Authors
Claim
भाजपचे सरकार आल्यास एसटी-एससी आणि ओबीसीचे आरक्षण संपुष्टात आणू, असे अमित शहा म्हणाले. येथे एक्स-पोस्टचे संग्रहण पहा.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact
एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण संपवण्याबाबत बोलत असलेल्या अमित शहांच्या या व्हिडिओची कीफ्रेम गुगल लेन्सच्या मदतीने शोधण्यात आली. यादरम्यान, आम्हाला 23 एप्रिल 2023 रोजी PTI च्या हवाल्याने हिंदुस्तान टाइम्सने प्रकाशित केलेली बातमी मिळाली. तेलंगणात भाजपचे सरकार आल्यास मुस्लिम आरक्षण संपुष्टात येईल, असे अमित शहा यांनी म्हटल्याचे वृत्त आहे. वृत्तानुसार, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी तेलंगणातील चेवेल्ला येथे विजय संकल्प सभेदरम्यान हे वक्तव्य केले होते.
मिळालेल्या रिपोर्टच्या आधारे, आम्ही Google वर काही कीवर्ड शोधले. आम्हाला 25 एप्रिल 2023 रोजी Aaj Tak ने प्रकाशित केलेला व्हिडिओ रिपोर्ट प्राप्त झाला. व्हायरल क्लिपचा भाग रिपोर्टमध्ये पाहिला जाऊ शकतो. व्हिडीओमध्ये अमित शाह ‘भाजपचे सरकार आल्यास आम्ही असंवैधानिक मुस्लिम आरक्षण संपवू’, असे म्हणताना दिसत आहेत.
शोध घेतल्यानंतर आम्हाला 23 एप्रिल 2023 रोजी अमित शाह यांच्या YouTube चॅनेलवर अपलोड केलेला 22 मिनिटे 52 सेकंदांचा व्हिडिओ सापडला. व्हिडिओच्या 14 मिनिटे 35 सेकंदावर अमित शाह म्हणतात, “जर भारतीय जनता पक्षाचे सरकार स्थापन झाले तर आम्ही असंवैधानिक मुस्लिम आरक्षण संपवू. हा अधिकार तेलंगणातील एससी-एसटी आणि ओबीसींचा आहे, त्यांना तो अधिकार मिळेल आणि आम्ही मुस्लिम आरक्षण संपवू.”
याव्यतिरिक्त, आम्हाला हा व्हिडिओ ETV तेलंगणाच्या YouTube चॅनेलवर देखील आढळला. इथेही अमित शहा मुस्लीम आरक्षण संपवण्याबाबत बोलताना दिसत आहेत.
मात्र, संपूर्ण व्हिडिओमध्ये अमित शाह यांनी एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण रद्द करण्याबाबत काहीही बोललेले नाही. वृत्तानुसार, अमित शाह यांच्या या बनावट व्हिडिओविरोधात तक्रार मिळाल्यानंतर दिल्ली पोलिसांनी आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
त्यामुळे आमच्या तपासात अमित शाह यांचा व्हायरल व्हिडिओ एडिट झाल्याचे स्पष्ट झाले. आपल्या भाषणात त्यांनी एससी-एसटी आणि ओबीसींचे आरक्षण रद्द करण्याबाबत काहीही बोलले नाही. 2023 मध्ये तेलंगणातील एका रॅलीमध्ये अमित शाह यांनी राज्यातील मुस्लिम आरक्षण संपुष्टात आणण्याबाबत आणि एससी-एसटी आणि ओबीसींना त्यांचे हक्क देण्याबाबत बोलले होते.
Result: Altered Video
Sources
Report By Hindustan Times, Dated April 23, 2023
Report By Aajtak, Dated April 25, 2023
Amit Shah YouTube Channel Video, Dated April 23, 2023
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in