Saturday, December 21, 2024
Saturday, December 21, 2024

HomeFact CheckFact Check: बिअर पिण्याचे इतके फायदे आहेत का? संपूर्ण सत्य जाणून घ्या

Fact Check: बिअर पिण्याचे इतके फायदे आहेत का? संपूर्ण सत्य जाणून घ्या

Claim
बिअर प्यायल्याने हार्ट अटॅकचा धोका कमी होतो, हाडे मजबूत राहतात, चेहऱ्यावर चमक येते आणि किडनी स्टोनचा त्रास होत नाही.

Fact
बीअर न पिणाऱ्यांमध्ये हृदयाशी संबंधित आजार, किडनी स्टोन, कमकुवत हाडांच्या तक्रारी अधिक आढळतात, असे कोणतेही संशोधन नाही.

सोशल मीडियावर एका इंस्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून असा दावा केला जात आहे की, बिअर पिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो, हाडे मजबूत राहतात, चेहऱ्यावर चमक येते आणि किडनी स्टोन होत नाही.

Fact Check: बिअर पिण्याचे इतके फायदे आहेत का? संपूर्ण सत्य जाणून घ्या
Courtesy: Instagram/bad_boy_nishant_750

‘bad_boy_nishant_750’ या इंस्टाग्राम हँडलवरून हा दावा करण्यात आला आहे. पोस्टमधील व्हिडिओला आतापर्यंत दोन लाखांहून अधिक लोकांनी लाईक केले आहे. चला तर मग, व्हिडिओमध्ये करण्यात आलेले किती दावे खरे की खोटे हे या लेखातून पाहूया.

Fact Check/ Verification

तपासात आम्हाला असे काही पुरावे मिळाले ज्यात मर्यादित प्रमाणात बिअर पिण्याचे काही संभाव्य फायदे सांगितले गेले आहेत. ते खालीलप्रमाणे आहेत.

  1. हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी फायदे: काही अभ्यासांमध्ये असे नमूद करण्यात आले आहे की मर्यादित प्रमाणात बिअर पिल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. या अभ्यासानुसार, बिअर सूज कमी करते, रक्त कार्य सुधारते आणि रक्ताच्या गुठळ्या होण्याचा धोका कमी करते.
  2. मूतखडे: बिअरमध्ये काही संयुगे असतात जे किडनीमध्ये स्टोन तयार होण्यापासून रोखू शकतात. लघवीतील कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यामुळे असे होते.
  3. मुरुम कमी करण्यासाठी आणि चेहरा चमकण्यासाठी प्रभावी: असे काही रिपोर्ट्स नक्कीच सांगतात की बिअरमध्ये असलेले व्हिटॅमिन चेहऱ्यावरील मुरुम कमी करू शकतात. याच्या मदतीने चेहराही उजळतो. केसांसाठीही ते फायदेशीर आहे.
  4. हाडांच्या मजबुतीसाठी: बिअरमध्ये सिलिकॉन असते, जे हाडांची घनता सुधारण्यास मदत करते आणि ऑस्टियोपोरोसिसचा धोका कमी करते.

तथापि, या पुराव्यांमध्ये हे देखील सांगण्यात आले आहे की जास्त मद्यप्राशन शरीरासाठी हानिकारक आहे. बिअरच्या कोणत्याही संभाव्य फायद्यांबरोबरच, यामुळे आरोग्यालाही धोका निर्माण होऊ शकतो हेही लक्षात ठेवायला हवे.

पोस्टमध्ये केल्या जाणाऱ्या दाव्यांबाबत, मुंबईच्या डॉक्टर कश्यप दक्षिणी म्हणतात, “बिअर पिण्याने हृदय निरोगी राहते, किडनी स्टोन होत नाही, कोलेस्ट्रॉलची समस्या उद्भवत नाही आणि हाडे मजबूत राहतात, असे रिपोर्ट नक्कीच आहेत. परंतु असे कोणतेही संशोधन कोणत्याही अस्सल वैद्यकीय नियतकालिकात किंवा शोधनिबंधात आलेले नाही, जे सांगते की या सर्व समस्या (हृदय, कोलेस्ट्रॉल, हाडे, दगड) बिअर न पिणाऱ्या लोकांमध्ये जास्त आढळतात.”

हृदयाशी संबंधित समस्या, किडनी स्टोन, खराब कोलेस्ट्रॉल इत्यादी होण्यास अनेक कारणे असू शकतात. जसे की जीवनशैली, सवयी, पाण्याचे कमी सेवन, पोषण, अनुवंशिकता इ. याव्यतिरिक्त, जास्त प्रमाणात बीअर पिण्यामुळे टाइप 2 मधुमेह, डिस्लिपिडेमिया, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब, हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी रोग आणि हाडांच्या घनतेच्या समस्या उद्भवू शकतात.

Conclusion

एकंदरीत, निष्कर्ष असा आहे की बिअर पिल्याने हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो, हाडे मजबूत राहतात, चेहऱ्यावर चमक येते आणि किडनी स्टोनचा त्रास होत नाही ही एक मानवी कल्पना आहे.

Result: Missing Context

(This article has been published in collaboration with THIP Media)


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular