या 4 ऑगस्ट 2021 च्या बातमीत असेच व्हिज्युअल आढळले. बातमीनुसार, दृश्ये पाकिस्तानमधील हिंदू मंदिरातील आहेत. रहिम यार खान जिल्ह्यातील सिद्धी विनायक मंदिराची पाकिस्तानात जमावाने तोडफोड केली, असे त्यामध्ये वाचायला मिळाले.
5 ऑगस्ट 2021 रोजी हिंदुस्तान टाइम्स आणि फ्री प्रेस जरनल या माध्यमांनी प्रसिद्ध केलेल्या बातम्यांमध्येही मंदिर तोडफोडीचा हा प्रकार पाकिस्तानातील असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यांचे रिपोर्ट इथे आणि इथे पाहता येतील.
स्थानिक सेमिनरीमध्ये कथितपणे लघवी करणाऱ्या नऊ वर्षीय हिंदू मुलाला जामीन मिळाल्यानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील एका हिंदू मंदिराची शेकडो लोकांनी तोडफोड केली. बुधवारी ही घटना रहीम यार खान शहरापासून 60 किमी अंतरावर असलेल्या भोंग गावात घडली. तोडफोडी व्यतिरिक्त, जमावाने सुक्कूर-मुलतान मोटरवे (M-5) देखील रोखला, असे आम्हाला वाचायला मिळाले.
ऑगस्ट 2021 मध्ये जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला आणि सोशल मीडियावर टीका झाली, तेव्हा पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाने या घटनेच्या चौकशीचे आदेश दिले. नंतर, खराब झालेले मंदिर दुरुस्ती केल्यानंतर हिंदू समुदायाला सुपूर्द करण्यात आले होते. यासंदर्भातील dw आणि इंडिया टुडेचे रिपोर्ट खाली पाहता येतील.
यावरून पाकिस्तानात तीन वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा व्हिडीओ आता बांगलादेशातील घटना म्हणून व्हायरल करण्यात आला असून नुकत्याच झालेल्या गणेशोत्सवाच्या निमित्ताने तो पसरविला जात आहे.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात बांगलादेशात गणपती बसविला तर मुस्लिमांनी तोडफोड केली असे सांगणारा दावा खोटा असल्याचे स्पष्ट झाले आहे. व्हायरल दृश्ये ऑगस्ट 2021 मधील आहेत, जेव्हा जमावाने पाकिस्तानातील रहीम यार जिल्ह्यातील सिद्धी विनायक मंदिराची तोडफोड केली होती.
Our Sources
News published by Times of India on August 5, 2021
News published by Hidusthan Times on August 5, 2021
News published by Free Press Journal on August 5, 2021
News published by dw.com on August 5, 2021
News published by India Today on August 10, 2021
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Runjay Kumar
July 15, 2025
Vasudha Beri
July 7, 2025
Salman
July 3, 2025