Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
टोल कर्मचाऱ्यांसोबत गैरवर्तनाचा हा व्हिडिओ भारतातील आहे.
Fact
नाही, हा व्हिडिओ बांगलादेशचा आहे.
सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये कुर्ता पायजमा आणि इस्लामिक टोपी घातलेले काही लोक टोल प्लाझाची तोडफोड करताना आणि टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ अप्रत्यक्षपणे भारतातील असल्याचे शेअर केले जात आहे.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की व्हायरल दावा खोटा आहे. हा व्हिडिओ बांगलादेशची राजधानी ढाका येथील कुरील टोल प्लाझा येथे घडलेल्या घटनेचा आहे.
व्हायरल व्हिडिओ सुमारे 1 मिनिट 8 सेकंदांचा आहे, ज्यामध्ये टोल प्लाझावर पिवळ्या रंगाची पिकअप व्हॅन उभी केलेली दिसत आहे. यावेळी पांढरा कुर्ता पायजमा आणि इस्लामिक टोपी घातलेला एक व्यक्ती टोल कर्मचाऱ्यांशी भांडताना दिसत आहे. यावेळी पिकअप व्हॅनमध्ये उपस्थित असलेले आणखी काही लोक खाली आले. यानंतर ते टोलनाक्यावरील अडथळा तोडतात आणि टोल कर्मचाऱ्यांशी भांडतात. मग ते तिथून त्यांची गाडी काढतात.
व्हायरल दावे करत व्हिडिओ अप्रत्यक्ष मथळ्यांसह शेअर केला आहे.
व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी Newschecker ने व्हिडिओच्या मुख्य फ्रेम्सचा रिव्हर्स इमेज सर्च घेतला. या वेळी, आम्हाला 18 सप्टेंबर 2024 रोजी ढाका ट्रिब्यूनच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेला रिपोर्ट सापडला, ज्यामध्ये व्हायरल व्हिडिओमधील दृश्ये फीचर्ड इमेज म्हणून वापरली होती.
रिपोर्टमध्ये दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 18 सप्टेंबर रोजी सकाळी 9.48 वाजता ढाका एलिव्हेटेड एक्सप्रेसवेच्या कुरिल टोल प्लाझा येथे घडली. सुमारे 30-40 जणांना घेऊन एक पिकअप व्हॅन टोल प्लाझातून जाण्याचा प्रयत्न करत होती. यावेळी टोल कर्मचाऱ्यांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आधी कर्मचाऱ्यांशी वाद घातला आणि नंतर बॅरिकेड तोडले.
ढाका एलिव्हेटेड एक्स्प्रेस वेचे प्रकल्प संचालक एएचएम अख्तर यांचे विधानही अहवालात होते. एक्स्प्रेस वेवर पिकअप व्हॅन, मोटारसायकल, सीएनजी वाहने आणि रिक्षा यांना मनाई आहे, कारण त्यांच्यामुळे अपघाताचा धोका आहे, असे एएचएम अख्तर यांनी सांगितले होते. त्यामुळे टोल कर्मचाऱ्यांनी त्या लोकांना रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना ते मान्य झाले नाही आणि भांडण झाल्यावर टोल न भरताच ते निघून गेले.
याशिवाय, आम्हाला 18 सप्टेंबर 2024 रोजी समय टीव्हीच्या यूट्यूब खात्यावरून अपलोड करण्यात आलेला एक रिपोर्ट देखील सापडला. या व्हिडीओ रिपोर्टमध्ये व्हायरल झालेल्या व्हिडीओतील दृश्येही होती. याशिवाय ढाका येथील कुरील टोल प्लाझा येथे पिकअप व्हॅनमध्ये आलेल्या लोकांनी आधी टोल कर्मचाऱ्यांशी गैरवर्तन केले आणि नंतर टोल नाका तोडून तेथून निघून गेल्याचेही त्यामध्ये सांगण्यात आले आहे.
तपासादरम्यान, आम्हाला द मेट्रो टीव्ही नावाच्या बांगलादेशी न्यूज आउटलेटच्या YouTube खात्यावरून 18 सप्टेंबर 2024 रोजी अपलोड केलेला व्हिडिओ रिपोर्ट देखील सापडला. या व्हिडीओ रिपोर्टमध्ये व्हायरल व्हिडीओतील दृश्येही पाहता येतील. रिपोर्टमध्येही हा व्हिडिओ कुरील टोल प्लाझाचा असल्याचे सांगण्यात आले होते.
आमच्या तपासात मिळालेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट झाले आहे की, व्हायरल झालेला व्हिडिओ बांगलादेशातील टोल प्लाझा येथे घडलेल्या एका घटनेचा आहे. हा व्हिडिओ खोटा जातीय दावा करून शेअर केला जात आहे.
Our Sources
Report Published by Dhaka Tribune on 18th Sep 2024
Video Report by SOMOY TV on 18th Sep 2024
Video Report by The Metro TV on 18th Sep 2024
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर हिंदीसाठी रुंजय कुमार यांनी केले असून, ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Vasudha Beri
July 7, 2025
Salman
July 3, 2025
Runjay Kumar
June 26, 2025