Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact CheckFact Check: महिलांच्या वेशात प्रवास करणारा तरुण मुलींना पळवतो? जुना व्हिडीओ चुकीच्या...

Fact Check: महिलांच्या वेशात प्रवास करणारा तरुण मुलींना पळवतो? जुना व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Claim
महिलांच्या वेशात बसून गुंगीचे औषध देण्याचा आणि पळविण्याचा प्रकार सुरु असून एक तरुण अशाच प्रयत्नात पकडला गेला आहे.
Fact
चुकीचे संदर्भ देऊन हा दावा केला जात आहे. दिल्ली येथे महिलांना असलेल्या मोफत बससेवेचा लाभ असे वेषांतर करून घेताना हा तरुण पकडला गेला होता.

सोशल मीडियावर सध्या एक मेसेज मोठ्याप्रमाणावर व्हायरल होत आहे. फेसबुक, ट्विटर आणि व्हाट्सअपवर एक व्हिडीओ शेयर करून दावा केला जात आहे की, “महिलांच्या वेशात मुलींच्या शेजारी बसतात आणि मुलींना गुंगी येण्याचे खाद्य पदार्थ खायला देतात. मुलगी बेशुद्ध पडल्यावर त्यांच्या माणसांनी व्यवस्था केलेल्या रुग्णवाहिकेला कॉल करतात आणि रुग्णालयात नेण्याचे नाटक करून मुलींना गायब करतात.”

ही पोस्ट करताना “ही त्यांची योजना आहे.हजारो मुली, महिला बेपत्ता झाल्याची प्रकरणे आहेत.. महिलांनी सावध राहावे. लक्षात ठेवा 32,000 मुली, महिला महाराष्ट्रातून गायब झालेल्या आहेत. हे प्रत्येक ग्रुपला शेअर करा.” असे आवाहन केले जात आहे.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: महिलांच्या वेशात प्रवास करणारा तरुण मुलींना पळवतो? जुना व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल

Fact Check/ Verification

व्हायरल व्हिडिओमध्ये मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणावरून सावधगिरीचा इशारा दिला जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले. आम्ही सदर व्हिडीओ बारकाईने पाहिला. सुरुवातीला पेहरावानुसार महिला भासणाऱ्या व्यक्तीशी दुसरी व्यक्ती हिंदी भाषेतून संवाद साधत असल्याचे आणि चेहऱ्यावरील मास्क काढण्यास सांगत असल्याचे आमच्या निदर्शनास आले. सदर व्यक्तीने मास्क हटविल्यानंतर ती महिला नसून पुरुष असल्याचे दिसून येते. दरम्यान व्हिडिओमध्ये कुठेही महिला किंवा मुलींना गायब करण्याच्या विषयावर बोललेले आम्हाला ऐकायला मिळाले नाही. आम्ही गुगल किवर्ड च्या मदतीने अशी घटना कुठे घडली आहे का? आणि महिलांच्या वेशात येऊन मुलींना गायब केले गेले आहे का? याचा शोध घेतला. मात्र न्यूजचेकरला अपेक्षित माहिती मिळाली नाही.

आम्ही व्हायरल व्हिडीओचे किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च घेतला असता. संबंधित व्हिडीओ @KhabarTehkikat या युट्युब चॅनेलने २४ मार्च २०२२ रोजी अपलोड केलेली एक व्हिडीओ न्यूज मिळाली.

या व्हिडीओ न्यूजमध्ये व्हायरल व्हिडीओ जसाच्या तसा घालण्यात आल्याचे आणि त्यासंदर्भातील बातमी अँकरने सांगितल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. प्रत्यक्षात महिलांच्या वेशात येऊन बसचे तिकीट वाचविण्याच्या प्रयत्नात असलेल्या तरुणाचा बस कंडक्टर ने पर्दाफाश केल्याचा दिल्ली येथील प्रकार या व्हिडिओत कैद झालेला असल्याचे आमच्या निदर्शनास आले. “दिल्ली येथे महिलांना बस प्रवास मोफत आहे. दरम्यान तिकिटाचे पैसे वाचविण्यासाठी एका तरुणाने महिलेचा वेष परिधान केला होता. मात्र कंडक्टरच्या निदर्शनास हा प्रकार आल्याने त्याने त्या तरुणाला चेहऱ्यावर घातलेला मास्क काढण्यास दटावले, आणि महिलेच्या वेशातील त्या व्यक्तीच्या दाढीमिश्या बाहेर आल्या.” अशी घटना आम्हाला ऐकायला आणि पाहायला मिळाली.

या अनुषंगाने आणखी शोध घेत असताना आम्हाला अमर उजाला ने २३ मार्च २०२२ रोजी प्रसिद्ध केलेली एक बातमी सापडली.

Fact Check: महिलांच्या वेशात प्रवास करणारा तरुण मुलींना पळवतो? जुना व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल
Screengrab of Amar Ujala

बातमीत व्हायरल व्हिडीओचे स्क्रीनग्रॅब वापरण्यात आले आहेत. “पैसे वाचविण्यासाठी मुलगी बनून बसने प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा पर्दाफाश झाल्याचे आणि दिल्लीत एक हैराण करणारी घटना उघडकीस आल्याचे” सांगून सदर घटनेची माहिती अमर उजाला ने दिल्याचे आम्हाला वाचायला मिळाले.

दिल्ली येथील केजरीवाल सरकारने महिला आणि मुलींसाठी २९ ऑक्टोबर २०१९ पासून मोफत बस प्रवासाची योजना सुरु केली. आजतक ने याचदिवशी प्रसिद्ध केलेली बातमी आमच्या पाहणीत आली.

Fact Check: महिलांच्या वेशात प्रवास करणारा तरुण मुलींना पळवतो? जुना व्हिडीओ चुकीच्या संदर्भाने व्हायरल
Screengrab of AajTak

दरम्यान महिलांसाठीच्या मोफत बस योजनेचा गैरफायदा घेण्यासाठी संबंधित व्यक्तीने आपण स्वतः महिलांचा वेष परिधान केल्याचे आणि या प्रकारात तो अडकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले. दरम्यान तोच व्हिडीओ घेऊन सोशल मीडियावर चुकीचा संदर्भ देऊन व्हायरल होत असल्याचे दिसून आले आहे.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात महिलांचा वेष परिधान करून मुलींना गायब केले जात आहे. असे सांगून व्हायरल केला जात असलेला व्हिडीओ जुना आणि विनातिकीट बस प्रवास करण्यासाठी दिल्ली येथे वेषांतर करून प्रवास करणाऱ्या तरुणाचा असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून चुकीचा संदर्भ देऊन दिशाभूल करण्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Result: Partly False

Our Sources
Video uploaded by KhabarTehkikat on March 24, 2022
News published by Amar Ujala on March 23, 2022
News published by Aaj Tak on October 29, 2019


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Authors

Pankaj Menon is a fact-checker based out of Delhi who enjoys ‘digital sleuthing’ and calling out misinformation. He has completed his MA in International Relations from Madras University and has worked with organisations like NDTV, Times Now and Deccan Chronicle online in the past.

Most Popular