Authors
Claim
अमेरिकेच्या दौऱ्यानंतर राहुल गांधींवर टीका करणाऱ्या सॅन फ्रान्सिस्कोस्थित वृत्तपत्रातील क्लिपिंगचा स्क्रीनशॉट.
Fact
सॅन फ्रान्सिस्को-आधारित वृत्तपत्राने असा कोणताही रिपोर्ट दिलेला नाही, व्हायरल स्क्रीनशॉट हा हिंदी लेखाचा डिजिटल अनुवाद असल्याचे आढळले.
राहुल गांधींवर टीका करणाऱ्या डिजिटली भाषांतरित हिंदी रिपोर्टची इमेज असे सांगत अनेक सोशल मीडिया युजर्स विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या फोटोसह वृत्तपत्राच्या क्लिपिंगचा स्क्रीनशॉट प्रसारित करत आहेत, ज्यामध्ये कथित मथळा आहे, “अमेरिकन विचारत आहेत की राहुल भारताचा आहे की पाकिस्तानचा?”
इमेज शेयर करताना, युजर्सनी दावा केला की हा रिपोर्ट सॅन फ्रान्सिस्को-आधारित वृत्तपत्रात प्रकाशित झाला होता आणि जोडले की, “त्यांनी हे लिहिले कारण तो ज्या प्रकारे भारताबद्दल बोलत होता, असे वाटले की भारताचा शत्रूच असे बोलू शकतो. किती लाजिरवाणी गोष्ट आहे.” गांधींच्या नुकत्याच झालेल्या यूएस दौऱ्यावर झालेल्या राजकीय गदारोळाच्या अनुषंगाने ही इमेज व्हायरल झाली आहे.
पोस्टची संग्रहित आवृत्ती येथे पाहिली जाऊ शकते.
राहुल गांधींच्या अमेरिका दौऱ्याची छाननी
वृत्तानुसार, राहुल गांधींची यूएस काँग्रेसच्या महिला सदस्य इल्हान उमर यांच्याशी झालेल्या भेटीमुळे, आधीच अनेक वादांचे जनक असलेल्या या व्यक्तिमत्त्वाबद्दल ठिणगीच पडली आहे. दोन राष्ट्रांमधील संबंध बळकट करण्याच्या उद्देशाने आयोजित गांधींच्या भेटीत भूतकाळातील वाद आणि भारतातील शीख हक्क आणि आरक्षण धोरणांवरील त्यांच्या प्रक्षोभक टिप्पण्यांचे सावट निर्माण झाले आहे.
Fact Check/ Verification
न्यूजचेकरने कथित रिपोर्टमधील व्याकरणाच्या त्रुटींसह फॉन्ट आणि मजकूर आकारांमधील विसंगती लक्षात घेतल्या, ज्यावरून असे सूचित होते की ते डिजिटली बदलले गेले असावे किंवा दुसऱ्या भाषेतील रिपोर्टची भाषांतरित आवृत्ती असावी. आम्ही एक संबंधित कीवर्ड शोध देखील चालवला, ज्याने परदेशी प्रकाशनाकडून अशी कोणतीही बातमी दिली असल्याचे आढळले नाही.
त्यानंतर न्यूजचेकरने “अमेरिकी पूछ रहे हैं कि भारत से या पाकिस्तान से?,” या मथळ्याच्या हिंदी भाषांतरासाठी कीवर्ड शोधला, ज्यामुळे आम्हाला हे दिनांक 5 जून, 2023 रोजी केले गेले ट्विट सापडले. हिंदी वृत्तपत्र क्लिपिंग सोबत केले गेलेले आणखी एक समान ट्विट येथे पाहिले जाऊ शकते.
त्यानंतर आम्ही Google Lens मधील भाषांतर टूलवर हिंदी वृत्तपत्राची क्लिपिंग घातली, जिथे व्हायरल स्क्रीनशॉटमध्ये दिसणारी हेडलाइन सारखीच असल्याचे आढळले.
अनुवाद झाल्यावर बाकीचा लेख पुढीलप्रमाणे दिसतो:
Americans are asking, is Rahul from India or Pakistan?
San Francisco, May 31 (Agencies).
Congress leader Rahul Gandhi is on a six-day visit to America. As soon as he reached foreign soil, Rahul’s crazy nonsense started again. Rahul’s anti-India statements are being heard with great pleasure in America and sarcasm is being made against such a representative of India. Americans are sarcastically asking whether Rahul Gandhi has come from India or Pakistan? While talking to Indians in San Francisco, Rahul Gandhi said that Muslims are being attacked in India. Rahul then also said that whatever is happening to the Muslims in India today, had already happened to the Dalits in 1980. It is noteworthy that in 1980, Congress was in power in the country. Speaking unbridled, Rahul said that Muslim children are being sent to jail in India. Rahul Gandhi appeared so full of hatred towards Prime Minister Narendra that he even said that Modi can tell even God what to do…
अनुवादित मजकूर व्हायरल वृत्तपत्राच्या रिपोर्टशी जुळतो, हे सिद्ध करतो की फॉन्ट विसंगती नसल्यामुळे तो अनुवादित केलेला हिंदी लेख होता. आम्ही हिंदी लेख दुसऱ्या तत्सम टूलवर चालवला, ज्याने पुढे पुष्टी केली की व्हायरल स्क्रीनशॉट इंग्रजीमध्ये अनुवादित केलेल्या हिंदी लेखाचा होता.
तसेच, व्हायरल लेखाची तारीख 31 मे होती, जी बहुधा राहुल गांधींच्या गेल्या वर्षीच्या सॅन फ्रान्सिस्को दौऱ्याचा संदर्भ देत होती, अनेक प्रसारमाध्यमांनी त्यासंदर्भात दिलेले रिपोर्ट येथे आणि येथे पाहिले जाऊ शकतात. त्यात असे म्हटले आहे की गांधी तीन शहरांच्या दौऱ्यावर होते, युनायटेड स्टेट्स, सॅन फ्रान्सिस्को, वॉशिंग्टन डीसी आणि न्यूयॉर्कमध्ये प्रत्येकी दोन दिवस त्यांनी भेट दिली.
आम्ही हिंदी लेखाचा स्त्रोत शोधू शकलो नसलो तरी, आम्ही पुष्टी करू शकतो की हा रिपोर्ट सॅन फ्रान्सिस्कोस्थित वृत्तपत्राने प्रकाशित केलेला नाही.
Conclusion
एका हिंदी बातमीचा इंग्रजीत डिजिटली ट्रान्सलेट केलेला स्क्रिनशॉट राहुल गांधींवर टीका करणारा सॅन फ्रान्सिस्को-आधारित वृत्तपत्राने लिहिलेला एक लेख असे सांगत खोटा दावा करून शेयर करण्यात आल्याचे आमच्या तपासात स्पष्ट झाले.
Result: False
Source
Image analysis
Google Lens
Tweet, June 5, 2024
(हे आर्टिकल न्यूजचेकर इंग्रजीसाठी सर्वप्रथम कुशल एच. एम. यांनी केले असून, ते इथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा