Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
पाकिस्तानने भारतीय युद्ध विमानांना लक्ष्य केले आहे.
व्हायरल झालेले फोटो जुने आहेत.
भारत सरकारने पाकच्या ताब्यातील काश्मीर आणि पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर हल्ला केला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर झालेल्या या कारवाईला भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर असे नाव दिले. या कारवाईनंतर, क्रॅश झालेल्या विमानांचे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, जे पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमानांना लक्ष्य केल्याचा दावा करून शेअर केले जात आहेत.
तथापि, आमच्या तपासणीत आम्हाला आढळले की हे फोटो भारतात घडलेल्या जुन्या लढाऊ विमान अपघातांच्या घटनांचे आहेत. यातील एक घटना पंजाबमधील मोगा येथे घडली, तर दुसरी घटना राजस्थानमधील बारमेर येथे घडली.
आम्हाला हे दावे व्हाट्सअपवर शेयर केले जात असल्याचे दिसून आले.
न्यूजचेकरला आमची व्हाट्सअप टीपलाइन (9999499044) वर समान दावा प्राप्त झाला असून सत्यता तपासण्याची विनंती करण्यात आली आहे.
पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमानांना लक्ष्य केल्याचा दावा करणारे व्हायरल फोटो आणि व्हिडिओ तपासत असताना, आम्ही प्रथम त्या फोटोची तपासणी केली ज्यामध्ये एक क्रॅश झालेले विमान जमिनीत गाडलेले दिसत आहे.
रिव्हर्स इमेज सर्चमधून आम्हाला हा फोटो २१ मे २०२१ रोजी टाईम्स ऑफ इंडियाच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका वृत्तात सापडला. वृत्तानुसार, २० मे २०२१ च्या रात्री पंजाबमधील मोगा जिल्ह्यातील लांगेना खुर्द गावात भारतीय हवाई दलाचे मिग-२१ विमान कोसळले. या अपघातात पायलट अभिनव चौधरीचा मृत्यू झाला. हे विमान राजस्थानमधील सुरतगड येथून उड्डाण करत होते.
याशिवाय, २१ मे २०२१ रोजी इंडिया टीव्हीच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका वृत्तात आम्हाला संबंधित चित्र देखील आढळले. या वृत्तात सांगण्यात आले आहे की हे मिग-२१ विमान पंजाबमधील मोगा येथील लांगेना खुर्दजवळ कोसळले, ज्यामध्ये पायलटचा मृत्यू झाला.
यानंतर आम्ही क्रॅश झालेल्या विमानाच्या दुसऱ्या चित्राची तपासणी केली. रिव्हर्स इमेज सर्च केल्यावर २ सप्टेंबर २०२४ रोजी एनडीटीव्ही राजस्थानच्या वेबसाइटवर प्रकाशित झालेल्या एका रिपोर्टमध्ये हा फोटो सापडला.
या वृत्तात, भारतीय हवाई दलाचा हवाला देत, बाडमेरमध्ये एक मिग-२१ विमान कोसळल्याचे म्हटले आहे. या विमानात गंभीर तांत्रिक बिघाड झाला होता, ज्यामुळे पायलटला बाहेर पडावे लागले. या अपघातात कोणतीही जीवित किंवा वित्तहानी झाली नाही.
याशिवाय, आम्हाला ईटीव्ही भारतच्या वेबसाइटवर यासंबंधीचा एक व्हिडिओ रिपोर्ट सापडला, जो २ सप्टेंबर २०२४ रोजी प्रकाशित झाला होता. बारमेर जिल्ह्यातील नागाना पोलीस स्टेशन परिसरात हवाई दलाचे लढाऊ विमान मिग २९ कोसळल्याचे वृत्त आहे. अपघातानंतर विमानाला आग लागली. तांत्रिक बिघाडामुळे ही दुर्घटना घडली. या विमान अपघाताची पुष्टी जिल्हाधिकारी आणि एसपींनीही केली. असे यात वाचायला मिळाले.
आमच्या तपासात सापडलेल्या पुराव्यांवरून हे स्पष्ट होते की पाकिस्तानने भारतीय लढाऊ विमानांना लक्ष्य केले असल्याचा दावा करणारे व्हायरल फोटो जुने आहेत.
Our Sources
Article Published by Times of india on 21st May 2021
Article Published by India TV on 21st May 2021
Article Published by NDTV Rajasthan on 2nd sep 2024
Article Published by ETV Bharat on 2nd sep 2024
(हे आर्टिकल न्यूजचेकर हिंदीसाठी सर्वप्रथम रुंजय कुमार यांनी केले असून येथे वाचता येईल.)
Vasudha Beri
June 19, 2025
Kushel Madhusoodan
June 18, 2025
Runjay Kumar
June 18, 2025