Sunday, December 22, 2024
Sunday, December 22, 2024

HomeFact Checkफोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत, जाणून घ्या सत्य

फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजानन महाराज नाहीत, जाणून घ्या सत्य

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत गजाजन महाराज असल्याचा दावा सोशल मीडियात व्हायरल होत आहे. फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासमवेत गजानन महाराजांसारखा एक व्यक्ती बसलेली आहे तर एक व्यक्ती दोघांच्या मागे उभी आहे. आमच्या एका वाचकाने हा फोटो आम्हाला व्हाट्सएपवर पाठवून या संदर्भात पडताळणी करण्याची विनंती केली. फोटोच्या खाली मजकूर लिहिला आहे, यात म्हटले आहे की, “श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो. हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तेंव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांचे घरी काढला आहे … अजूनही त्याची Negative त्यांनी जपून ठेवली आहे.गजानन माऊलींचा ओरिजनल फोटो जमेल तेवढा शेयर करा.”

आम्ही याबाबत अधिक शोध घेतला असता आम्हाला मागील वर्षी हा फोटो याच दाव्याने फेसबुकवर व्हायरल झाल्याचे आढळून आले. यावरुन हे लक्षात आहे की हा दावा मागील दोन वर्षांपासून व्हायरल होत आहे.

संग्रहित

संग्रहित

Fact Check / Verification

व्हारल फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत असणारी व्यक्ती खरंच शेगावचे संत गजानन महाराज आहेत का याचा शोध घेण्याचा आम्ही प्रयत्न केला असता 5 एप्रिल 2016 रोजीच्या एका ट्विटमध्ये हा फोटो आढळून आला. यात म्हटले आहे की, फोटोत सुभाषबाबू यांच्यासोबत पुरी येथील शंकराचार्य आहेत.

संग्रहित

अधिक शोध घेतला असता गजाजन महाराजांचे निधन 8 सप्टेंबर 1910 रोजी झाल्याचे तर सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 रोजी झाल्याचे आढळून आले. यावरुन हेच स्पष्ट होते की, गजानन महाराजांचा निधनावेळी सुभाषचंद्रबोस हे केवळ 13 वर्षांचे होते. यामुळे व्हायरल दाव्याबद्दल शंका उपस्थित होते व गजानन महाराज आणि सुभाषचंद्रबोस याचा हा फोटो नसल्याचे स्पष्ट होते. नेताजी सुभाषचंद्रबोस यांच्यासोबत पुरीचे शंकराचार्यच आहेत का याचा शोध आम्ही पुढे सुरु ठेवला असता reddit.com या वेबसाईटवर हा फोटो आढळून आला. फोटोग्राफर मनोरंजन घोष यांनी 1940 मध्ये हा फोटो काढल्याची महिती दिली आहे.

नेताजी सुभाषचंद्र बोस आणि पुरीच्या शंकराचार्य यांच्यासमवेत उभा असलेली व्यक्ती कोण आहे याचा शोध घेतला सुभाषचंद्र बोस यांचे ड्रायव्हर कर्नल निमाजमुद्दीन असल्याची माहिती मिळाली. त्यांनी नेताजींना वाचवण्यासाठी तीन गोळ्या आपल्या अंगावर झेलल्या होत्या.

Conclusion

यावरुन हेच स्पष्ट होते की, व्हायरल फोटोत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत संत गजाजन महाराज नसून पुरी येथील शंकराचार्य आहेत. संत गजानन महाराजांचा मृत्यू झाला त्यावेळी सुभाषचंद्र बोस यांचे वय 13 होते.

Result – Misleading

Our Sources

रेड इट- https://www.reddit.com/r/oldindia/comments/187fjk/rare_photo_of_netaji_and_shankaracharya_of_puri/

कोणत्याही संशयास्पद बातमीच्या पडताळणीसाठी, सुधारणा किंवा अन्य सुचनांसाठी आम्हाला checkthis@newschecker.in वर ईमेल करा अथवा 9999499044 या व्हाट्सएप्प नंबरवर मॅसेज पाठवा. आपण आम्हाला संपर्क करुन हव्या असलेल्या माहितीबद्दल फाॅर्म देखील भरू शकता.

Authors

After completing his post-graduation, Yash worked with some of the most renowned newspapers such as like Lokmat, Dainik Bhaskar & Navbharat for the past 6 years. To make sure that no incorrect news reaches people and to maintain peace and harmony in society, he chose to become a fact-checker.

Yash Kshirsagar

Most Popular