Claim
सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करून दावा केला जात आहे की, शेतकरी आंदोलनादरम्यान सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दारूचे वाटप होत आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact
शेतकरी आंदोलनादरम्यान सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दारू वाटण्याच्या नावाखाली शेयर केलेल्या या दाव्याची 8 फेब्रुवारी 2021 रोजी न्यूजचेकरने तपासणी केली होती. आमच्या तपासणीनुसार, व्हायरल व्हिडिओ एप्रिल 2020 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे आणि सध्याच्या शेतकरी आंदोलनाशी त्याचा काहीही संबंध नाही.
याव्यतिरिक्त, Yandex वर व्हायरल व्हिडिओची मुख्य फ्रेम शोधल्यावर, आम्हाला एप्रिल 2020 मध्ये शेअर केलेल्या काही इतर पोस्ट देखील आढळल्या. यापैकी काही पोस्ट आता उपलब्ध नाहीत.

त्यामुळे शेतकरी आंदोलनादरम्यान सिंघू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये दारू वाटपाच्या नावाखाली करण्यात येत असलेला हा दावा दिशाभूल करणारा असल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले आहे. वास्तविक, व्हायरल व्हिडिओ एप्रिल 2020 पासून इंटरनेटवर उपलब्ध आहे.
Result: False
Our Sources
Social media posts from April 2020
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा