Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Coronavirus
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजी साठी सर्वप्रथम कुशल एच एम यांनी केले आहे.)
हिंदीतील एक व्हायरल संदेश, गृह मंत्रालयाच्या प्रधान सचिवांनी पाठविला आहे असे सांगून मेसेजिंग प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर शेअर केला जात आहे. सोशल मीडिया/व्हॉट्सअप ग्रुप्सवर कोरोनाव्हायरसशी संबंधित कोणतीही माहिती शेयर करण्यासंदर्भात चेतावणी देणारा हा संदेश आहे. जगभरातील अनेक देशांमध्ये कोविड -19 प्रकरणांमध्ये वाढ होत असताना, भारतात चिंता वाढत आहे, अशावेळी हा संदेश केवळ सरकारी एजन्सी कोरोनाव्हायरसबद्दल पोस्ट करू शकतात आणि या निर्देशाचे उल्लंघन करणाऱ्यास संपूर्ण (सोशल मीडिया) ग्रुप सदस्यांसह, आयटी कायद्यांतर्गत शिक्षा केली जाईल. असे हा संदेश सांगतोय.
Newschecker ने पूर्वीच 31 मार्च 2020 रोजी हा दावा खोडून काढला आहे. तुम्ही तो रिपोर्ट येथे वाचू शकता.
गृह मंत्रालयाने खरोखरच अशी अधिसूचना जारी केली आहे की नाही हे शोधण्यासाठी न्यूजचेकरने प्रथम कीवर्ड शोध घेतला. शोधाने कोणतेही संबंधित अहवाल दिले नाहीत. त्यानंतर आम्ही गृह मंत्रालयाने जारी केलेल्या सर्व प्रेस रिलीझ पाहिल्या, ज्यात देखील कोणतेही जुळणारे परिणाम दिसून आले नाहीत.
आमच्या लक्षात आले की व्हायरल घोषणेचे श्रेय मंत्रालयाचे प्रधान सचिव म्हणून रवी नायक यांच्याकडे आहे. मंत्रालयाच्या वेबसाइटवर अधिक चौकशी केली असता असे दिसून आले की प्रधान सचिव रवी नायक नसून साकेत कुमार आहेत.
आम्ही “रवी नायक” चा शोध घेतला आणि गृहमंत्रालयात काम करणाऱ्या नोकरशहांच्या यादीत त्या नावाचा कोणताही अधिकारी आढळला नाही.
त्यानंतर PIB फॅक्ट चेकने 30 मार्च 2020 रोजी प्रकाशित केलेले एक ट्विट आम्हाला मिळाले. देशभरातील कोरोनाव्हायरस संसर्गाच्या पहिल्या लाटेदरम्यान इंग्रजीमध्ये असलेल्या व्हायरल संदेशाचे खंडन येथे केलेले दिसले. ट्विटमध्ये म्हटले आहे की, गृह मंत्रालयाने असा कोणताही आदेश जारी केलेला नाही.
सोशल मीडियावर कोरोनाव्हायरसशी संबंधित काहीही पोस्ट करणे हा दंडनीय गुन्हा असल्याचे गृह मंत्रालयाने जाहीर केलेले नाही.
Source
PIB Fact Check’s tweet, March 30, 2020
Ministry of Home Affairs website
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा : checkthis@newschecker.in
Prasad S Prabhu
June 6, 2025
Kushel Madhusoodan
June 3, 2025
Prasad S Prabhu
May 28, 2025