Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkमोदी पदवीधर नाहीत असे फडणवीस म्हणाले? पाहुयात सत्य काय आहे

मोदी पदवीधर नाहीत असे फडणवीस म्हणाले? पाहुयात सत्य काय आहे

“पंतप्रधान मोदी हे स्वतः पदवीधर नसल्याने त्यांचा फोटो प्रचारात न वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, ज्याचा फटका आम्हाला या निवडणुकीत बसला” असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. असा दावा सध्या सोशल मीडियावर केला जात आहे. अनेक युजर्स हा दावा करून देवेंद्र फडणवीस यांनी असे विधान केल्याचे सांगत आहेत.

महाराष्ट्रात नुकतीच विधानपरिषदेची शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाची निवडणूक झाली. यामध्ये महाविकास आघाडीला यश तर भाजपाला एकच जागेवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीनंतर समान दावा करणाऱ्या अनेक पोस्ट करण्यात आल्याचे आम्हाला पाहावयास मिळाले.

“मोदींचा फोटो न वापरल्यामुळे पदवीधर निवडणुकीत पराभव” अशा कॅप्शन खालील ही पोस्ट ट्विटर च्या बरोबरीनेच व्हाट्सअप वरही शेयर केली जात असल्याचे आमच्या निदर्शनास आले.

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Screengrab of whatsapp tipline

Fact Check/Verification

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांनी असे विधान केल्याचा दावा एका पोस्टर कॉमेंट च्या माध्यमातून शेयर करण्यात येत होता. आम्ही ते पोस्टर डाउनलोड करून त्यावर गुगल रिव्हर्स इमेज सर्च करून पाहिला. पोस्टर अलीकडीलच असल्याने त्याचा मूळ सोर्स सापडू शकला नाही. मात्र यासंदर्भात समान दावे करणारे अनेक ट्विट आमच्या पाहणीत आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खरेच असे विधान केले आहे का? हे पाहण्यासाठी आम्ही त्यांचे अधिकृत ट्विटर हॅन्डल शोधले. मात्र तेथे आम्हाला तशी कोणतीच माहिती मिळाली नाही.

त्यानंतर आम्ही यासंदर्भात काही मीडिया रिपोर्ट्स मिळतात का? हे पाहण्याचा प्रयत्न केला. गुगल वर सर्च केले असता असे कोणतेही विधान देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे आढळले नाही. पंतप्रधानांबद्दल इतके मोठे विधान केल्याबद्दल मीडिया रिपोर्ट आले असते मात्र ते उपलब्ध नसल्याचे पाहायला मिळाले.

"पंतप्रधान मोदी हे स्वतः पदवीधर नसल्याने त्यांचा फोटो प्रचारात न वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, ज्याचा फटका आम्हाला या निवडणुकीत बसला" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Screengrab of Google Search

आम्हाला महाराष्ट्र टाइम्स ने प्रसिद्ध केलेले एक वृत्त सापडले, ज्यामध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालाची माहिती पाहायला मिळाली. मात्र देवेंद्र फडणवीस किंवा भाजप नेत्यांनी निकालावर कोणतीही प्रतिक्रिया दिल्याचे त्यात आढळले नाही.

यानंतर आम्ही भाजपने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरला आहे की नाही? हे शोधले असता, प्रचारात मोदींचा फोटो वापरला गेला असल्याचे आमच्या लक्षात आले.

"पंतप्रधान मोदी हे स्वतः पदवीधर नसल्याने त्यांचा फोटो प्रचारात न वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, ज्याचा फटका आम्हाला या निवडणुकीत बसला" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Courtesy: MumbaiTak.In

दाव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीधर नसण्याचा उल्लेख आला आहे. यामुळे आम्ही त्याबद्दल शोध घेतला असता आम्हाला ते राज्यशास्त्र या विषयातून पदवीधर असल्याची माहिती मिळाली. ही माहिती पडताळण्यासाठी मोदींनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत केंद्रीय निवडणूक आयोगाला दिलेल्या प्रतिज्ञापत्रात आपल्या शिक्षणाचा कोणता तपशील दिला आहे? याचा आम्ही शोध घेतला. आम्हाला त्यांनी १९६७ मध्ये दहावी, १९७८ मध्ये दिल्ली विद्यापीठातून बी. ए. आणि १९८३ मध्ये गुजरात विद्यापीठातून एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतल्याची माहिती मिळाली.

"पंतप्रधान मोदी हे स्वतः पदवीधर नसल्याने त्यांचा फोटो प्रचारात न वापरण्याचा निर्णय आम्ही घेतला होता, ज्याचा फटका आम्हाला या निवडणुकीत बसला" असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Screengrab of Affidavit submitted by Narendra Modi in 2019

दरम्यान आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या अधिकृत टीम ने तसेच महाराष्ट्र राज्य भाजप टीमने व्हायरल दाव्याची पडताळणी करून ” उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संदर्भात केला जात असलेला हा दावा खोटा आहे. कारण ते असे कोठेही बोललेले नाहीत.” अशी माहिती न्यूजचेकर ला दिली.

Conclusion

अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेले विधान असे सांगत व्हायरल होत असलेला दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे निदर्शनास आले आहे.

Result: False

Our Sources

Official twitter handle of Devendra Fadanwis

News published by Maharasthra times on February 3, 2023

Affidavit submitted by PM Narendra Modi in 2019

News published by Mumbai Tak on January 21, 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in

Most Popular