Tuesday, November 5, 2024
Tuesday, November 5, 2024

HomeFact Checkफॅक्ट चेक: लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मविआच्या उमेदवाराच्या निवडणूक रॅलीचा म्हणून पुन्हा व्हायरल

फॅक्ट चेक: लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मविआच्या उमेदवाराच्या निवडणूक रॅलीचा म्हणून पुन्हा व्हायरल

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Claim
महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीचा व्हिडीओ.
Fact

हा दावा खोटा आहे. हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लातूरमध्ये ईद-ए-मिलादच्या वेळी काढण्यात आलेल्या बाइक रॅलीचा आहे.

महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीचा व्हिडीओ असे सांगत कम्युनल अँगलने एक दावा केला जात आहे. आम्हाला हा दावा X आणि फेसबुकवर आढळला.

दाव्यांचे संग्रहण येथे आणि येथे पाहता येईल.

“काँग्रेस, शरद पवार, उद्धव ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीचा उमेदवार मेमन खानच्या रॅलीत भारताचे किती झेंडे दिसत आहेत? कॉंग्रेस आघाडी आपल्या पुढच्या पिढीला कोणते भविष्य देणार आहे? याचा विचार करुन मतदान करा….” अशा कॅप्शनखाली हा दावा केला जात आहे.

Fact Check/ Verification

महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या रॅलीचा असे सांगत सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये महाविकास आघाडीतील घटक पक्षांचा एकही झेंडा आम्हाला दिसला नाही. अशा परिस्थितीत आम्ही संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहिला. या वेळी आम्हाला असे आढळून आले की व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या पोलिसांच्या वाहनावर महाराष्ट्र पोलिसांचे चिन्ह आहे. तसेच पोलिसांच्या दुचाकीवर मराठीत ‘पोलीस’ असे लिहिलेले दिसत आहे.

फॅक्ट चेक: लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मविआच्या उमेदवाराच्या निवडणूक रॅलीचा म्हणून पुन्हा व्हायरल

व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या मोटरसायकलवर MH 24 लिहिलेले दिसत आहे. MH 24 हा महाराष्ट्रातील लातूरचा वाहन नोंदणी क्रमांक असल्याची माहिती सुद्धा आम्हाला मिळाली.

फॅक्ट चेक: लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मविआच्या उमेदवाराच्या निवडणूक रॅलीचा म्हणून पुन्हा व्हायरल

व्हिडिओच्या मागील बाजूस दिसणारे होर्डिंग ‘लातूर अतिदक्षता हॉस्पिटल’ असे वाचले जाऊ शकते. Google कीवर्ड शोधल्यावर, आम्हाला आढळले की हे हॉस्पिटल गांधी चौक, नांदेड रोड, लातूर, महाराष्ट्र येथे आहे. आता आम्ही गुगल मॅपच्या मदतीने हा पत्ता शोधला आणि व्हायरल क्लिपमध्ये दिसणाऱ्या लोकेशनशी स्ट्रीट व्ह्यूद्वारे आजूबाजूचा परिसर जुळवला. जुळल्यानंतर, व्हायरल क्लिपमध्ये दिसणारे ठिकाण लातूरमधील गांधी चौक असल्याचे निश्चित झाले.

फॅक्ट चेक: लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मविआच्या उमेदवाराच्या निवडणूक रॅलीचा म्हणून पुन्हा व्हायरल
फॅक्ट चेक: लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मविआच्या उमेदवाराच्या निवडणूक रॅलीचा म्हणून पुन्हा व्हायरल

या मिरवणुकीच्या अधिक माहितीसाठी आम्ही लातूरचे स्थानिक पत्रकार अश्फाक पठाण यांच्याशी बोललो. त्यांनी सांगितले की, “हा व्हिडिओ महाराष्ट्रातील लातूर येथे ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढलेल्या मिरवणुकीचा आहे. दरवर्षी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने ही मिरवणूक काढण्यात येते, असे त्यांनी सांगितले. ही मिरवणूक लातूरच्या सुफिया मशिदीपासून सुरू होऊन शाहू चौकातून जाते.” हे उल्लेखनीय आहे की ईद-ए-मिलाद प्रेषित मोहम्मद यांची जयंती आणि पुण्यतिथीचे प्रतीक आहे. यावर्षी ईद-ए-मिलाद 15 सप्टेंबरच्या सायंकाळपासून ते 16 सप्टेंबर 2024 पर्यंत होती.

पुढील तपासात लातूरचे पोलीस अधीक्षक प्रेमप्रकाश मारोतराव माकोडे यांच्याशी बोललो. फोनवरील संभाषणात त्यांनी सांगितले की, “ही मिरवणूक 19 सप्टेंबर रोजी ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या बाइक रॅलीची आहे. लातूरमध्ये सामाजिक सौहार्दाची परिस्थिती आहे कारण गणेश विसर्जन आणि ईद-ए-मिलाद एकाच वेळी येते. त्यामुळे दरवर्षी येथे हिंदू आणि मुस्लिम समाज परस्पर विचारविनिमय करून मिरवणूक काढण्यासाठी दोन स्वतंत्र दिवस ठरवतात. यावर्षीही प्रथम गणेश विसर्जन 17 सप्टेंबरला झाले आणि त्यानंतर 19 सप्टेंबरला ईद-ए-मिलादच्या निमित्ताने बाईक रॅली काढण्यात आली.

आता आम्ही गुगलवर ‘ईद-ए-मिलाद रॅली लातूर’ हा कीवर्ड शोधला. या वेळी, आम्हाला लातूरमधील ईद-ए-मिलाद रॅलीच्या व्हिडिओसह अनेक सोशल मीडिया पोस्ट आढळल्या, ज्या येथेयेथे आणि येथे पाहता येतील. व्हायरल झालेल्या क्लिपप्रमाणे सर्व व्हिडिओंमध्ये मिरवणुकीच्या सुरुवातीला एक व्यक्ती काळ्या कारमध्ये तिरंगा झेंडा हातात घेऊन उभा असल्याचे आम्हाला आढळले. ज्याच्या मागे संपूर्ण दुचाकी मिरवणूक निघाली आहे.

फॅक्ट चेक: लातूरचा ईद-ए-मिलादचा व्हिडिओ मविआच्या उमेदवाराच्या निवडणूक रॅलीचा म्हणून पुन्हा व्हायरल

व्हायरल दाव्यात म्हटल्याप्रमाणे महाविकास आघाडीने कोठे मेमन खान नावाच्या व्यक्तीस उमेदवारी दिली आहे का? याचा शोध घेतला. मात्र तशी माहिती मिळाली नाही.

विशेष म्हणजे हरियाणा येथे विधानसभा निवडणूक सुरु असताना हाच व्हिडीओ हरियाणाच्या मेवात येथील काँग्रेस उमेदवाराच्या प्रचाराची रॅली असा दावा करीत व्हायरल करण्यात आला होता. त्यावेळी न्यूजचेकरने केलेले मराठी आणि हिंदी फॅक्टचेक आपण येथे वाचू शकता.

Conclusion

तपासातून, आम्ही या निष्कर्षाप्रत पोहोचलो की, महाराष्ट्रातील लातूर येथे ईद-ए-मिलादच्या निमित्ताने काढण्यात आलेल्या बाइक रॅलीचा व्हिडिओ महाविकास आघाडीच्या उमेदवाराची निवडणूक प्रचार मिरवणूक असल्याचा खोटा दावा करून शेअर केला जात आहे.

Result: False

Sources
Google Maps
Phonic Conversation with Journalist from Latur, Ashfaq Pathan.
Phonic Conversation with Latur Police.
Social Media Posts.


कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.inफॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा

Authors

Since 2011, JP has been a media professional working as a reporter, editor, researcher and mass presenter. His mission to save society from the ill effects of disinformation led him to become a fact-checker. He has an MA in Political Science and Mass Communication.

Most Popular