Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंडा फडकत असल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर होत आहे. हिंदू देवता बालाजीला घेऊन जाणाऱ्या सर्व हिंदू मूर्तींसह संपूर्ण रथावर क्रॉसचे चित्र असेलला पांढरा झेंडा दाखवणारा एकोणीस सेकंदांचा व्हिडिओ ‘श्री बालाजी मिरवणुकीतील’ असल्याचा दावा ट्विटरवर शेअर करण्यात आला होता. न्यूजचेकरला आढळले की व्हिडिओ धार्मिक मिरवणुकीतील नाही तर आंध्र प्रदेशातील शेतकऱ्यांच्या महापदयात्रेचा आहे.
@missionkaali आणि @kaalidasi ट्विटर युजरनी शेअर केलेल्या व्हिडिओला जवळपास 45,000 व्ह्यूज मिळाले आहेत आणि एकूण 1,800 हून अधिक रिट्विट केले गेले आहेत.
‘हिंदू मंदिराच्या मिरवणुकांमध्ये आता ख्रिश्चन झेंडे आहेत’ अशा शिर्षकासह शेकडो लोकांनी रागात बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंडा असल्याचा व्हिडिओ रिट्विट केला.
बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंडा फडकत असल्याचा एक व्हिडिओ कितपत खरा आहे याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न असत @Akhilkolicharam या ट्विटर हँडलद्वार ट्विट आढळून आले ज्यात म्हटले आहे की,‘नमस्कार कृपया तुमचा खोटा प्रचार थांबवा. तुम्ही शेअर केलेल्या व्हिडिओचा हिंदू ख्रिश्चन लिंकशी काहीही संबंध नाही. त्या व्हिडीओमध्ये जे लोक होते ते शेतकरी आहेत ज्यांनी अमरावती नावाची आंध्रची नवी राजधानी बनवण्यासाठी आपली जमीन दिली आहे’.
वरील ट्विटचा आधार घेत आम्ही farmers rally Amravati,’असा कीवर्ड शोधला आणि 31 ऑक्टोबर 2021 रोजी प्रकाशित झालेल्या ‘Amaravati farmers to embark on 45-day Maha Padayatra’ या शीर्षकाखालील द हिंदूचा एक लेख सापडला.
रिपोर्टनुसार, अमरावतीच्या शेतकऱ्यांनी गुंटूर जिल्ह्यातील थुलूर ते तिरुमला आणि ‘अमरावतीचे विधान, कार्यकारी आणि न्यायिक राजधान्या (अनुक्रमे अमरावती, विशाखापट्टणम आणि कुरनूल) मध्ये विभाजन केल्याच्या निषेधार्थ अशी पदयात्रा काढली…’ या रॅलीचे शीर्षक होते-‘न्यायालय ते देवालय’ (कोर्टापासून मंदिरापर्यंत). ही पदयात्रा अमरावती परिरक्षण समिती आणि अमरावती शेतकरी JAC यांनी आयोजित केली होते.
अमरावती येथील शेतकऱ्यांनी राज्याची राजधानी बनवण्यासाठी त्यांच्या जमिनी मागील तेलगू देसम पक्षाच्या (टीडीपी) सरकारला दिल्या होत्या. परंतु सध्याच्या वायएसआर काँग्रेस पक्षाने टीडीपीचा प्रकल्प सोडला आणि जानेवारी 2020 मध्ये आंध्र प्रदेश विकेंद्रीकरण आणि सर्व क्षेत्रांचा समावेशक विकास कायदा पास केला.
आंध्र प्रदेश विधानसभेने 22 रोजी राज्यासाठी तीन राजधान्या प्रस्तावित करणारा कायदा रद्द केला आणि याला अमरावतीच्या शेतकर्यांचा मोठा विरोध झाला.
शेतकरी रॅली 1 नोव्हेंबर रोजी गुंटूर जिल्ह्यातील उच्च न्यायालयापासून सुरू झाली आणि 17 डिसेंबर रोजी तिरुमला तिरुपती देवस्थानम येथे समाप्त होईल.
न्यूजचेकरने शेतकऱ्यांच्या रॅलीचे नेतृत्व करणाऱ्या अमरावती परिरक्षण समितीशी (एपीएस) संपर्क साधला, एपीएसचे सदस्य वासी रेड्डी वामशी कृष्णा यांनी बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंड्याविषयी माहिती देताना ही मिरवणूक धार्मिक नसल्याचे स्पष्ट केले. “पदयात्रेचा समारोप त्रिरुपती येथे होणार होता आणि म्हणून आम्ही ठरवले की रथाचा वापर करून लक्ष वेधले जाईल. पण त्याचा धार्मिक यात्रेशी संबंध नाही. निषेधात सर्व धर्मांचा समावेश दर्शवण्यासाठी झेंडे लावण्यात आले होते. होते. मुस्लिम समाजाचेही प्रतिनिधित्व करण्यासाठी आमच्याकडे झेंडे होते,”
तसेच एपीएसचे निमंत्रक शिवा रेड्डी यांनी न्यूजचेकरला सांगितले की, “ रथावर ख्रिश्चन झेंडा पाहून कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर आम्ही दिलगीर आहोत, परंतु इतर संस्कृतींचा समावेश करण्यासाठी एकतेचे प्रतीक म्हणून हे केले गेले. ही धार्मिक मिरवणूक नाही, आम्ही अमरावतीसाठी पदयात्रा करत आहोत. झेंडे काढून टाकण्यात आले आहेत आणि आम्ही मुस्लिम आणि ख्रिश्चन समुदायांसाठी स्वतंत्र प्रतिनिधित्व करत आहोत.”
यावरुन स्पष्ट होते की, आंध्र प्रदेश विकेंद्रीकरण आणि सर्व क्षेत्रांचा सर्वसमावेशक विकास कायदा, 2020 च्या विरोधात शेतकऱ्यांची महापदयात्रेचा व्हिडिओ, बालाजीच्या रथावर ख्रिश्चन झेंडा म्हणून शेअर करण्यात आला आहे.
Contacts from Amaravati Parirakshana Samithi
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Vasudha Beri
June 8, 2024
Yash Kshirsagar
April 6, 2021
Yash Kshirsagar
October 27, 2021