Saturday, November 2, 2024
Saturday, November 2, 2024

HomeFact CheckFact Check: मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले?...

Fact Check: मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
भाजपचा जास्त पुळका करू नका. भाषणात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही.
Fact
भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी असे विधान केलेले नाही. त्यांच्या ओबीसी समाजाबद्दलच्या भाषणाचा काही भाग चुकीच्या संदर्भाने व्हायरल करण्यात आला आहे.

मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. असे सांगणारा एक दावा सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणात व्हायरल आहे.

Fact Check: मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे
Courtesy: Instagram@incspeaks

दाव्यामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्या भाषणाच्या व्हिडिओचा एक भाग आहे. याद्वारे कॅप्शनच्या माध्यमातून लिहिले जात आहे की, “मराठा समाजाची गरज नाही, भाजपला मराठा मतदारांची गरज नसावी, अरे मराठा भाजप कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी, लय पुळका करू नका भाजपाचा.”

न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Fact Check: मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे देवेंद्र फडणवीस म्हणाले? जाणून घ्या सत्य काय आहे

Fact check/ Verification

Newschecker ने व्हायरल दाव्याची पडताळणी करण्यासाठी व्हायरल व्हिडिओच्या काही की फ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्हाला आवश्यक परिणाम सापडले नाहीत.

दरम्यान तपासासाठी आम्ही व्हायरल व्हिडिओमधील देवेंद्र फडणवीस यांचे भाषण बारकाईने ऐकले. यामध्ये ” भारतीय जनता पार्टी ही नैसर्गिकरित्या ओबीसी भटक्या विमुक्तांची पार्टी आहे. भारतीय जनता पार्टीचा जो डीएनए आहे हा ओबीसी आणि भटक्या विमुक्तांचा आहे. भारतीय जनता पार्टीची लीडरशिप जर आपण बघितली तर ती ओबीसी आणि भटक्या विमुक्तांची आहे. आणि आज भारतीय जनता पार्टी ज्यांच्या भरवश्यावर देशामध्ये निवडून येते ते मतदार देखील आज मोठ्याप्रमाणात ओबीसी मतदार आहेत.” असे त्या यामध्ये बोलताना आम्हाला आढळले. व्हिडिओच्या मूळ भागात ‘पोहरादेवी मधून फडणवीस LIVE’ असा उल्लेख आम्हाला आढळला.

यावरून सुगावा घेऊन आम्ही संबंधित किवर्डसच्या माध्यमातून सर्वप्रथम Youtube वर सर्च केला असता, आम्हाला संबंधित भाषणाचा संपूर्ण व्हिडीओ पाहायला मिळाला.

TV 9 Marathi ने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवर १३ ऑक्टोबर २०२३ रोजी या व्हिडीओचे LIVE प्रक्षेपण केल्याचे आम्हाला पाहायला मिळाले. “Devendra Fadnavis LIVE | भाजपच्या जागर यात्रेचा समारोप कार्यक्रम, देवेंद्र फडणवीस LIVE | BJP” अशी या व्हिडिओची कॅप्शन आहे. यामध्ये व्हायरल व्हिडिओमधील भाग ३० मिनिटे ४० सेकंदानंतर ऐकायला मिळतो. दरम्यान संपूर्ण व्हिडिओमध्ये कुठेही देवेंद्र फडणवीस यांनी “मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही” असे विधान केल्याचे आम्हाला आढळले नाही. पोहरादेवी येथे भाजपच्या जागर यात्रेचा समारोप १३ ऑक्टोबर २०२३ रोजी झाला आणि त्यामध्ये फडणवीस यांनी बोलताना भाजप आणि ओबीसी समाजाचे नाते याबद्दल विधाने केल्याचे आमच्या निदर्शनास आले.

आणखी तपास करताना आम्हाला “Devendra Fadnavis Full Speech : मंडल आयोगाचा काँग्रेसनेच नव्हे, उद्धव ठाकरेंच्या पक्षाने विरोध केला” या शीर्षकाखालील एक व्हिडीओ सापडला.

ABP MAJHA ने आपल्या अधिकृत युट्युब चॅनेलवरून हा व्हिडीओ १३ ऑक्टोबर २०२३ रोजी प्रसारित केला आहे. यामध्येही १७ मिनिटे ४२ सेकंदानंतर व्हायरल व्हिडिओत असलेली विधाने पाहायला मिळतात. येथेही फडणवीस यांनी मराठा समाजाविरोधात कोणती विधाने केल्याचे दिसून आलेले नाही.

BJP Maharashtra या महाराष्ट्र भाजपच्या अधिकृत फेसबुक पेजनेही १३ ऑक्टोबर २०२३ रोजी या कार्यक्रमाचे LIVE प्रक्षेपण केले आहे. “LIVE | ओबीसी जागर यात्रा समारोप जंगी जाहीर सभा पोहरादेवी, वाशिम” असे त्याचे वर्णन आहे. यामध्येही देवेंद्र फडणवीस यांचे संपूर्ण भाषण पाहता येते.

दरम्यान आम्ही Google वर किवर्ड सर्चच्या माध्यमातून फडणवीस यांनी “मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही” असे विधान केले आहे का? याची माहिती शोधून पाहिली, मात्र आम्हाला त्याबद्दल कोणतेही मीडिया रिपोर्ट्स उपलब्ध झाले नाहीत. फडणवीस यांनी असे विधान केले असते तर माध्यमांनी त्याबद्दल बातम्या केल्या असत्या मात्र आम्हाला तसे आढळले नाही.

दरम्यान भाजपची ओबीसी जागर यात्रा २ ऑक्टोबर २०२३ पासून १३ ऑक्टोबर २०२३ पर्यंत झाली. याबद्दलच्या बातम्या इथे आणि इथे वाचता येतील.

Conclusion

अशाप्रकारे आमच्या तपासात व्हायरल दावा खोटा आणि चुकीच्या संदर्भाने करण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले. भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज आणि मतदारांची गरज नाही असे विधान केलेले नाही. त्यांच्या ओबीसी समाजाबद्दलच्या भाषणाचा काही भाग चुकीच्या संदर्भाने व्हायरल करण्यात आला आहे.

Result: Missing Context

Our Sources
Self Analysis
Google Search Results
Video published by TV 9 Marathi on October 13, 2023
Video published by ABP Majha on October 13, 2023
Video published by BJP Maharashtra on October 13, 2023


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular