Newchecker.in is an independent fact-checking initiative of NC Media Networks Pvt. Ltd. We welcome our readers to send us claims to fact check. If you believe a story or statement deserves a fact check, or an error has been made with a published fact check
Contact Us: checkthis@newschecker.in
Fact Check
Claim
अयोध्या राममंदिराचे दानपात्र अर्ध्या दिवसात भरले.
Fact
व्हायरल व्हिडिओ अयोध्येचा नसून राजस्थानमधील सावलिया सेठ कृष्ण मंदिराचा आहे.
अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनानंतर मोठ्या संख्येने भाविक येत आहेत आणि दानाची हुंडी अर्थात दानपात्र तुडुंब भरले आहे, असा दावा करीत सोशल मीडियावर एक व्हिडिओ फिरत आहे. अयोध्या राममंदिरात दानपत्र भरल्याच्या दाव्याची जोरदार सुरु आहे.
“#श्रीअयोध्याधाम#श्रीराम_मन्दिर में पहले दिन दान-पेटी में दान की गई इतनी राशि कि आधे दिन में ही दानपात्र भर गया.. #जय_श्रीराम” असे हा दावा सांगतो.
हा दावा व्हाट्सअपवर मोठ्याप्रमाणात फिरू लागला असल्याचे आमच्या निदर्शनास आले.
व्हायरल व्हिडिओची सत्यता तपासण्यासाठी आम्ही काही किफ्रेम्स काढून त्यावर रिव्हर्स इमेज सर्च केला. आम्हाला या व्हिडिओचा मुख्य स्रोत sanwaliya_seth_1007 या इंस्टाग्राम खात्याचा असल्याचे दिसून आले.
पोस्टमध्ये दिलेल्या वर्णनानुसार, “श्री सावलिया सेठ, यावेळी विक्रमी 12 कोटी 69 लाख रोख देणगी संकलन आहे.” अशी माहिती मिळाली. यासह, नितीन वैष्णव या युजरचे संबंधित अकाउंट असल्याची माहिती आम्हाला मिळाली. व्हायरल व्हिडिओमध्ये दिसणाऱ्या व्यक्ती आणि नितीनने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या व्हिडिओ मधील व्यक्तींमध्ये साम्य आढळले.
याचा पुरावा म्हणून विचार करून, आम्ही पुढील शोध घेतला आणि पुढील परिणाम आढळले.
14 जानेवारी 2024 रोजी NDTV राजस्थानच्या रिपोर्टनुसार, नवीन वर्षात प्रथमच, श्री सावलिया सेठ मंदिराने दान हुंडी उघडल्या आणि करोडो रुपयांच्या देणग्या पाहायला मिळाल्या. अजूनही मोजणी सुरू आहे. रिपोर्टनुसार, प्रसिद्ध कृष्ण धाम श्री सावलिया सेठ हे राजस्थानच्या चित्तोडगड जिल्ह्यात आहे.
11 जानेवारी 2024 रोजी एबीपी न्यूजनुसार, सावलिया सेठ मंदिराची देणगी हुंडी उघडण्यात आली असून पहिल्याच दिवशी करोडो देणगी आणि अमेरिकन डॉलर्स मिळाले आहेत.
त्यामुळे या सत्यशोधनानुसार, व्हायरल व्हिडीओ अयोध्येतील राम मंदिराचा नसून राजस्थानमधील सावलिया सेठ मंदिरातील देणगी हुंडीच्या मोजणीचा आहे. ‘राममंदिर’ या विधानासह दिशाभूल करीत हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला आहे.
Our Sources
Instagram Post By sanwaliya_seth_1007, Dated: January 16, 2024
Report By, NDTV Rajastan, Dated: January 14, 2024
Report By ABP News, Dated: January 11, 2024
कोणत्याही संशयास्पद बातम्यांवरील तपास, दुरुस्ती किंवा इतर सूचनांसाठी, आम्हाला व्हाट्सएप करा: 9999499044 किंवा ईमेल करा: checkthis@newschecker.in. फॅक्टचेक्स आणि ताज्या अपडेटसाठी आमच्या WhatsApp चॅनेलला फॉलो करा
Prasad S Prabhu
February 3, 2024
Prasad S Prabhu
January 27, 2024
Komal Singh
January 25, 2024