Authors
Claim
हा व्हिडीओ अयोध्या येथील श्रीराम मंदिराचा आहे.
Fact
व्हायरल व्हिडिओ हा अयोध्येतील राम मंदिरचा नसून कोलकातामध्ये नवरात्रीच्या निमित्ताने लावलेला दुर्गापूजा पंडाल आहे.
अयोध्येतील राम मंदिर असा दावा करत सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. रंगीबेरंगी लाइटिंग लावलेल्या मंदिराला अयोध्या येथील राम मंदिर असे संबोधले जात आहे.
आम्हाला हा व्हिडीओ युट्युबवर सापडला. दरम्यान हा व्हिडीओ राम मंदिराचे काम पूर्ण झाले असे सांगून व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात व्हायरल झाला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
FactCheck/ Verification
Newschecker ने या व्हिडिओचा तपास करण्यासाठी त्याचे काही किफ्रेम्स काढून Google वर रिव्हर्स इमेज सर्च केले.
आम्हाला २३ ऑक्टोबर २०२३ रोजी @ALWAYSBUSYGAMING या युट्युब चॅनेलने अपलोड केलेला व्हिडीओ मिळाला. हा व्हिडीओ व्हायरल व्हिडिओही मिळताजुळता असल्याचे आमच्या निदर्शनास आले. त्याचे शीर्षक “Santosh Mitra Square Ram Mandir Theme Durga Puja Pandal 2023- 360°VR Walking Tour” असे आढळले. तसेच “कोलकाता येथील बो बाजारच्या संतोष पार्क दुर्गा पूजा मंडळाने राम मंदिर थीमवर आधारित हा दुर्गा पूजा पंडाल” असल्याचे आम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये वाचायला मिळाले.
हा पुरावा मानून आम्ही पुढील शोध घेतला. १८ ऑक्टोबर २०२३ रोजी द हिंदुस्तान टाईम्सने प्रकाशित केलेल्या “कोलकाता येथील दुर्गा पूजेचे राम मंदिराचे दृश्य” या शीर्षकाने प्रसिद्ध झालेल्या एका वृत्तात राम मंदिरासारखे विशाल पंडालचे फोटो दिले आहेत.
२४ ऑक्टोबर २०२३ रोजी Outlook ने प्रकाशित केलेल्या रिपोर्टमध्ये “कोलकाता येथील दुर्गा पूजेच्या वेळी राम मंदिर पंडाल प्रचंड गर्दीचे साक्षीदार” असे शीर्षक असलेले फोटो देखील पाहायला मिळाले.
वरील सर्व रिपोर्ट्समध्ये व्हायरल व्हिडिओसारखीच दृश्ये असल्याचे आमच्या लक्षात आले.
व्हायरल व्हिडीओ परिपूर्ण मंदिराचा असल्याप्रमाणे भासतो. दरम्यान अयोध्येतील राम मंदिराचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. ते अजूनही सुरू असल्याचे जाहीर करण्यात आले आहे.
२४ नोव्हेंबर २०२३ रोजी CNN-News18 च्या YouTube चॅनलद्वारे पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये, राम मंदिर समितीचे प्रमुख नृपेंद्र मिश्रा राम मंदिराच्या अलीकडील बांधकाम टप्प्याबद्दल सांगताना दिसतात.
अयोध्येतील राम मंदिराचे काम अद्याप सुरु असून ते पूर्ण झालेले नाही हे सांगणारा आणखी एक रिपोर्ट येथे पाहता येईल.
Conclusion
आमच्या तपासात अयोध्येतील राम मंदिराचे काम अद्याप पूर्ण व्हायचे आहे. आता जे व्हायरल झाले आहे ते कोलकाता येथे नवरात्री दरम्यान केले जाणारे दुर्गा पूजा पंडाल आहे. हे स्पष्ट झाले आहे.
Result: False
Our Sources
Video published by Always Busy Gaming on October 23, 2023
Report published by Hindustan Times on October 18, 2023
Report published by Outlook on October 18, 2023
Video published by CNN News18 on November 24, 2023
(हे आर्टिकल सर्वप्रथम न्यूजचेकर कन्नडसाठी ईश्वरचंद्र बी.जी. यांनी केले आहे. ते येथे वाचता येईल.)
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा