Tuesday, December 24, 2024
Tuesday, December 24, 2024

HomeFact CheckHealth and Wellnessडॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर संबंधित कुठलाही मेसेज लिहिलेला नाही, खोटा दावा...

डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सर संबंधित कुठलाही मेसेज लिहिलेला नाही, खोटा दावा व्हायरल

सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. त्यात असा दावा केलाय की, डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सरवर अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय सांगितला आहे. त्यात पुढे असं सांगितलंय की, लिंबूमुळे कॅन्सर बरा होतो.

व्हायरल झालेला मेसेज : 

डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सरवर सांगितलेला अतिशय स्वस्त व घरगुती उपाय, प्रत्येकाने अवश्य वाचावा असा लेख!!

🍋🍋🍋 लिंबाचे 🍋🍋🍋🙏

🌹अतिथंड केलेल्या लिंबाचे आश्चर्यकारक परिणाम🌹

स्वच्छ धुतलेले लिंबु फ्रिजच्या फ्रिजरमध्ये ठेवा. ते लिंबु पूर्ण पणे थंड, बर्फासारखे कडक झाल्यावर साधारणत: 8-10 तासानी १ किसणी घेउन ते सर्व लिंबु सालासकट किसुन घ्या. नंतर जे काही खाल त्यावर ते किसलेले लिंबु टाकुन खा.

भाज्यां,सॅलड,आईस्क्रीम,सुप, डाळी,नुडल्स,स्पेगेटी,पास्ता, पिझ्झा,साॅस,भात या व अश्या अनेक पदार्थांवर टाकून खाता येईन.

🌹सर्व अन्नाला एक अनपेक्षीत अशी छान चव येईल.सगळ्यात महत्वाचे,आपल्याला फक्त लिंबाच्या रसातील व्हिटॅमिन सी चे गुणधर्म फक्त माहित आहेत.‌ त्यापेक्षा अधिक गुणधर्म माहिती नाहीत. सालासह संपुर्ण गोठलेले लिंबु कोणताही भाग वाया न जाता वापरल्यास १ वेगळी चव तर मिळतेच परंतु त्याचे अजुन काय फायदे आहेत??

🌹लिंबाच्या सालीत लिंबाच्या रसापेक्षा 5-10 पट जास्त व्हिटॅमिन सी असते आणि हाच भाग आपण वाया घालवतो..

🌹लिंबाची साल आरोग्यवर्धक आहे कारण त्यामुळे शरीरातील सर्व विषद्रव्ये शरीराबाहेर काढून टाकायला मदत होते.

लिंबाच्या सालीचा १ आश्चर्य कारक फायदा म्हणजे त्याच्यात असलेली १ चमत्कारिक अशी क्षमता की ज्यामुळे शरीरातील सर्व कॅन्सरच्या पेशींचा नाश होतो.केमोथेरपी पेक्षा ही लिंबाची साल 10,000 पट जास्त प्रभावी आहे.

🌹मग आपल्याला हे सर्व का माहिती नाही??

कारण आज जगात अश्या प्रयोगशाळा आहेत की ज्या त्याचे कृत्रिम पद्धतीने निर्मीती करण्यात गुंतल्या आहेत कारण त्यापासुन त्यांना भरपुर नफा मिळतो.

आता तुमच्या गरजू मित्र/मैत्रिणींना सांगु शकता की कॅन्सर सारखा असाध्य आजार दुर ठेवण्यासाठी/झाल्यास बरा करण्यासाठी लिंबाचा रस व साल किती फायदेशीर आहे. त्याची चव पण खुप छान असते आणि केमोथेरपी प्रमाणे त्याचे भयानक साईड इफेक्ट पण नाही आहेत.

विचार करा,हा अतिशय साधा, सोपा परंतु अत्यंत प्रभावी असा उपाय माहिती नसल्याने आज पर्यंत किती लोकाना आपले आयुष्य गमवावे लागले असेल आणि इथुन पुढे आपण किती लोकांचे प्राण वाचवू शकतो??

लिंबाच्या वनस्पतीत सर्व प्रकारचे कॅन्सर बरे करण्याची १ चमत्कारीक अशी क्षमता आहे. याचा वापर बॅक्टेरीअल इन्फेक्शन आणि फंगस वर सुद्धा होउ शकतो.शरीराअंतर्गत परोपजीवी आणि विषाणु वरही प्रभावी आहे.

लिंबाचा रस व विशेषत: साल रक्तदाब व मानसिक दबाव नियमित करते.मानसिक ताण व मज्जासंस्थेचे आजार नियंत्रीत करते. या माहितीचा स्त्रोत अतिशय थक्क करणारा आहे :

जगातल्या सगळ्यात मोठ्या औषध निर्मिती कंपनी पैकी १ असलेल्या कंपनीने हे प्रसिद्ध केले आहे. ते म्हणतात की 1970 पासुन 20 पेक्षा जास्त प्रयोगशाळांमध्ये संशोधन केल्यानंतर असे निदर्शनात आले आहे की,लिंबाची साल 12 पेक्षा जास्त कॅन्सरच्या घातक पेशी नष्ट करतात.

लिंबाच्या झाडाचे औषधी गुणधर्म कॅन्सरवरील ड्रामायसीन या केमोथेरपीसाठी सामान्यपणे वापरल्या जाणा-या औषधापेक्षा 10,000 पट जास्त प्रभावी ठरले आहे.लिंबाची साल कॅन्सरच्या पेशींची वाढ मंदावते.

आणि अधिक आश्चर्याची गोष्ट म्हणजे या लिंबाच्या औषधामुळेच फक्त कॅन्सरच्याच पेशींचा नाश होतो, त्याचा निरोगी पेशींवर कोणताही विपरीत परिणाम होत नाही.

🙏म्हणुन चांगल्या पिकलेल्या लिंबाना स्वच्छ धुवा, त्यांना गोठवा आणि किसणीवर किसून रोजच्या आहारात वापरा.

तुमचे संपुर्ण शरीर त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देईल..

🙏डॉ. विकास बाबा आमटे🙏

आनंदवन

🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋🍋

कृपया हा संदेश जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचऊया. करुन पहायला काहीच हरकत नाही.

फेसबुकवर हा मेसेज खूप व्हायरल झाला आहे. त्याचे स्क्रिनशॉट खाली जोडत आहे.

मागेही आंबा खालल्यावर कोल्ड ड्रिंक प्यायलं तर माणसाचा मृत्यू होऊ शकतो, असा मेसेज व्हायरल झाला होता. याची तथ्य पडताळणी आम्ही केली होती. तुम्ही ते इथे वाचू शकता.

त्यातच आता डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सरवर अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय सांगितला आहे. त्यात लिंबू वापरण्यास सांगितले आहे. असा दावा या व्हायरल मेसेजमध्ये केला आहे.

Fact Check / Verification

या दाव्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही या संदर्भात गुगलवर माहिती शोधली. पण लिंबाने कॅन्सर बरा होतो, असा कुठलाही अहवाल आम्हांला मिळाला नाही. 

त्याचबरोबर या संदर्भात कोणतेही संशोधन झालेले नाही, असे आमच्या पडताळणीत आढळले. त्यानंतर आम्ही गुगलवर ‘लेमन अँड कॅन्सर’ असं टाकून सर्च केले.

गुगल सर्चचा स्क्रिनशॉट

त्यावेळी आम्हांला नॅशनल सेंटर फॉर हेल्थ रिसर्च यांनी ‘डू लेमन्स प्रिव्हेंट कॅन्सर ?’ असा एक लेख लिहिलेला आढळला. 

लेखाचा स्क्रिनशॉट

यात त्यांनी लिहिलंय की, इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स ही राष्ट्रीय मान्यताप्राप्त असलेली खाजगी आरोग्य शाळा आहे. त्यांच्या संकेतस्थळावर देखील ‘लिंबूमध्ये कर्करोगाशी लढण्याचे गुणधर्म आहे’ असा कोणताही लेख किंवा त्याचा साधा उल्लेखही आढळला नाही.

पुढे त्यांनी असंही लिहिलंय की, या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक किंवा वैद्यकीय स्रोत उपलब्ध नाही. लिंबू हे कडू असते कारण त्याच्या सालीमध्ये लिमोनोइड्स (Limonoids) हे रसायन असते. 

एका संशोधनात असं आढळून आलंय की, लिमोनोइड्स कर्करोगाच्या पेशी कमी करण्यास आणि ऍपोप्टोसिसमधील (Apoptosis) पेशी नष्ट करण्यास सक्षम असतात.

तसेच न्यूजचेकरने आनंदवनाशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी सांगितले,”हा मेसेज खूप वर्षांपासून व्हायरल होत आहे. तो डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लिहिलेला नाही. त्यात कोणीतरी त्यांचं फक्त नाव टाकलंय. ही चुकीची माहिती आहे.”

हे देखील वाचू शकता : सुप्रीम कोर्टाने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची जप्त केलेली मालमत्ता परत करण्याचे खरंच आदेश दिले होते ? चुकीची माहिती व्हायरल

Conclusion 

डॉक्टर विकास आमटे यांनी कॅन्सरवर अतिशय स्वस्त आणि घरगुती उपाय सांगितला आहे, असा दावा केला जाणारा मेसेज खोटा आहे. 

त्याचबरोबर लिंबाने कॅन्सर बरा होतो, या गोष्टीला कुठलाही वैज्ञानिक आधार नाही. 

Result : Fabricated News / False

Our Sources


नॅशनल सेंटर फॉर हेल्थ रिसर्चचा लेख

फोनवरून आनंदवनाशी साधलेला संवाद 

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा.

Most Popular