Tuesday, November 19, 2024
Tuesday, November 19, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले...

फॅक्ट चेक: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले? येथे जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे पोस्टर लावण्यात आले असून त्यावर ‘बदला पुरा’ असे लिहिले आहे.

Fact
बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर २३ सप्टेंबर रोजी हे पोस्टर्स लावण्यात आले होते.

सोशल मीडियावर एक पोस्टर खूप व्हायरल होत आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो आणि बदला पुरा असे शब्द असलेले पोस्टर्स मुंबईभर लावण्यात आल्याचा दावा केला जात आहे.

तथापि, आमच्या तपासात आम्हाला आढळून आले की बदलापूर बलात्कार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याचा २३ सप्टेंबरला एन्काउंटर झाल्यानंतर मुंबईतील अनेक भागात हे पोस्टर्स लावण्यात आले होते. मात्र, यातील अनेक पोस्टर्स नंतर काढण्यात आली.

१२ ऑक्टोबर रोजी मुंबईतील वांद्रे भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे नेते बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. बाबा सिद्दीकीच्या हत्येनंतर लॉरेन्स बिश्नोई टोळीच्या कथित सदस्याने फेसबुकवर पोस्ट टाकून हत्येची जबाबदारी घेतली.

व्हायरल दावा दोन छायाचित्रांच्या कोलाजसह शेअर करण्यात आला आहे, त्यापैकी एक उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो असलेले पोस्टर आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस हातात बंदूक घेतलेले दिसत असून त्याच्या पुढे मोठ्या अक्षरात “बदला पुरा” असे लिहिले आहे.

हा कोलाज आप आमदार नरेश बल्यान यांनी त्यांच्या X खात्यावरून शेअर करताना, लिहिले आहे की, “महाराष्ट्र सरकार के एक पूर्व मंत्री, राजनेता और एक उद्योगपति की हत्या हो गई. उसके बाद पुरे मुंबई में महाराष्ट्र के गृहमंत्री और उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस की फोटो लगा कर पोस्टर लगा दिया गया “बदला पूरा”. इसका क्या मतलब क्या हुआ की ये हत्या फडणवीस ने करवाई है? एक गृहमंत्री और उपमुख्यमंत्री का ऐसा पोस्टर पूरे शहर में बिना उसकी मर्जी के लग सकता है?”  

फॅक्ट चेक: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले? येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: X/AAPNareshBalyan

याशिवाय हा कोलाज फेसबुकवरही व्हायरल दाव्यासोबत पाहायला मिळतो.

फॅक्ट चेक: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले? येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: FB/K.R.NOKHWAL

Fact Check/ Verification

व्हायरल दाव्याचा तपास करताना, रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर, आम्हाला कोलाजमध्ये असलेले पहिले चित्र २६ सप्टेंबर २०२४ रोजी हिंदुस्तान टाइम्सच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातमीत आढळले.

फॅक्ट चेक: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले? येथे जाणून घ्या सत्य

फोटोसोबतच्या कॅप्शन आणि रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, बदलापूर पूर्व, ठाणे येथील एका शाळेत शिकणाऱ्या दोन चार वर्षांच्या विद्यार्थिनींचे शोषण केल्याप्रकरणी सफाई कामगार अक्षय शिंदेला अटक करण्यात आली होती. अटक केल्यानंतर २३ सप्टेंबर रोजी पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याने पोलिस कर्मचाऱ्याची बंदूक हिसकावून घेतली आणि तीन राऊंड फायर केले, त्यानंतर त्याला प्रत्युत्तरात मारण्यात आले. चकमकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पोलिसांचा बचाव केला तर देवेंद्र फडणवीस यांचा चेहरा आणि त्यात ‘बदला पुरा’ असे लिहिलेले पोस्टर्स मुंबईतील अनेक भागात लावण्यात आले होते.

याशिवाय, २६ सप्टेंबर २०२४ रोजी आज तकच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या बातमीतही अशी पोस्टर्स पाहिली. बदलापूर चकमकीनंतर मुंबईतील अनेक भागात देवेंद्र फडणवीस यांना बंदुकीसह दाखवणारे पोस्टर्स लावण्यात आल्याचेही यात सांगण्यात आले आहे. मात्र, पोस्टर लावणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा पक्षाच्या नावाचा उल्लेख नव्हता. चकमकीप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान हे पोस्टर्स न्यायालयासमोर ठेवण्यात आल्याचेही बातमीत सांगण्यात आले आहे.

फॅक्ट चेक: बाबा सिद्दीकी यांच्या हत्येनंतर देवेंद्र फडणवीस यांचे “बदला पुरा” वाले पोस्टर्स मुंबईत लावण्यात आले? येथे जाणून घ्या सत्य

दरम्यान, आम्हाला २५ सप्टेंबर २०२४ रोजी इंडियन एक्सप्रेसच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला. भाजपने असे कोणतेही पोस्टर लावले नसल्याचे स्पष्ट केल्याचे यात सांगण्यात आले. नंतर मुंबई महापालिकेने अशी अनेक पोस्टर्स हटविली.

आमच्या तपासात आम्ही बदलापूर येथील एका स्थानिक पत्रकाराशीही संपर्क साधला. अक्षय शिंदेच्या एन्काउंटरनंतरच हे पोस्टर्स लावण्यात आले होते आणि नंतर ते काढून टाकण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महत्वाचे म्हणजे, आरोपी अक्षय शिंदे हा बदलापूर येथील एका शाळेत सफाई कामगार म्हणून काम करत होता, त्याने १२ आणि १३ ऑगस्ट रोजी शाळेतील मुलींच्या स्वच्छतागृहात ४ वर्षांच्या दोन मुलींचे लैंगिक शोषण केले होते. या दोन्ही मुली शाळेत जाण्यास घाबरत होत्या. पालकांच्या चौकशीदरम्यान एका मुलीने हा प्रकार सांगितला आणि त्यानंतर दोन्ही मुलींची वैद्यकीय चाचणी करण्यात आली. यानंतर १६ ऑगस्ट रोजी पोलिसांनी याप्रकरणी तक्रार नोंदवली आणि १७ ऑगस्ट रोजी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात आली.

POCSO प्रकरण असूनही पोलिसांनी उशिरा गुन्हा दाखल केला होता, त्यामुळे लोकांनी २० ऑगस्ट रोजी बदलापूर रेल्वे स्थानकावर निदर्शने केली होती. यानंतर विरोधी पक्षांनीही महाराष्ट्र बंदची हाक दिली. तब्बल एक महिन्यानंतर २३ सप्टेंबर रोजी ठाणे पोलीस अक्षयला त्याच्या माजी पत्नीवरील बलात्कार प्रकरणी तपासासाठी तळोजा कारागृहातून बदलापूरला घेऊन जात होते. त्याच दिवशी सायंकाळी सहाच्या सुमारास पोलिसांचा आरोपी अक्षयशी सामना झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कारागृहात परतत असताना त्याने पोलिस कर्मचाऱ्याचे रिव्हॉल्व्हर हिसकावले आणि गोळीबार केला, त्याला प्रत्युत्तर म्हणून उपनिरीक्षक संजय शिंदे यांनीही गोळीबार केला, गोळी आरोपीच्या डोक्यात लागली. यानंतर आरोपीला रुग्णालयात नेण्यात आले, तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले.

Conclusion

हे व्हायरल पोस्टर बाबा सिद्दिकीच्या हत्येनंतर नव्हे तर बदलापूर चकमकीनंतर लावण्यात आल्याचे आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून स्पष्ट झाले आहे.

Result: Missing Context

Our Sources
Article Published by Hindustan Times on 26th Sep 2024
Article Published by AAJ TAK on 26th Sep 2024
Article Published by Indian Express on 26th Sep 2024
Telephonic Conversation with Badlapur Journalist


(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून ते इथे वाचता येईल.)

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular