Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
सुभाषचंद्र बोस आणि गजानन महाराज यांची भेट दर्शविणारा हा फोटो आहे.
Fact
व्हायरल दावा खोटा आहे. फोटोत सुभाषचंद्र बोस यांच्यासोबत पुरीचे शंकराचार्य आहेत. गजानन महाराज नाहीत.
सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज एका फोटोमध्ये दिसत आहेत. असा दावा एक फोटो शेयर करून केला जात आहे.

श्री संत गजाजन महाराज सोबत नेताजी सुभाषचंद्र बोस यांचे शेगाव येथील अतिशय दुर्मिळ फोटो, हा फोटो अकोला येथे महाराज येत असत तेंव्हा त्यांचे परमभक्त रामदासपेठ येथील पसारकर स्टुडिओ यांचे घरी काढला आहे … अजूनही त्याची Negative त्यांनी जपून ठेवली आहे. गजानन माऊलींचा ओरिजनल फोटो जमेल तेवढा शेयर करा..”गण गण गणात बोते” असे हा दावा सांगतो.
फोटोमध्ये तीन व्यक्ती दिसतात. सुभाषचंद्र बोस हे बसलेले असून काहीतरी लिहीत आहेत. त्यांच्या बाजुला एक व्यक्ती उभी आहे, तर आणखी एक व्यक्ती बसलेली असून तिने अंगावर कोणताही पेहराव घातलेला नाही.
फेसबुकच्या बरोबरीने X (पूर्वीचे ट्विटर) वर देखील अनेक युजर्सनी समान दावे केल्याचे आमच्या निदर्शनास आले.



Newschecker ला आमची व्हाट्सअप टिपलाइन (9999499044) वर समान दावे प्राप्त झाले असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.

Newschecker ने व्हायरल दाव्याची सत्यता तपासण्याचा निर्णय घेतला. आम्ही व्हायरल फोटोवर Google रिव्हर्स इमेज सर्च केला असता, आम्हाला @RareHistorical या X (पूर्वीचे ट्विटर) अकाउंटवर ५ एप्रिल २०१६ रोजी पोस्ट केलेला समान फोटो पाहायला मिळाला. मात्र त्याची कॅप्शन वेगळी होती.

“Netaji Subhas Chandra Bose with Shankaracharya of Puri-Orissa.” अर्थात “नेताजी सुभाषचंद्र बोस पुरी- ओरिसाच्या शंकराचार्यांसोबत” अशी कॅप्शन आम्ही वाचली. इतिहासाशी संबंधित पोस्ट घालणाऱ्या या अकाऊंटच्या आपल्या बायोमध्ये “Tweets on #IndianHistory #IndianMap #IndusValleyCivilization #IndianCurrency #NetaJiFiles #IndoPakWar1971 #HinduismAbroad.” अशी ओळख लिहिली असून अशा अनेक पोस्ट आम्हाला तेथे पाहायला मिळाल्या.
हाच सुगावा घेऊन आम्ही आणखी शोध घेतला असता, आम्हाला याच विषयावरील काँग्रेस पक्षाच्या X (पूर्वीचे ट्विटर) अधिकृत खात्यावरून २२ जानेवारी २०१७ रोजी केलेल्या ट्विटकडे नेले.

या ट्विटमध्येही “नेताजी सुभाषचंद्र बोस पुरी- ओरिसाच्या शंकराचार्यांसोबत” अशीच कॅप्शन आम्हाला वाचायला मिळाली.
यावरून छायाचित्रात दिसणारी व्यक्ती शेगावचे गजानन महाराज नाहीत. ही माहिती आम्हाला समजली. आम्ही गजानन महाराज यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांच्या सुभाषचंद्र बोस यांच्या भेटीसंदर्भात काही तपशील मिळतात का? हे पाहण्याचा प्रयत्न केला. आम्हाला www.gajananmaharaj.org या श्री गजानन महाराज संस्थानच्या वेबसाइटवर बरीच माहिती मिळाली. या माहितीत आम्हाला सुभाषचंद्र बोस आणि त्यांच्या भेटीचा उल्लेख आढळला नाही. शिवाय महाराजांनी ८ सप्टेंबर १९१० रोजी शेगावातच समाधी घेतल्याचे वाचायला मिळाले.

आम्ही गुगलवर सुभाषचंद्र बोस यांची जन्मतारीख शोधली, ती २३ जानेवारी १८९७ असल्याचे आम्हाला समजले.

२३ जानेवारी १८९७ ही सुभाषचंद्र बोस यांची जन्मतारीख असून ८ सप्टेंबर १९१० रोजी गजानन महाराजांनी समाधी घेतली तेंव्हा सुभाषचंद्र बोस हे केवळ १३ वर्षांचे होते. हे आमच्या तपासात स्पष्ट झाले. व्हायरल फोटोत सुभाषचंद्र बोस यांचे वय जास्त आहे. त्यामुळे व्हायरल फोटोतील दावा खोटा असल्याचे स्पष्ट होते.
अशाप्रकारे आम्ही केलेल्या तपासात व्हायरल फोटोमध्ये सुभाषचंद्र बोस आणि शेगावचे गजानन महाराज यांच्या भेटीचा पुरावा म्हणून केला जाणारा दावा खोटा आणि दिशाभूल करणारा असल्याचे स्पष्ट झाले आहे.
Our Sources
Tweet made by @RareHistorical on April 5, 2016
Tweet made by @INCIndia on January 22, 2017
Analysis of www.gajananmaharaj.org
Google Search
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Salman
August 26, 2025
Prasad S Prabhu
November 25, 2023
Yash Kshirsagar
January 27, 2021