Authors
Claim
राहुल गांधी यांनी आपल्या भाषणात भारत मातेचा अपमान केला.
Fact
नाही, व्हायरल व्हिडिओ क्लिप्ड आहे.
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ते एका सभेत लोकांना भारत मातेचा अर्थ विचारताना दिसत आहेत. “राहुल गांधींना भारत मातेचा अर्थ माहित नाही आणि ते भारत मातेचा अपमान करत आहेत” असा दावा करत हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जात आहे.
मात्र, आमच्या तपासात आम्हाला आढळून आले की, व्हायरल व्हिडिओ क्लिप केलेला आहे. राजस्थानमधील बुंदी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी देशातील आदिवासी, मागासलेले लोक आणि दलितांना भारत माता म्हटले होते.
राजस्थान विधानसभा निवडणुकीसाठी 25 नोव्हेंबरला राज्यात एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. या कालावधीत राज्यातील विधानसभेच्या 200 पैकी 199 जागांवर मतदान होणार आहे. श्रीगंगानगर जिल्ह्यातील करणपूर मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार गुरमीत सिंह कुंअर यांचे 15 नोव्हेंबर रोजी निधन झाल्याने या जागेवर नंतर मतदान होणार आहे. राज्यात मुख्य लढत भारतीय जनता पक्ष आणि काँग्रेस यांच्यात आहे. याशिवाय आरएलपी, बसपा आणि आझाद समाज पक्षासह इतर अनेक पक्षांनीही अनेक विधानसभा जागांवर आपले उमेदवार उभे केले आहेत.
व्हायरल झालेला व्हिडिओ 18 सेकंदांचा आहे. व्हिडिओमध्ये राहुल गांधी असे म्हणताना दिसत आहेत, “प्रत्येकजण हा नारा देत आहे. भारताचा जय खूप ऐकू येतो. पण ही भारत माता कोण आहे, काय आहे?
हा व्हिडिओ अनेक व्हेरिफाईड X अकाउंट्सनी शेअर केला आहे ज्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लक्ष्य केले आहे.
आंध्र प्रदेशचे भाजप नेते रमेश नायडू यांनी त्यांच्या X अकाऊंटवरून व्हायरल व्हिडिओ इंग्रजी कॅप्शनसह शेअर केला आहे, त्याचा मराठी अनुवाद आहे, “राहुल गांधी यांनी विचारले भारत माता कोण आहे आणि भारत माता कि जय काय आहे. त्यांचा पंतप्रधान मोदींबद्दलचा द्वेष भारताच्या द्वेषात बदलला आहे.”
भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत X हँडलनेही राहुल गांधींना लक्ष्य करत हा व्हिडिओ शेअर केला आहे.
Fact Check/Verification
जेव्हा Newschecker ने व्हायरल दाव्याचा शोध घेण्यासाठी पहिल्यांदा भाजपच्या अधिकृत X खात्यावरून केल्या गेलेल्या ट्वीट ला तपासले तर आम्हाला कॉंग्रेसच्या सोशल मिडिया विभागाच्या चेयरपर्सन सुप्रिया श्रीनेत यांनी 20 नोव्हेंबर ला केलेले एक ट्विट मिळाले.
या ट्विटमध्ये भाजपने शेअर केलेल्या व्हायरल व्हिडिओला रिट्विट करताना त्यांनी सुमारे 3 मिनिटे 40 सेकंदांचा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हायरल व्हिडिओचा भाग आम्हाला लांब व्हिडिओच्या सुरुवातीला मिळाला. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी असे म्हणताना ऐकू येत आहेत की, “आत्ताच चंदना जी यांनी ‘भारत माता की जय’ असा नारा दिला आहे. तर प्रश्न असा आहे की, ‘भारत माता की जय’ हा नारा प्रत्येकजण खूप ऐकतो. पण ही भारतमाता कोण, ती काय, हा प्रश्न आहे. ज्याची आपण स्तुती करतो, आपण सर्वजण करतो, मी करतो, तुम्ही लोक करता, मग ही भारतमाता कोण आहे?”
राहुल गांधी पुढे म्हणाले, “देखिए, भारत माता ये धरती है. ये भारत माता इस देश के लोग हैं. आप सब के भाई, बहन, माता, पिता, गरीब लोग, अमीर लोग, बुजुर्ग लोग, सारे के सारे लोग जिनमें भारत माता की आवाज गूंजती है. ये भारत माता हैं. तो मैंने पार्लियामेंट में भाषण दिया और कहा कि देखिए मैं जानना चाहता हूं कि ये भारत माता कौन है, मतलब ये लोग कौन हैं? कितनी आबादी किसकी है? आदिवासी कितने, दलित कितने, पिछड़े लोग कितने, गरीब कितने, अमीर कितने हैं. अगर हम नारा लगाते हैं ‘भारत माता की जय’ और हम इसके लिए अपनी जान देते हैं तो हमें पता लगाना पड़ेगा कि भारत माता कौन है? अगर हमें मालूम ही नहीं कि इस देश में पिछड़े कितने, दलित कितने, गरीब कितने तो भारत माता की जय का मतलब क्या है. इसलिए इस देश को अब क्रांतिकारी काम करवाना पड़ेगा. इस देश को जातीय जनगणना करवानी पड़ेगी”.
तपासादरम्यान, आम्हाला राहुल गांधींच्या अधिकृत YouTube खात्यावरून 19 नोव्हेंबर 2023 रोजी लाइव्ह केलेला व्हिडिओ देखील सापडला. या व्हिडिओमध्ये राहुल गांधी यांनी राजस्थानमधील बुंदी येथे झालेल्या जाहीर सभेत केलेले संपूर्ण भाषण पाहायला मिळते.
संपूर्ण 35 मिनिटांचा व्हिडिओ ऐकल्यानंतर आम्हाला आढळून आले की, राहुल गांधी यांनी भारत माता आणि जात जनगणनेचा अर्थ सांगताना असेही म्हटले आहे की, “अंदाज लगाकर कह सकता हूं कि देश में कम से कम 50 प्रतिशत पिछड़े लोगों की आबादी है. उनको आप पिछड़ों, ओबीसी, मजदूर, किसान कह दो. दलितों की आबादी 15 प्रतिशत, आदिवासियों की आबादी 12-14 प्रतिशत है. मतलब भारत माता का सबसे बड़ा भाग दलित, आदिवासी और पिछड़ा है.”
यादरम्यान, आम्हाला अमर उजाला च्या वेबसाइटवर 19 नोव्हेंबर 2023 रोजी प्रकाशित झालेला रिपोर्टही सापडला. बुंदी येथील जाहीर सभेत राहुल गांधींनी भारत मातेचा उल्लेख करून जात जनगणनेची खेळी केल्याचे यामध्ये सांगण्यात आले. यावेळी त्यांनी जात जनगणनेच्या मागणीसाठी पंतप्रधान मोदींवरही हल्लाबोल केला.
Conclusion
आम्हाला आमच्या तपासात आढळून आले की, राजस्थानमधील बुंदी येथे एका जाहीर सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी देशातील आदिवासी, मागासलेले लोक आणि दलितांना भारत माता म्हटले होते.
Result: Missing Context
Our Sources
Video Tweeted by Supriya Shrinet on 19th Nov 2023
Live Video of 19th Nov 2023 on Rahul Gandhi Youtube account
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा