Authors
Claim
फेसबुक आपल्या नवीन नियमांनुसार युजर्सचे फोटो आणि इतर माहिती वापरू शकते.
Fact
हा दावा चुकीचा आहे. मेटा (फेसबुक) ने न्यूजचेकरला पुष्टी केली आहे की व्हायरल दावा खोटा आहे.
फेसबुक आणि मेसेजिंग अप्सवर दावा केला जात आहे की फेसबुक आपल्या नवीन नियमानुसार युजर्सचे फोटो आणि इतर माहिती वापरू शकते.
युजर्स अनेकदा त्यांची वैयक्तिक माहिती विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेयर करण्यास घाबरतात. जगातील सर्वात मोठे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Facebook (Meta) वर लाखो लोक स्वतःचे, त्यांचे कुटुंबीय, मित्र आणि इतर ओळखीचे फोटो, व्हिडिओ आणि इतर माहिती शेअर करत असतात. अशा परिस्थितीत, फेसबुक युजर्सना प्लॅटफॉर्मद्वारे त्यांच्या वैयक्तिक डेटाच्या वापराबद्दल अनेक शंका आहेत. या क्रमाने, एक दावा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की फेसबुक नवीन नियमांनुसार युजर्सची छायाचित्रे आणि इतर माहिती वापरत आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact Check/Verification
Facebook नवीन नियमांतर्गत युजर्सचे फोटो आणि इतर माहिती शेअर करत असल्याच्या दाव्याची चौकशी करण्यासाठी, आम्ही युजर्सनी शेअर केलेल्या पोस्ट आणि इतर माहितीच्या संदर्भात प्लॅटफॉर्मचे धोरण जाणून घेण्यासाठी फेसबुकच्या अधिकृत वेबसाइटवर शोध घेतला. फेसबुकच्या वेबसाइटवर, प्लॅटफॉर्मवर युजर्सनी शेअर केलेली माहिती, त्याचे मालकी हक्क, वापर आणि गोपनीयता याबद्दल तपशीलवार माहिती दिली आहे. प्लॅटफॉर्मच्या गोपनीयता धोरणानुसार, Facebook युजर्सच्या पोस्ट, मित्र सूची, अनुयायी आणि इतर नातेसंबंध, अॅप, ब्राउझर आणि डिव्हाइस माहिती आणि विक्रेते, भागीदार आणि थर्ड पार्टी कंपन्यांद्वारे शेयर केलेली माहिती गोळा करू शकते. प्लॅटफॉर्म ही माहिती सुरक्षा, उद्योगाशी संबंधित सेवा, आकडेवारी, संवाद आणि सामाजिक कार्यासाठी संशोधन इत्यादी कारणांसाठी वापरते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की काही माहिती आहे जी आम्हाला फेसबुकवर शेअर करायची आहे. तथापि, युजर्स त्यांची सेटिंग्ज बदलून फेसबुकसह कोणती माहिती शेयर करतात यावर नियंत्रण ठेवू शकतात. याशिवाय, प्लॅटफॉर्म ही सुविधा देखील प्रदान करते जिथे युजर्स त्यांच्या गोपनीयतेची सुरक्षितता जाणून घेऊ शकतात आणि ती अधिक मजबूत करू शकतात.
फेसबुकवर व्हायरल दाव्याशी संबंधित काही कीवर्ड शोधल्यानंतर, आम्हाला आढळले की व्हायरल संदेश वेगवेगळ्या प्रकारे 2016 पासून शेअर केला जात आहे. हा दावा यापूर्वीच इतर अनेक भाषांमध्ये शेअर केला गेला आहे.
व्हायरल दाव्याबद्दल अधिक माहिती मिळविण्यासाठी आम्ही माध्यम संस्थांद्वारे काही बातम्या प्रकाशित करण्यात आल्या आहेत का? याचा शोध घेतला. परंतु आम्हाला अशी कोणतीही माहिती सापडली नाही, जी व्हायरल दाव्याची पुष्टी करू शकेल.
व्हायरल दाव्याची पुष्टी करण्यासाठी आम्ही मेटाशी संपर्क साधला. जेथे प्लॅटफॉर्मने न्यूजचेकरला पुष्टी केली की व्हायरल दावा खोटा आहे.
Conclusion
अशा प्रकारे, आमच्या तपासणीत, हे स्पष्ट झाले आहे की फेसबुकद्वारे त्यांच्या नवीन नियमानुसार युजर्सचे फोटो आणि इतर माहिती वापरली जात असल्याच्या नावाखाली शेअर केलेला हा दावा चुकीचा आहे. प्लॅटफॉर्मने न्यूजचेकरला पुष्टी केली आहे की व्हायरल दावा खोटा आहे.
Result: False
Our Sources
Meta policies
Meta’s confirmation with Newschecker
Newschecker analysis
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम सौरभ पांडे यांनी केले आहे.)
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in