Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
अमरावतीतील परतवाडात दोन दहशतवादी पकडले असल्याच्या दाव्याने एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. यात पोलिसांनी एसटी बसमध्ये बाॅम्ब ठेवणा-या दोन लोकांना मोठ्या सिपातफीने पकडल्याचे दिसत आहे. दावा करण्यात आला आहे की, अमरावती- परतवाडा या बसने हे दोन दहशतवादी बाॅम्ब घेऊन निघाले होते.
परतवाडामध्ये खरंच दोन दहशतवादी बसमध्ये बाॅम्ब घेऊन जात असताना पकडले आहेत का याचा शोध घेण्यााचा आम्ही प्रयत्न केला. यासाठी काही किवर्डचा वापर केला मात्र मुख्य प्रवाहातील माधयमांत ही बातमी आढळून आली नाही. यानंतर आम्ही युट्यूबवर शोध घेतला असता विदर्भ प्रभात या चॅनलवर व्हायरल व्हिडिओ आढळून आला. या व्हिडिओच्या शोवटी परतवाडा पोलिस स्टेशनचे निरीक्षक मानकर यांनी स्पष्टीकरण दिले आहे की, सणासुदीच्या दिवसांत गर्दीच्या वेळी दहशतवादी कुठेही बाॅम्ब ठेवू शकतात याचे माॅक ड्रिल आज पोलिसांकडून करण्यात आले होते. लोकांनी उगीच घाबरुन जाऊ नये पण योग्य ती खबरदारी घ्यावी.
याशिवाय गावरान 90 या फेसबुक पेजवर देखील हे पोलिसांचे माॅकड्रिल असल्याची माहिती देण्यात आली आहे.
याशिवाय परतवाडा पोलिसांनी प्रेस रिलीज देखील जारी केली आहे.
आमच्या पडताळणीत हे स्पष्ट झाले आहे की, परतवाडा पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना बस मध्ये बाॅम्ब ठेवताना पकडलेले नाही तर पोलिसांनी सतर्कता म्हणून माॅक ड्रिल केले होते. लोक त्याचा व्हिडिओ खरा समजून शेअर करत आहेत.
अमरावती पोलिस प्रेस नोट
विदर्भ प्रभात
कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.
Prasad S Prabhu
May 19, 2025
Prasad S Prabhu
May 17, 2025
Prasad S Prabhu
May 15, 2025