Tuesday, November 19, 2024
Tuesday, November 19, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: हा कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील नाही, येथे...

फॅक्ट चेक: हा कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील नाही, येथे जाणून घ्या सत्य

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील आहे.
Fact

हा दावा खोटा आहे. हा व्हिडीओ राजस्थानातील जयपूर येथील अजमेर रोडवरील घटनेचा आहे.

एका महामार्गावर कार आगीत जळतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल आहे. संबंधित व्हिडीओ अर्थात घटना मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवर घडली असा दावा केला जात आहे.

फॅक्ट चेक: हा कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील नाही, येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: X@Satishrathod100

“कार अचानक पेटू लागली आणि पुढे सरकत गेली. यामुळे मालाड जवळ महामार्गावर भीतीदायक स्थिती निर्माण झाली.” असे हा दावा सांगतो.

Fact Check/ Verification

सर्वप्रथम आम्ही मुंबईच्या मालाडजवळ अलीकडे अशी कोणती घटना घडली आहे का? हे शोधण्यासाठी Google वर संबंधित किवर्ड शोधले. मात्र अशा अलीकडील कोणत्याच घटनेच्या बातम्या आम्हाला पाहायला मिळाल्या नाहीत.

फॅक्ट चेक: हा कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील नाही, येथे जाणून घ्या सत्य

पुढे व्हायरल दाव्याच्या तपासणीसाठी आम्ही व्हायरल व्हिडिओच्या काही किफ्रेम्स काढल्या आणि त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला pratidintime नावाच्या इंस्टाग्राम हँडलवर १३ ऑक्टोबर २०२४ रोजी अपलोड केलेला व्हिडीओ पाहायला मिळाला. हा व्हिडीओ व्हायरल व्हिडिओशी मिळताजुळता असल्याचे आम्हाला दिसले. कॅप्शनमध्ये “Driverless Car in Flames Speeds Down Jaipur Road” अर्थात “ज्वाळांमध्ये अडकलेल्या चालकविरहित कारने जयपूर येथील रस्त्याचा वेग खाली आणला” अशी माहिती वाचायला मिळाली.

फॅक्ट चेक: हा कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील नाही, येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: instagram@pratidintime

अधिक माहिती देताना “”अजमेर रोडवरील एका एलिव्हेटेड रस्त्यावरून जयपूरमधील सुदर्शनपुरा पुलियाकडे जाणारी एक ड्रायव्हरविना कार शनिवारी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आणि रस्त्याच्या दुभाजकाला धडकण्यापूर्वी पार्क केलेल्या दुचाकीला धडकली. कारच्या इंजिनमधून येणाऱ्या धुराची तपासणी करण्यासाठी चालक बाहेर पडल्यानंतर ही घटना घडली, जी नंतर पेटली. रस्त्यावर रहदारी असूनही, वाहनधारकांनी त्यांची वाहने सुरक्षित ठिकाणी हलवण्यास धडपड केल्याने कोणतीही दुखापत झाली नाही. दुभाजकाला धडकून जळणारी कार अखेर थांबली.” असे लिहिण्यात आले होते. संबंधित हॅन्डल न्यूज कंपनीचे असल्याने तसेच यातून ही घटना राजस्थानच्या जयपूर येथील अजमेर येथे घडली असल्याचा सुगावा मिळाल्याने आम्ही पुढील शोध त्यादिशेने घेतला.

संबंधित शोध घेताना आम्हाला Etv भारत राजस्थानने आपल्या वेबसाईटवर १२ ऑक्टोबर २०२४ रोजी प्रकाशित केलेला व्हिडीओ आणि टेक्स्ट रिपोर्ट सापडला. यामध्ये व्हायरल व्हिडिओशी संपूर्ण घटनेची माहिती देण्यात आली आहे.

फॅक्ट चेक: हा कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील नाही, येथे जाणून घ्या सत्य
Courtesy: ETv Bharat Rajasthan

“राजधानी जयपूरमधील अजमेर रोडवर चालत्या कारला आग लागल्याची घटना समोर आली आहे. कारने अचानक पेट घेतला आणि नंतर ब्रेक फेल झाल्याने कार थांबली नाही. काही वेळातच गाडी पेटू लागली. कार चालकाने उडी मारून जीव वाचवला. आग लागल्यानंतरही कार पुढे जात राहिली आणि पुढे असलेल्या दुचाकीलाही धडकली. पुढे डिव्हायडरला धडकून कार थांबली.” असे Etv भारत राजस्थानच्या रिपोर्टमध्ये आम्हाला वाचायला मिळाले.

पुढील शोध घेताना आम्हाला Rajsthan Tak या युट्युब चॅनेलने व्हायरल व्हिडिओशी प्रकाशित केलेला १२ ऑक्टोबर २०२४ चा व्हिडीओ रिपोर्ट सापडला. यामध्येही राजस्थानच्या जयपूर येथेच ही बर्निंग कारची घटना घडल्याचा स्पष्ट उल्लेख आम्हाला पाहायला मिळाला.

फॅक्ट चेक: हा कार जळतानाचा व्हिडीओ मुंबईच्या मालाड ईस्ट हायवेवरील नाही, येथे जाणून घ्या सत्य

यावरून संबंधित घटना मुंबईच्या मालाड नजीकच्या नसून जयपूर येथील असल्याचे स्पष्ट झाले.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात राजस्थानच्या जयपूर येथे घडलेली घटना मुंबईच्या मालाड मधील असल्याचा खोटा दावा करून शेयर केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे.

Result: False

Our Sources
Google Search
Post made by pratidintime on October 13, 2024
News published by ETv Bharat Rajasthan on October 12, 2024
News published by Rajasthan Tak on October 12, 2024

कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Most Popular