Authors
Claim
मोदी सरकारतर्फे सर्व भारतीय युजर्सना 28 दिवसांचे मोफत रिचार्ज दिले जात आहे.
न्यूजचेकरला आमच्या WhatsApp टीपलाइन (+91 9999499044) वर अनेक युजर्सद्वारे समान दावा प्राप्त झाला असून त्याची सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
Fact
आमच्या तपासणीत, आम्हाला हा दावा पहिल्या दृष्टीक्षेपात दिशाभूल करणारा असल्याचे आढळले, कारण जर अशी घोषणा पंतप्रधानांनी केली असती तर मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये ती मोठी बातमी ठरली असती. परंतु या संदर्भात आम्हाला कोणतेही मीडिया रिपोर्ट मिळालेले नाही. पुढे, जेव्हा आम्ही दाव्यासोबत असलेल्या लिंकवर क्लिक केले, तेव्हा एक नोंदणी फॉर्म पॉप अप झाला ज्यामध्ये आम्हाला OTP आणि पासवर्डसह मोबाइल नंबर यासारख्या गोष्टी भरण्यास सांगितले.
काही कीवर्डच्या मदतीने Google वर शोध घेत असताना, आम्हाला PIB Fact Check द्वारे केलेले एक ट्विट आढळले, जिथे हा रिचार्ज दावा बनावट असल्याचे सांगितले आहे. भारत सरकारकडून मोफत रिचार्जची कोणतीही योजना चालवली जात नसल्याचे सांगण्यात आले आहे. हा फसवणुकीचा प्रयत्न आहे.
अशाप्रकारे, आमच्या तपासणीत हे स्पष्ट झाले आहे की फ्री रिचार्जच्या नावाने व्हायरल झालेला हा दावा पूर्णपणे खोटा आहे. याआधीही, आमच्या टीमने अशा अनेक खोट्या दाव्यांचे तथ्य तपासले आहे, जे येथे वाचता येईल.
Result: False
Our Sources
PIB Fact Check
Self Analysis
कोणत्याही संशयास्पद बातम्या तपासण्यासाठी, दुरुस्त्या किंवा इतर सूचनांसाठी आम्हाला व्हाट्सअप करा: 9999499044 किंवा ई-मेल करा: checkthis@newschecker.in